संवादतंत्रामध्ये भाषिक संवादासोबतच
देहबोली व इतर गोष्टींचा समावेश होतो. एकात्मिक संवाद कौशल्ये प्रशिक्षण
वापरून सेल्फहूड ने संवाद कौशल्याना विकसित करणारी प्रभावी तंत्रे विकसित
केली आहेत.
प्रभावी पद्धतीने संवाद साधणे आणि
उत्कृष्ट संवादक म्हणून जगासमोर येणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु,
नक्की स्वतःच्या संवाद कौशल्यांमध्ये काय कमी आहे आणि त्यावर काय प्रकारचे
प्रशिक्षण व सल्ला आवश्यक आहे ते सांगितले जात नाही. त्याचवेळी जेव्हा इतर
प्रभावी संवाद करणारे लोक पहिले की स्व-प्रतिमा जाणीवपूर्वक कमी लेखणे
किंवा न्यूनगंड तयार होणे असे प्रकार सुरु होतात. एकूणच, वेळीच हाताळली
गेली नाही तर संवाद समस्या ही व्यक्तीला आणखी किचकट मानसिक व सामाजिक तसेच
व्यावसायिक समस्यांमध्ये घेऊन जाऊ शकते.
या सर्व समस्यांवर आभ्यासात्मक आणि
ज्ञानाधारीत सेवा जसेकी समुपदेशन, व्यक्ती-केंद्रीत मार्गदर्शन व सल्ला,
कार्यशाळा इत्यादी प्रकारे उपाय देण्यात येतात. संवाद कौशल्य समस्या या
शक्य तितक्या तरुण आणि शालेय वयोगटात असताना सुधारवल्या तर नंतरच्या
आयुष्यात गंभीर संवाद कौशल्य समस्यांना तोंड द्यावे लागत नाही अशी
‘सेल्फहूड’ची भूमिका आहे. वेगवेगळ्या व्यावसायिक गटांसाठी जसेकी शिक्षक,
वकील, डॉक्टर्स, क्लास चालक, छोटे उद्योजक व व्यावसायिक यांना विशेष सेवा
पुरवल्या जातात.
शिक्षक
- विद्यार्थ्यांमध्ये भाषा शिक्षण कौशल्य वाढवणे
- शिक्षकांसाठी आवश्यक भाषा शिक्षण कौशल्ये
- प्रभावी शैक्षणिक प्रक्रियेसाठी आवश्यक संवाद तंत्रे
- शिक्षकांसाठी समुपदेशन कौशल्ये
- विद्यार्थ्यांची देहबोली समजून घेणे
- परस्परसंवादी शिक्षण प्रक्रीया
- वेगवेगळ्या शिकवण्याच्या पद्धतींसाठी आवश्यक संवाद कौशल्ये
- शिक्षक-विद्यार्थी संवादांमधील अंतर कमी करणे
- सोशल मिडियाच्या वापरातून प्रभावी शिक्षण प्रक्रीया तयार करणे
विद्यार्थी
- आवश्यक इंग्लिश संभाषण कौशल्ये
- मुलाखतीचा सामना कसा करावा?
- प्रभावी गट-चर्चा घडवण्यासाठी आवश्यक कौशल्ये
- देहबोली आणि संवांद प्रक्रीया
- सकारात्मक अभिव्यक्ती कौशल्ये
- सर्जनशील आणि वैचारीक संवाद पद्धती
- सार्वजनिक संभाषण कौशल्ये व भाषण तंत्र
- संभाषणातील भीती व गोंधळ दूर करणे
व्यावसायिक
- यशस्वी व्यावसायिक संवादतंत्रे
- कामाच्या ठिकाणी सामोपचाराचे संवाद वातावरण ठेवणे
- व्यावसायिक प्रगतीसाठी सोशल मिडिया संवाद तंत्रे
- टिम वर्क आणि संवाद तंत्रे
- यशस्वी बिझनेस प्रेझेन्टेशन
- प्रभावी मतभेद हाताळणी
- व्यावसायिक यशासाठी आवश्यक व प्रभावी इंग्लिश संभाषण कौशल्ये
अतिरिक्त संवाद तंत्रे
- सौख्यपूर्ण नातेसंबंधासाठी आवश्यक संवादतंत्रे
- प्रभावी भाषण कौशल्ये
- कोणत्याही प्रकारच्या मुलाखती यशस्वीपणे हाताळणे
- कथा-कथन, निरुपण, कीर्तन व इतर लोकसंवाद माध्यमे
- पालक-पाल्य संवांद तंत्रे
वरील निर्देशक मुद्द्यांसोबतच अनेक
प्रकारची संशोधित प्रशिक्षण सत्रे व सल्ला तसेच मार्गदर्शन व समुपदेशन
यांच्या माध्यमातून सेल्फहूड विविध प्रकारच्या आधुनिक सेवा पुरवते.
आपल्या विशिष्ट प्रकारच्या संवाद समस्येसाठी आमच्याशी जरूर संपर्क साधा.
No comments:
Post a Comment