SHRIMANT

श्री विश्वशांती जगद्गुरू सेवा संस्था

संत बहिणाबाईंनी खूप छान ओवी लिहून ठेवली आहे ती अशी आहे ज्ञानदेवी रचिला पाया तुका झालासे कळस या ओवी प्रमाणे विश्वशांती स्वरूप संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानाचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार ग्रहण करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त विद्वान लोकांनाच नसावा तो अधिकार सर्वसामान्यपणे असावा या दृष्टिकोनातून संस्कृत भाषेत असणारे भगवत गीता भगवद्गीता ग्रंथ साध्या आणि सोप्या मराठी भाषेत माऊलींनी लिहून ठेवला व तो जगापुढे आणला त्याचप्रमाणे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांनी देखील सोळाव्या शतकामध्ये वेदांचे गाडी अभ्यासक असणारे विधवान लोकांना हे अधिकार आहे तेच परंतु सर्वसामान्य लोकांना देखील विद्वत्तेचा अधिकार आहे या अनुषंगाने चारही वेदांत स्वरूप अतिशय साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये म्हणजे तुम्हा आम्हा आवडती गाथा यामध्ये लिहून ठेवले म्हणून वारकरी संप्रदायांमध्ये यारे यारे लहान थोर अशा वाक्याप्रमाणे कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा कोणत्याही पंतांचा कुठल्याच प्रकारचे बंधन नाही हा वारकरी संप्रदाय सर्वांचा आहे हा वारकरी संप्रदाय सर्व धर्माचा आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज यांनी केलेला नाहीये म्हणून तर बहिणाबाई म्हणतात ज्ञानदेवी रचिला पाया तुका झालासे कळस खरंतर पाया रचलेला आणि कळस बांधलेला हे मंदिर वारकरी संप्रदायाचे हल्लीच्या काळात कोणाच्या हातामध्ये आहे हे कळतच नाही म्हणायला हिंदू धर्माचे रक्षक मी त्यांना हिंदू धर्माचे रक्षक नाही म्हणणार हिंदू धर्माचे ठेकेदार म्हणणार खरंतर पाहिलं असं दिसून येतं की हे ठेकेदार हिंदू धर्माच्या नावावरती स्वतःला स्वयंघोषित भागवताचार्य स्वयंघोषित स्वामी स्वयंघोषित विद्वान स्वयंघोषित आचार्य अशा नाना प्रकारच्या पदव्या स्वतःच्या नावापुढे लावतात आणि स्वतःला विद्वान समजतात हिंदू धर्माचे उदो उदो करतात परंतु उदो उदो करत असतानाही विसरून गेले की आपला धर्म कोणता आहे आपण आपल्या धर्मा प्रति काय केलं पाहिजे आपला धर्म मोठा नंतर आपण मोठे परंतु इथे उलटं चाललंय बऱ्याच ठिकाणी काही संत महंत हे चांगल्या प्रकारे धर्माचा प्रचार प्रसार करत आहेत आणि आपला एकमेव जगातील हिंदू धर्माचा आहे जो शांतीच्या मार्गाने सर्व गोष्टी आपल्याला करायला शिकवतो म्हणून काही संतांमुळे काही साधून मुळे काही विधानांमुळे हा धर्म टिकून आहे परंतु हल्लीच्या काही विद्वानांना काही संतांना काही साधून ना काही महाराजांना धर्मापेक्षा आम्ही विद्वानात आम्ही मोठे आहोत असा गर्व होत आहे खरंतर आपल्या हिंदू धर्मामध्ये देव देवतांनी कशाप्रकारे शांतीच्या मार्गाने या विश्वामध्ये माणुसकी जपून ठेवली आपल्या हिंदू धर्माला अनेक वर्षाचा इतिहास आहे हा इतिहास कसा आहे आणि आता त्या इतिहासाच्या जोरावरती हे हिंदू धर्माचे ठेकेदार कशी वागत आहेत हे आपल्याला पाहायला मिळतं अतिशय दुःख वाटतं हिंदू धर्मापेक्षा यांना यांच्या पदव्या महत्त्वाच्या आहेत देवांचे मूर्ती देवांचे फोटो एखाद्या मोठ्या कथेमध्ये कीर्तनामध्ये पाहिलं तर यांच्यापेक्षा त्या देवदेवतांच्या पेक्षा यांच्या गळ्यामध्ये खूप मोठे हार खूप मोठे तुरे खूप मोठे सत्कार असतात खरंतर इतिहासामध्ये जर गेलो विश्वशांती स्वरूप संत ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेची टिपणी साध्या सोप्या भाषेमध्ये मराठीत केली धर्माबद्दल असणाऱ्या अस्मितेचं सर्वसामान्यांपर्यंत सहज सोप्या भाषेमध्ये जावं या हेतूने संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचा रूपांतर ज्ञानेश्वरी मध्ये केलं ती ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहून समाजापुढे एक चांगला आदर्श धर्माचा प्रचार म्हणून आपल्यासमोर मांडला परंतु त्यांनी कधीही भागवताचार्य आचार्य अशी कुठलीही पदवी लावलेली नाहीये त्याचप्रमाणे वेदांचे घडे अभ्यासक असणारे विद्वानांना वेद पठण करण्याचा अधिकार नसून हा सर्वसामान्य देखील अधिकार आहे असं जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री संत तुकाराम महाराजांनी या चारी वेदांचं स्वरूप पाचवा वेद म्हणजे गाथा करून या समाजाला ज्ञान देण्याचा खूप मोठा कार्य केलं त्यांनी कुठेही वेदाचार्य आचार्य अशी पदवी लावून घेतली नाही मग कार्य करून पदवी न लावणारे असे महान संत आपल्या महाराष्ट्राला आपल्या भारताला आपल्या हिंदू धर्माला लाभले मग आताचे धर्माचे ठेकेदार या गीतेवरती या ज्ञानेश्वरी या गाथेवरती कीर्तन प्रवचन करून स्वतःच्या नावापुढे लावून स्वतःचा डंका वाजवतात आणि आपल्या धर्माचे रक्षण रक्षण करणारे आहोत असं थोतांड दाखवतात हे खरंतर कुठेतरी हिंदू धर्म हा आतून खोकला होत आहे कमकुवत होत आहे आपल्या धर्माला मजबूत करायचं असेल तर खरा धर्म काय आहे या धर्माची नीती काय आहे या धर्माची पद्धत काय आहे या धर्मामध्ये कशाप्रकारे आपण राहिला पाहिजे खरंतर सांगण्यासाठीचे दुःख वाटतं आपल्याच धर्माचे लोक धर्मांतर करत आहे हे मूळ थांबवणे गरजेचे आहे इतर धर्मावरती टीका करण्यापेक्षा आपला धर्म कसा श्रेष्ठ आहे आणि आपलेच धर्मातील लोक दुसऱ्या धर्मामध्ये पर्याय न करता आपल्या धर्मामध्ये कशाप्रकारे टिकून राहतील ही गोष्ट या धर्म रक्षण करणाऱ्या ठेकेदारांनी समजून सांगितली पाहिजे आणि हा जो धर्म परिवर्तनाचा जो काही मोठा आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रकार चाललेला आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे तरच आपण खऱ्या अर्थाने आपल्या धर्माचे रक्षक म्हणून संबोधले जाऊ नाही तरी इतर धर्मावरती टीका करत असताना आपला धर्म आतून खोकला होत आहे पोकळ होत आहे हे आपल्या कधी धर्माच्या रक्षण करणारे ठेकेदारांना कळेल हे खरंतर समजत नाहीये धन्यवाद आपला हिंदू धर्म प्रचारक श्रीमंत माउली जी संथपक - अध्यक्ष ( श्री विश्वशांत जगद्गुरू सेवा संस्था ) 08329888808

No comments: