SHRIMANT

करीअर


जवळ जवळ सर्व करीयर समस्या ह्या पाल्यांच्या चुकीच्या शैक्षणिक नियोजनामुळे आणि उपलब्ध माहितीचा व्यवस्थित वापर करता न आल्याने तयार होतात. पालकांमध्ये सामाजिक पातळीवरील ट्रेंड्स ना भुलण्याचे किंवा नातेवाईक व इतरांनी सुचवलेले करीयरचे मार्ग आपल्या पाल्यांवर थोपवण्याची प्रवृत्ती दिसते. पाल्यांमध्ये मुख्यत्वे स्वतःच्या शैक्षणिक क्षमता विषयी तसेच भविष्यात कोणत्या कामामध्ये स्वतःला मानसिक समाधान आणि आर्थिक प्रगती लाभेल याविषयी अपूर्ण ज्ञान किंवा ऐकीव माहितीने तयार झालेला गोंधळ आढळतो.
करीयर विषयीचे चुकीचे किंवा नकारात्मक निर्णय हे फक्त करीयरवर नकारात्मक परीणाम करतात असे नाही तर आपल्या आयुष्यातील बहुमुल्य वेळ वाया घालवतात, आणि आपल्या मनावर खोल जाईल असले विशिष्ट आघात करतात. बऱ्याचवेळा चुकीच्या निर्णयाचा बळी ठरल्याने ‘पदरी पडले आणि पवित्र झाले’ या भावनेने हाती मिळेल ते करत राहणे निवडल्याने मानसिक स्वास्थ्यावर दूरगामी परीणाम होतो. तरीही, अजूनही, पालक किंवा पाल्यांमध्ये अजूनही वेळेत करीयर विषयी नियोजन करणे आणि आवश्यकता असल्यास व्यावसायिक तज्ञांची मदत घेणे या गोष्टी कमी आढळतात. यामुळेच बऱ्यापैकी तरुणाई असमाधानी आणि चुकीच्या क्षेत्रात आपल्या क्षमता वाया घालवताना दिसतात.
करीयर नियोजन प्रक्रीयेचा सर्वांगीण विचार करून सेल्फहूड ने करीयर नियोजन विषयी मार्गदर्शन तयार केले आहे. यामध्ये वैयक्तिक तसेच सामुहीक समुपदेशन, सर्वमान्य नैदानिक चाचण्या, मार्गदर्शन सत्रे, शैक्षणिक नियोजन आदि प्रक्रियांचा समावेश होतो.
  • सर्व वयोगटातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी ऑनलाइन व व्यक्तीगत तसेच समूह करीयर समुपदेशन
  • पालकांसाठी करीयर नियोजन संबंधी मार्गदर्शन व सल्ला
  • करीयर नियोजनासाठी आवश्यक चाचण्या व परीक्षा याविषयी मार्गदर्शन
  • शिक्षकांसाठी करीयर मार्गदर्शन कौशल्ये निर्मिती कार्यशाळा
  • करीयर मार्गदर्शन करणाऱ्या समुपदेशकांसाठी व्यावसायिक कौशल्ये व अभिनव तंत्रांचा वापर
  • गुणात्मक करीयर चाचण्या
  • शालेय व कॉलेज पातळीवर करीयर मार्गदर्शन सल्ला केंद्र उभारणी सल्ला व मार्गदर्शन
वर उल्लेख नसलेल्या करीयर समस्यांवर सेल्फहूड कडून सेवा मिळवण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.

No comments: