सर्वांगीण दृष्टी किंवा दृष्टीकोन हा शब्द
न ऐकलेला व्यक्ती सापडणे तसे अवघड आहे कारण हा शब्द सतत वेगवेगळ्या
जाहिरातीमधून कानावर पडत असतो. नक्की काय असतो हा ‘सर्वांगीण दृष्टीकोन’
याचा खोलवर तपास घेणे सामान्य माणसाला जमत नाही किंवा तेवढी उत्सुकता
निर्माण झालेली नसते त्यामुळे हा शब्द जसा सुरु होतो तसाच संपतो. सेल्फहूड
मात्र हा शब्द एखाद्या मंत्र किंवा प्रार्थनेपेक्षा कमी समजला जात नाही.
आमच्या प्रत्येक गोष्टीत आम्ही ‘सर्वांगीण’ विचार ठेवतो त्यामुळेच आम्ही
आमच्या ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा पुरवू शकतो.
बऱ्याचवेळा ‘मुख्य प्रवाहापेक्षा वेगळ
म्हणजे सर्वांगीण’ असा चुकीचा समाज होईल अश्या पद्धतीने जाहिराती दाखवल्या
जातात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात असणारी पण जाणीवेत न भिनलेली
ही संकल्पना आणि तिचे फायदे व्यक्ती घेऊ शकत नाही. या सर्व गोष्टींचा
अभ्यास करून सेल्फहूड ने आपली स्वतःची ‘सर्वांगीण दृष्टीकोन’ या विषयाची
विस्तृत संकल्पना समोर मांडलीआहे.
सर्वांगीण दृष्टीकोन हा प्रत्येक
व्यक्तीच्या विचारांमध्ये थोड्याफार फरकाने असतोच आणि त्याची अनुभूती
प्रत्येक क्षणाला येत असते. परंतु, बाह्यपरिस्थिती जसेकी सुविधा व
मार्गदर्शनाचा अभाव, नोकरी व व्यवसायातील व्यस्तता, मुख्य प्रवाहातील काही
गोष्टींमधून व्यावसायिक संबंध किंवा इच्छाशक्तीचा अभाव असल्याने बाहेर पडू न
शकणे, या व अश्या अनेक समस्यांमुळे व्यक्ती स्वतःकडील नैसर्गिक
‘सर्वांगीण’ व्यवस्थांचा वापर करू शकत नाहीत. या परिस्थितीमधून बाहेर
काढण्यासाठी सेल्फहूड अतिशय पोषक व संकल्पयुक्त वातावरण पुरवते ज्यामध्ये
विशिष्ट भू-सांस्कृतिक वातावरणास अनुसरून सल्ला व सुविधा देवून इच्छित बदल
साध्य करण्यासाठी प्रेरणा दिली जाते.
No comments:
Post a Comment