SHRIMANT

Monday, September 4, 2023

शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती,प्रधानमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आज देशभरात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात आहे. मुलांच्या जीवनाला आकार देणाऱ्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती,प्रधानमंत्र्यांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 च्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांशी, आपल्या अधिकृत निवासस्थानी संवाद साधला. यात ७५ पुरस्कारप्राप्त शिक्षक सहभागी झाले होते. देशांतील तरुणांच्या मनांचं संगोपन करण्यात शिक्षकांची भूमिका महत्वाची असते असं सांगत शिक्षक घेत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. या चर्चेत, प्रधानमंत्र्यांनी, समाजात शिक्षकांचं असलेलं महत्त्व आणि देशाचं भवितव्य घडवण्यात त्यांची असलेली महत्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. दरम्यान, आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचं वितरण करण्यात येणार आहे.

No comments: