SHRIMANT

Saturday, May 16, 2026

सुरेश वडगावकर ज्ञानदीप शिष्यवृत्ती" चा वितरण सोहळा संपन्न*

शिष्यवृत्ती ही बक्षीस नसून प्रेरणा आहे. शिक्षण उपसंचालक काळे आळंदी: श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्यु. कॉलेज, श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर व श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर यांच्या वतीने संस्थेचे सचिव अजित वडगांवकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित “अभिष्टचिंतन सोहळा” तसेच “सुरेश वडगांवकर ज्ञानदीप शिष्यवृत्ती " वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष वेदांत सत्संग समितीचे अध्यापक ह. भ. प. कैलास म. येवले, प्रमुख उपस्थिती सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती खेड व जिल्हा परिषद पुणेचे सदस्य सभागृहनेते विजयसिंह शिंदे, महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण वित्त व नियोजन विभागाचे अधिक्षक कृष्णा ढाळे, शिक्षण आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य पुणे चे उपसंचालक काळे साहेब, नगरसेवक रामदास भोसले, आ.न.पा. मा. उपनगराध्यक्ष अशोक उमरगेकर, मनोहर दिवाणे, बाबूलाल घुंडरे ,गणेश दिवाणे, संगीता पाटील, विजया पाटील, बाबूलाल घुंडरे, संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, खजिनदार डॉ. दीपक पाटील, सदस्य अनिल वडगावकर, तुकाराम आण्णा गवारी, विद्यालयाचे प्राचार्य किसन राठोड, उपप्राचार्य प्रशांत सोनवणे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्रेणिक क्षीरसागर, सर्व विभागातील शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी व पालक आदी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये डॉ. दीपक पाटील यांनी तसेच अजित वडगावकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत "सुरेश वडगावकर ज्ञानदीप शिष्यवृत्ती" चा उद्देश स्पष्ट केला. व भविष्यात या गरीब गरजू, हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना यापेक्षा अधिक प्रमाणात शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली. तदनंतर संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांचा पारंपारिक पद्धतीने औक्षण व केक कापून मोठ्या थाटामाटात वाढदिवस साजरा करण्यात आला. अभिष्टचिंतन कार्यक्रमाचे औचित्य साधून उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते विद्यालयातील बालवाडी ते बारावी पर्यंतच्या एकूण १३८ हुशार, गरीब - गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना प्रत्येकी १०००₹ प्रमाणे “सुरेश वडगांवकर ज्ञानदीप शिष्यवृत्ती” चे वितरण करण्यात आले. सदर शिष्यवृत्ती अनिल वडगावकर कुटुंबीयांकडून १०१ विद्यार्थी, नंदकुमार वडगावकर यांच्या वतीने ११ विद्यार्थी, डॉ. दीपक पाटील यांच्या वतीने ६ विद्यार्थी, मनोहर दिवाणे व गणेश दिवाणे यांच्यावतीने ५ विद्यार्थी, संगीता पाटील यांच्या वतीने ५ विद्यार्थी तर विजया पाटील (घुंडरे) यांच्यावतीने ५ विद्यार्थी, रूपाली जोंधळे यांच्यावतीने पाच विद्यार्थी अशा या दात्यांकडून एकूण १३८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली. सुरेश वडगावकर, किसन राठोड, अशोक उमरगेकर यांनी अजित वडगावकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचे कौतुक केले. कृष्णा ढाळे व काळे साहेब यांनी शासनाच्या इतर शिष्यवृत्ती योजनांची माहिती दिली. व शिष्यवृत्ती हे बक्षीस नसून प्रेरणा आहे. या प्रेरणा व शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचा व परिवाराचा उद्धार करावा तसेच सध्याच्या दूषित वातावरणामध्ये पालकांनी आपल्या पाल्यांना योग्य ते संस्कार देऊन आदर्श नागरिक बनवण्याची गरज असल्याचे सांगितले. विजयसिंह शिंदे यांनी शिक्षण क्षेत्रातील बदलते धोरण, विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधा त्यात येणाऱ्या अडचणी याची माहिती दिली. तसेच या शिक्षणाच्या बाजारामध्ये श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था पवित्र काम करत असल्याने सर्व संस्था पदाधिकारी, वडगावकर परिवार, शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक करत अजित वडगावकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना अजित वडगावकर यांनी दरवर्षी न विसरता आठवणीने वाढदिवस साजरा केला जातो म्हणून संस्थेतील सर्व घटकांचे आभार व्यक्त केले. कैलास महाराज येवले यांनी अजित वडगावकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत विद्यालयातील अशा नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक करत श्री ज्ञानेश्वर विद्यालय विश्वविद्यालय होवो अशी प्रार्थना ईश्वराकडे केली. सूत्रसंचालन योगेश मठपती यांनी व प्रदीप काळे यांनी आभार व्यक्त केले. पसायदानाने सांगता झाली.

शिक्षण, समाजकार्य आणि नेतृत्वाचा प्रेरणादायी प्रवास आदरणीय श्री अजितशेठ वडगांवकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

🌸 🌸 श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे रा. का. सदस्य आदरणीय श्री अजितशेठ वडगांवकर यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना अभिष्टचिंतन करण्यात येत आहे.
शिक्षण क्षेत्रात कार्य करताना विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे, शैक्षणिक संस्थांच्या विकासासाठी दूरदृष्टी ठेवून कार्य करणारे आणि समाजहिताला नेहमीच प्राधान्य देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून श्री अजितशेठ वडगांवकर यांची ओळख निर्माण झाली आहे. अत्यंत साधेपणा, प्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख स्वभावामुळे त्यांनी समाजातील सर्व घटकांमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध व्हावी, तसेच शिक्षणासोबत संस्कारांचे महत्त्वही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. संस्थेच्या प्रगतीसाठी त्यांनी घेतलेले परिश्रम आणि केलेले नियोजन आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळामध्ये रा. का. सदस्य म्हणून कार्य करताना त्यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न शासन दरबारी प्रभावीपणे मांडण्याचे काम केले आहे. शिक्षण व्यवस्थेतील सकारात्मक बदल, शिक्षक-विद्यार्थ्यांच्या समस्या, संस्थांच्या अडचणी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत त्यांनी सातत्याने सक्रिय भूमिका बजावली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांनी वेळोवेळी त्यांचा गौरव केला आहे. समाजातील तरुणांना शिक्षण, संस्कार, शिस्त आणि सकारात्मक विचार यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात. त्यांचे नेतृत्व, निर्णयक्षमता आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची वृत्ती हीच त्यांच्या लोकप्रियतेची खरी ताकद मानली जाते. वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी, मित्रपरिवार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या पुढील आयुष्यास निरोगी आरोग्य, दीर्घायुष्य, भरभराट, यश आणि समाजसेवेची अधिक ऊर्जा लाभो, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. 🌺 हार्दिक शुभेच्छा! 🌺 शुभेच्छुक : ह.भ.प. श्री श्री श्रीमंत दादासाहेब करांडे संस्थापक अध्यक्ष श्री संत ज्ञानोबा तुकोबा विश्व भ्रमण दिंडी

Thursday, May 14, 2026

शिवकालीन युद्धकला व शिवसंस्कार उन्हाळी शिबीर सांगता समारंभ उत्साहात संपन्न

चऱ्होली mee24taas team नवजीवन स्पोर्ट्स फाउंडेशन, दिघी पुणे-१५ आयोजित शिवकालीन युद्धकला व शिवसंस्कार उन्हाळी शिबीराचा सांगता समारंभ दि. १३ मे २०२६ रोजी सनशाईन SS इंटरनॅशनल स्कूल,चऱ्होली येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
दि. ४ मे २०२६ ते दि. १३ मे २०२६ या कालावधीत चाललेल्या या १० दिवसीय शिबीरात खेळाडूंना शिवकालीन युद्धकला, मर्दानी खेळ आणि शिवसंस्कारांचे प्रशिक्षण देण्यात आले. या शिबीर मध्ये तीन दल बनवले तोरणादल, प्रतापगडदल, शिवनेरीदल असे गट तयार करून प्रत्येक दल चे सांगता शेवटी प्रात्यक्षिक करून घेतले.या शिबीर मध्ये महाराष्ट्र मधील प्रसिद्ध असे सह्याद्रीचे भुते ट्रेकर्स चे अध्यक्ष आणि दुर्गशतकवीर श्री राज दादा तपसे यांनी शिबीर मध्ये भाग घेऊन प्रशिक्षण घेतले. सांगता समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिबीर मधील सर्व खेळाडूंचे पालक उपस्थित होते. पालकांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष स्नेह आणि प्रोत्साहन लाभले. यावेळी शिबीराचे मार्गदर्शक श्री. उदयभाऊ गायकवाड , सनशाईन स्कूल, प्रशिक्षक सौ. दिपाली जयेश पाटील, आणि नवजीवन स्पोर्ट्स फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. शिबीरात प्रशिक्षण घेतलेल्या खेळाडूंनी शिवकालीन युद्धकलेचे प्रात्यक्षिक सादर केले. खेळाडूंनी दाखवलेली शिस्त, ताकद आणि कौशल्य पाहून उपस्थित पालक व रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, "शिवकालीन युद्धकला आणि संस्कार हे आपल्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहेत. अशा शिबीरांमधून मुलांमध्ये शिस्त, आत्मविश्वास आणि देशाभिमान निर्माण होतो." पुढेही हा क्लास सुरु राहणार आहे असे कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी सर्व खेळाडूंना प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले. नवजीवन स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने प्रशिक्षक, पालक, सनशाईन स्कूल प्रशासन आणि उपस्थितांचे आभार मानण्यात आले.

Tuesday, May 12, 2026

महाराष्ट्र तेजोत्सव" कैवल्यवारी - पावलांची संगीत वारी कार्यक्रमाचे महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या वतीने आळंदीत आयोजन

आळंदी पुणे प्रकाश, कला आणि संस्कृतीचा उत्सव महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग,आळंदी नगरपरिषद, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान व आळंदी ग्रामस्थ आणि आय रियालिटीज या संस्थेचे प्रसाद आसगावकर यांच्या संयुक्त विद्यमाने आळंदी देवाची येथे आयोजित करण्यात आलेल्या “महाराष्ट्र तेजोत्सव २०२६” अंतर्गत “कैवल्यवारी – पावलांची संगीत वारी” या सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी १२ मे ते १४ मे रोजी सायं ७:३० वाजता इंद्रायणी घाटावर रंगणार आहे. प्रकाश, कला आणि संस्कृतीचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी भाविक व रसिकांची मोठी गर्दी होणार आहे.
१२ मे रोजी सायं ७:०० वाजता “महाराष्ट्र तेजोत्सव” कार्यक्रमाचे उद्घाटन इंद्रायणी घाट, देवाची आळंदी येथे होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी ७.३० वाजता “कैवल्यवारी – पावलांची संगीत वारी” या विशेष संगीत मैफलीत सुप्रसिद्ध गायिका अंजली मराठे, रश्मी मोघे आणि युवा गायक अक्षय घाणेकर आपल्या सुरांनी वातावरण भक्तिमय करणार आहेत. अभंग, भारूड आणि वारकरी संगीतातून भक्तिरसाची अनुभूती रसिकांना मिळणार आहे. १३ मे रोजी संध. ७.३० वा. संगीताचार्य डॉ. वृशाली शरांग दाबके आणि त्यांच्या शिष्यांचा विशेष संगीत कार्यक्रम रंगणार आहे. वारकरी संप्रदायातील अभंग, नृत्यनाट्य आणि सांस्कृतिक सादरीकरणांच्या माध्यमातून भक्ती आणि संस्कृतीची अनोखी मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे. आणि १४ मे रोजी सं. ७.३० वा. राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त तरुण भारूडकार कृष्णाई उळेकर यांचा भारूड कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विनोद, समाजप्रबोधन आणि अध्यात्म यांचा संगम असलेले भारूड सादरीकरण प्रेक्षकांचे विशेष आकर्षण ठरणार आहे. इंद्रायणी घाट परिसरात होणाऱ्या या तीन दिवसीय सांस्कृतिक सोहळ्यामुळे आळंदी नगरी भक्ती, संगीत आणि संस्कृतीच्या तेजाने उजळून निघणार असून नागरिकांनी व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आळंदी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत दादा कुऱ्हाडे व श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त ह.भ.प.चैतन्य महाराज लोंढे (कबीर बुवा) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Sunday, May 3, 2026

वारकरी संप्रदायातील पहिलेच बालसाहित्याचे दिमाखात प्रकाशन; 'माऊलींची गोष्ट'

देहू: वारकरी संप्रदायाची तेजस्वी परंपरा आणि संत विचार नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशाने 'यु.एस.ओ. वारकरी' (USO Warkari) निर्मित 'माऊलींची गोष्ट' या विशेष बालसाहित्य पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज महाराष्ट्र दिनानिमित्ताने श्रीक्षेत्र देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थानमध्ये उत्साहात पार पडला. ह.भ.प. अनिकेत महाराज मोरे देहूकर , पूनम खंडागळे आणि इंग्रजी भाषेत कल्याणी पांडे यांनी या पुस्तकाचे लेखन केले असून, अनिषा शिंदे, किरण बोडा, प्रतीक्षा मोरे आणि वेदांत राजे यांनी या पुस्तकासाठी आकर्षक रेखाटने साकारली आहेत.
या पुस्तकाचे प्रकाशन ह.भ.प. प्रभू महाराज माळी (सचिव, संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, अरण) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी मनोगत व्यक्त करताना महाराज म्हणाले की, "वारकरी संप्रदायातील हे पहिलेच बालसाहित्य प्रकाशित होत असल्याचा सार्थ अभिमान वाटतो. यु.एस.ओ. वारकरीच्या माध्यमातून सर्व संतांचे साहित्य बालकांसाठी उपलब्ध करून दिले जात आहे, ही अभिनंदनीय बाब असून हे पुस्तक घराघरांत आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे." संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त ह.भ.प. उमेश महाराज मोरे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, "या पुस्तकामुळे बालसाहित्यात खऱ्या अर्थाने एक मोलाची भर पडली आहे. लहान मुलांना संत ज्ञानेश्वर महाराजांचे चरित्र समजून घेण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरेल." देहू नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा सौ. प्रियांका मोरे यांनी यावेळी आवाहन केले की, "बालकांवर सुसंस्कार करणारी अशी पुस्तके सर्वत्र पोहोचली पाहिजेत, ज्यामुळे मुलांमध्ये वाचनाची आवडदेखील निर्माण होईल." कार्यक्रमाचे विशेष अतिथी आणि अभंग स्कूलचे प्रमुख मा. विकास कंद यांनी आपले विचार मांडले. ते म्हणाले, "वारकरी संतांचे ओवी आणि अभंग स्वरूपातील गहन तत्त्वज्ञान आजच्या बालकांसाठी यु.एस.ओ. वारकरीच्या माध्यमातून अत्यंत सोप्या आणि रसाळ मराठी भाषेत उपलब्ध करून दिले आहे. यामुळे मुलांना आपली संस्कृती समजणे सुलभ होईल." या पुस्तकाचे लेखक अनिकेत महाराज मोरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले “आज महाराष्ट्र दिनानिमित्त मराठी भाषेमध्ये आणखी नवीन मराठी बालसाहित्याची भर पडली याचा अत्यंत आनंद आमच्या यु.एस.ओ. वारकरी टीमला होत आहे. या पुस्तकाचा आपण सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा.” या सोहळ्याला संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त ह.भ.प. वैभव महाराज मोरे, ह.भ.प. लक्ष्मण महाराज मोरे, तसेच मा. सचिन कुंभार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. देहू नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. पुजा दिवटे, माजी नगराध्यक्षा स्मिता चव्हाण यांनीही या ऐतिहासिक उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. मराठी, इंग्रजी आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये उपलब्ध असलेले हे साहित्य मुलांसाठी 'संस्कारांची खाण' ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. या उपक्रमाची अधिक माहिती www.usowarkari.org या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

Thursday, April 23, 2026

श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्यु. कॉलेज या प्रशालेला तालुकास्तरीय गुणवत्ता संवर्धन अभियानअंतर्गत प्रथम क्रमांक

प्रतिनिधी-पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2025-26 मध्ये घेण्यात आलेल्या गुणवत्ता संवर्धन अभियानांतर्गत तालुकास्तर गट अ इयत्ता पाचवी ते बारावी या गटामध्ये खेड तालुक्यातून श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर विद्यालय व जु.कॉलेज आळंदी देवाची या शाळेची प्रथम क्रमांकासाठी निवड करण्यात आली. तालुकास्तरीय समितीने खेड तालुक्यातील सर्व शाळांची तपासणी करून ही निवड केली.
पुरस्कार वितरण सोहळ्याचा समारंभ गुरुवार दि. 23 एप्रिल 2026 रोजी गणेश कला क्रीडा मंच पुणे येथे संपन्न झाला. या सोहळ्यासाठी शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. पुरस्काराचे वितरण महेश पालकर - शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य, डॉ. गणपत मोरे - उपसंचालक, पुणे विभाग, डॉ. भाऊसाहेब कारेकर - शिक्षणाधिकारी माध्य. शिक्षण विभाग पुणे जिल्हा परिषद , मुख्याध्यापक संघाचे राज्य सचिव नंदकुमार सागर, जिल्हाध्यक्ष प्रसाद गायकवाड व इतर मान्यवरांच्या हस्ते/ प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला.संस्कारक्षम, उपक्रमशील , दर्जेदार शिक्षण, धार्मिक व अध्यात्मिक ज्ञानाची जोड, कला व क्रीडा क्षेत्रात अग्रस्थानी असणाऱ्या या शाळेच्या यशात सर्व विद्यार्थी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक, प्रशासन व संस्था पदाधिकारी या सर्वांचा सहभाग होता. या सर्वांच्या वतीने संस्था सचिव अजित वडगावकर,किसन ह.राठोड - प्राचार्य, पर्यवेक्षिका अनिता गावडे,संजय उदमले, विकास शिवले, अल्लाबक्ष मुलानी, गोविंद निळे यांनी हा पुरस्कार स्विकारला.

Wednesday, April 22, 2026

श्रीमंत दादासाहेब यांची माहिती

*श्रीमंत दादासाहेब करांडे* हे पुणे येथील एक उद्योगपती, समाजसेवक आणि आध्यात्मिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. *मुख्य माहिती:*
*1. उद्योग व नेतृत्व* - *Shrimant Bharat Group* आणि *D.K. Group of Industries* चे सीईओ आहेत - नोकरी निर्मिती, आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्य विकासावर भर 7753 *2. शिक्षण व कौशल्य विकास* - *श्रीमंत दादासाहेब करांडे स्कील डेव्हलपमेंट सेंटर, पुणे* चालवतात - विद्यार्थ्यांना उद्योगाच्या मागणीनुसार प्रशिक्षण, कम्युनिकेशन स्किल्स, लीडरशिप वर्कशॉप घेतात - श्री विश्वशांती जगद्गुरू सेवा संस्थेशी संलग्न *3. आध्यात्मिक व सामाजिक कार्य* - *श्रीमंत ज्ञानोबा-तुकोबा विश्वभ्रमण दिंडी* - संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराजांच्या पादुका लंडनसह 18 देशांत नेल्या. विदेशातील भारतीयांना दर्शन घडवले - *साने चत्रपती शासन अध्यात्मिक अधिका, पश्चिम महाराष्ट्र* राज्य संघटनेशी संबंधित - आळंदी येथे मकर संक्रांत, षटतिला एकादशी निमित्त इंद्रायणी महाआरती, महिलांसाठी हळदी-कुंकू सारखे उपक्रम 7753 *4. जागतिक प्रवास व प्रेरणा* - 18 देशांचा प्रवास केला. भारतीय संस्कृती व परंपरांचा प्रसार - युवकांना उद्योग, अध्यात्म आणि समाजकारण यांचा समतोल साधण्याची प्रेरणा देतात तुम्हाला दादासाहेबांच्या कोणत्या विशिष्ट कामाबद्दल जाणून घ्यायचं आहे? स्किल डेव्हलपमेंट सेंटर, विश्वभ्रमण दिंडी, की उद्योगाबद्दल?

Friday, April 17, 2026

वारकरी संप्रदायात ‘घुसखोरी’चा आरोप; राष्ट्रवादी (पवार गट)ची २० कीर्तनकारांची यादी जाहीर, बुलढाण्यातील तिघांवर लक्ष

आळंदी/पुणे, प्रतिनिधी:Mee24Taas Digital Media शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (पवार गट)कडून वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी झाल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर पवार गटाकडून २० कीर्तनकार व कथावाचकांची यादी जाहीर करण्यात आली असून, त्यांना “घुसखोर” असल्याचा दावा करण्यात आला आहे.
पवार यांनी यापूर्वी केलेल्या वक्तव्यात वारकरी संप्रदायात काही धर्मांध व प्रतिगामी विचारांचे लोक शिरकाव करत असून, त्यामुळे समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याचे म्हटले होते. या विधानानंतर विविध स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. दरम्यान, जाहीर करण्यात आलेल्या यादीत उत्तर भारतातील कथावाचकांसह महाराष्ट्रातील काही कीर्तनकारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. यात प्रदीप शर्मा, कालीचरण महाराज, धीरेंद्र शास्त्री (बागेश्वर बाबा), स्वामी आनंद स्वरूप यांच्यासह महाराष्ट्रातील अनेकांची नावे असल्याचा दावा करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील जाहीर नावे: किशोर व्यास (गोविंद देवगिरी), चारुदत्त आफळे, बंडातात्या कराडकर, प्रकाश जवंजाळ, तुषार भोसले, अक्षय भोसले, संग्राम भंडारे, योगी निरंजन, एकनाथ सदगिर, ज्ञानेश्वर जळकीकर, संजय पाचपोर, भास्करगिरी महाराज (देवगड), संजय नाना धोंडगे, राणा वास्कर, चंद्रशेखर देगलूरकर, उद्बोध पैठणकर, शाम राठोड, किशोर शिवनीकरण, रामगिरी महाराज, निरंजन कोटेकर. बुलढाणा जिल्ह्याकडे विशेष लक्ष: या यादीत बुलढाणा जिल्ह्यातील तीन कीर्तनकारांचा समावेश झाल्याने स्थानिक पातळीवर चर्चांना उधाण आले आहे. चिखली तालुक्यातील नायगावचे प्रकाशबुवा जवंजाळ, खामगाव तालुक्यातील शिर्ला नेमाने येथील संजय महाराज पाचपोर आणि देऊळगावराजा येथील उद्बोध पैठणकर यांची नावे समाविष्ट आहेत. स्थानिक प्रतिक्रिया काय? बुलढाणा जिल्ह्यातील वारकरी वर्तुळातून या यादीबाबत मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी या आरोपांना राजकीय रंग असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी वस्तुनिष्ठ चौकशीची मागणी केली आहे. पार्श्वभूमी व निरीक्षण: स्थानिक पातळीवर मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाशबुवा जवंजाळ यांनी यापूर्वी विधानसभा निवडणुकीत सहभाग घेतला असला, तरी त्यांच्या कीर्तनातून राजकारण दूर ठेवण्याचा प्रयत्न दिसून येतो. तसेच, संबंधित तिन्ही कीर्तनकारांचा वारकरी संप्रदायाशी दीर्घकाळ संबंध असून त्यांनी सामाजिक क्षेत्रातही कार्य केले आहे. त्यांच्याकडून वादग्रस्त किंवा चिथावणीखोर वक्तव्यांची उदाहरणे फारशी आढळत नाहीत, असेही स्थानिकांचे म्हणणे आहे. निष्कर्ष: या संपूर्ण प्रकरणामुळे वारकरी संप्रदाय, राजकारण आणि विचारसरणी यांचा संगम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पुढील काळात यावर राजकीय तसेच सामाजिक पातळीवर कोणत्या प्रतिक्रिया उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Tuesday, April 14, 2026

श्री ज्ञानेश्वर विद्यालयात संयुक्त जयंती समारंभ उत्साहात संपन्न

आळंदी देवाची : श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित, श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्यु. कॉलेजमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, संत गाडगेबाबा आणि भगवान महावीर या महापुरुषांची संयुक्त जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी संस्थेचे सचिव अजित वडगांवकर, प्राचार्य किसन राठोड, मुख्याध्यापक प्रदीप काळे, पर्यवेक्षिका हेमांगी उपरे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे सचिव अजित वडगांवकर यांनी आपल्या मनोगतातून महापुरुषांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, भगवान महावीर यांनी विश्वाला अहिंसेचा संदेश दिला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवलेल्या संविधानामुळे भारतातील लोक गुण्या-गोविंदाने राहत आहेत आणि भारत देश प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत असून ते संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक ठरत आहे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्त्री शिक्षणातील कार्यामुळे महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली झाली, तर राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी स्वच्छतेचा संदेश देत “देव माणसात आहे” ही शिकवण दिली. तसेच महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण करण्याचा संदेश यावेळी दिला. या प्रसंगी हेमांगी उपरे व सूर्यकांत खुडे यांनीही आपले विचार मांडले. तसेच संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. योगेश मठपती यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.