तिरुपती बालाजी दर्शन


Live

With Shrimant Dadasaheb Karande LIVE

तिरुपती हे स्थान आंध्र प्रदेश राज्यात आहे. बालाजी मंदिरासाठी विख्यात आहे.
तिरुपती हे भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांमध्ये मोडते. तिरु म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मीचा पती म्हणजे तिरुपती(विष्णू). येथे बालाजीचे विख्यात मंदिर आहे. शहरापासून जवळच असलेल्या डोंगरावर बालाजीचे मंदिर आहे. या डोंगरास तिरुमला असे म्हणतात. तेलुगूतमिळ भाषेत मला/मलई म्हणजे डोंगर/पर्वत होय.बालाजी हा विष्णूचा अवतार मानला जातो. हे ठिकाण रेल्वे व महामार्गाने चेन्नईबंगळूर या शहरांशी उत्तम प्रकारे जोडलेले आहे.

तिरुपती शहर हे आंध्र प्रदेश राज्याच्या दक्षिण टोकावर चित्तूर जिल्ह्यात आहे. हे ठिकाण राजधानी हैदराबादपासून ७४० किंमी अंतरावर आहे.
येथून ३६ किमी अंतरावर श्री कालाहस्ती नावाचे दक्षिणेतील प्रसिद्ध शिवक्षेत्र आहे.

No comments: