SHRIMANT
- श्री संत ज्ञानोबा तुकोबा विश्वभ्रमण दिंडी सोहळा दुबई २०२२
- श्री विश्वशांती जगद्गुरू सेवा संस्था
- सूत्रसंचालन
- "भाषण कला शिका "
- ऑनलाईन बँक खाते
- भाषणासाठी विषय निवडताना
- वक्तृत्व कला
- सर्वांगीण दृष्टी
- संवाद तंत्र
- करीअर
- होमी मिनिस्टर LIVE
- विदेश दौरे
- मी श्रीमंत आहे live show
- सूत्रसंचालनासाठी उपयुक्त चारोळ्या
- पुस्तके का वाचावीत
- सूत्रसंचालन
- मीडिया
- कामगार पुरस्कार सोहळा
- LIVE मुलाखत
- तिरुपती बालाजी दर्शन
- मराठी देशा
- विवेकानंदांची अतिशय महत्त्वाचे वाक्ये
- चांगले विचार
- ई- Paper वर्तमानपत्रे
- उपयोगी छोट्या कथा
- निवडक बोधकथांचा एक संग्रह
- फक्त विनोद - Only Jokes
- वक्तृत्व
- योगासने
- वाढदिवसाच्या शुभेच्छा
- Youtube
- News Blog
Wednesday, March 20, 2024
'श्री श्री ज्ञान विकास केंद्र' म्हणजेच... 'आनंदी जीवन जगण्याची एक कला' आहे
"शुभम करोती कल्याणम्!
आरोग्यम धन संपदा!!"
. जी कला या केंद्राच्या संपर्कात आल्याशिवाय समजत नाही. हे आवर्जून सांगितले पाहिजे. तर... तुम्हाला सांगितलेच पाहिजे, की... आम्ही या कार्यशाळेत कसे पोहोचलो? दिघीतील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिवाई नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अर्थात आमचे मार्गदर्शक मा. संजयभाऊ गायकवाड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध ग्रुपवर मेसेज पाठवून सदर कार्यक्रमाची माहिती दिली होती. ज्यामुळे मी उत्तम घुगे या कार्यशाळेत सहभागी झालो आहे. म्हणून... प्रथमतः आदरणीय मार्गदर्शक संजयभाऊ गायकवाड आणि कार्यक्षम नगरसेविका मा. निर्मलाताई गायकवाड यांचे हार्दिक अभिनंदन करत त्यांचे धन्यवाद अदा करतो.
'ज्ञान विकास केंद्र' हि एक अजब संस्था आहे. अण्... येथील स्वयंसेवक म्हणजे तसेच अजब रसायनांनी परिपूर्ण आहेत. होय... भल्या पहाटे कसले मध्यरात्री या लोकांत ऐवढा उत्साह कुठून येतो..? हा प्रश्न पहिल्या दिवशी माझ्या मनात निर्माण झाला होता. शेकडो स्वयंसेवक कोणी गाडी पार्किंग व्यवस्थेवर लक्ष ठेवण्याता गुंतलेले आहेत. कोणी रांगेत उभे राहण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. कोणी रजिस्ट्रेशन करण्याची जबाबदारी निभावत आहेत. कोणी आयकार्ड हातावर ठेवून बॅचप्रमाणे लावायला सांगत आहेत. कोणी फोटो काढण्यात व्यस्त आहेत. कोणी पादत्राणे व्यवस्थित ठेवण्यासाठी सांगत आहेत. कोणी पिण्याच्या पाण्याच्या बाॅटल वाटत आहेत. कोणी मोबाईल टाॅर्चचा उजेड धरून रस्ता दाखवत आहेत. कोणी प्रत्येक सहभागी व्यक्तींना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात गर्क होत आहेत. बाप रे बाप..! प्रत्येकजण आपल्यावर सोपवलेली जबाबदारी तेवढ्याच जबाबदारीने आणि मनापासून आनंदाने निभावत होता. खरोखरच करावे तेवढे कौतुक आणि मानावे तेवढे आभार कमीच आहेत. हिच माझी वैयक्तिक भावना आहे.
उत्कृष्ट बैठक व्यवस्था तसीच उत्कृष्ट असलेली नियमावली आणि साउंड सिस्टीम एकदम सुंदर नियोजन आहे. हे पाहून आपल्या अर्थात सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या मनाची मरगळ कुठल्या कुठे पळून जाते..? जी शोधूनही सापडत नाही. अण्... आपण स्वतःला त्या कार्यशाळेच्या स्वाधीन करतो. येथेच आपण आनंदाच्या डोहात उडी टाकतो. तेच मुळी या आनंदलहरींचा मनमुरादपणे उपभोग घेण्यासाठी आणि हळूहळू रममाण होऊन जातो. सुखी तथा आनंदी जीवन जगण्याची कला आत्मसात करण्याची हिच जणू सुरुवात होते. सुरवातीला भजन सुरू होते. अंधारात एकाग्र चित्ताने आरामात बसून भजण ऐकण्यात वेगळीच मजा आहे. हे येथे कळून चुकते. त्यानंतर... हलकेफुलके व्यायाम प्रकार करतानाच जीवनात छोट्या छोट्या गोष्टी कशा आनंद प्रदान करतात? नव्हे - नव्हे तर... या गोष्टीतून आपण आनंद कसा लुटू शकतो? या प्रश्नांची उत्तरे मार्गदर्शनाच्या रुपात उपस्थितांना आनंदाचा क्षणोक्षणी प्रत्यय देत असतात. यानंतर सर्वांकडून आपापल्या शरीरयष्टीनुसार आणि जमेल तसे प्राणायाम करून घेतले जातात. याचा आपल्या मनाला आणि शरीराला होणारा फायदा सांगताना, हसण्यासाठी भाग पाडणारे विनोदही निर्माण होत राहतात. ज्यामुळे... कोणताही तणाव उपस्थितांच्या आसपास फिरकत नाही.
बरं का मंडळी..! अगदी आपल्या बेडरूममध्ये देखील बसल्या - बसल्या सहजासहजी आपण करू शकतो. असे ध्यान आणि योगाचे सोपे प्रकार आहेत. त्यांच्यावर प्रकाशझोत टाकला जातो. जो टाकण्यात व्यासपीठावरील योगाचार्य तथा गुरुदेव देवर्षी दिवाकर जी हे पटाईत आहेत. होय म्हणजेच अगदी निश्णात आहेत. यानंतर... संगीत लावले जाते. जे संगीत माणवी जीवनात अमुलाग्र बदल घडवू शकते. यामुळे... गुरुदेव यास 'खरे जीवन' संबोधतात. म्हणून... यावेळी आपापल्या परीने आपल्या मनात निर्माण होणाऱ्या लहरींवर थीरकण्यास सर्वांना मुक्त स्वातंत्र्य दिले जाते. अण्... लहान-थोर, अबाल-वृद्ध आणि स्त्री-पुरूष सर्वजण मनसोक्त नाचण्याचा आनंद लुटतात. ॐ चा घुमणारा आवाज आणि त्यात मिसळणारा आपला स्वर आपल्या मनात एक वेगळीच चेतना निर्माण करतो. जीवनातील रडगाण्याचे वेगवेगळे कप्पे अर्थात काळाच्या ओघात मलीन झालेल्या आणि तथ्यहीन असणाऱ्या विचारांसह त्यांच्या सेव्ह फाईल्स एकापाठोपाठ एक मनातून डिलीट होऊ लागतात. ज्यांची जागा अनेक सुंदर विचार आणि ध्यान धारणेसह व्यायाम प्रकार घेऊ लागतात. अण्... माणूस म्हणून वेगळ्या पद्धतीने आपण स्वतःला ओळखू शकतो. हा आत्मविश्वास निर्माण होतो.
चिंता आणि तणाव जे अनेक आजारांना पोषक असतात. त्यांच्यापासून मुक्ती येथे मिळते. चिडचिड आपोआप दूर होते. आळसापासून मुक्ती मिळत कार्यक्षमता वाढते. शरीर, मन आणि बुद्धी यांची तंदूरूस्ती अनुभवता येते. प्रसन्नतेने भारलेल्या वातावरणात आपणही प्रसन्न होऊन जातो. अशा या कार्यशाळेतील शेवटच्या सत्रात... अनमोल जीवन जगण्यासाठी आहार, विहार तथा विचार यावर मार्गदर्शन होते. अण्... या सुंदर पहाटेचा तो आनंदलहरींनी व्यापलेला भाग संपून जातो. असो... काल म्हणजे सोमवारी सुरू झालेली ही सुंदर कार्यशाळा सात दिवसांची आहे. पहाटे लवकर उठावे लागते. एवढी एकच बाब सोडली? तर... जीवनातील अनेक गोष्टीत दडलेला आनंद या ठिकाणी अनुभवायला मिळतो. असे... म्हणायला मुळीच हरकत नाही! यानंतर... जर कुठे अशी कार्यशाळा आयोजित केली गेली? तर... तुम्ही देखील जरूर अनुभव घ्या! एवढाच आवर्जून आग्रह करतो. जय गुरुदेव!
----------ॲड. उत्तम घुगे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment