SHRIMANT

Tuesday, July 9, 2024

नवी दिल्ली 9 जुलै 2024 विश्वकल्याण उपक्रम - ग्लोबल वेल बीइंग प्रोग्राम - हेल्दी रिपब्लिक ऑफ फिजी कार्यक्रम बैठक यशस्वी

नवी दिल्ली 9 जुलै 2024 विश्वकल्याण उपक्रम - ग्लोबल वेल बीइंग प्रोग्राम - हेल्दी रिपब्लिक ऑफ फिजी कार्यक्रम बैठक यशस्वी
निसर्गसंपन्न फिजी देशात मधुमेह, ह्रदय विकार, कर्करोग या सारखे आजारांनी प्रचंड ग्रासले आहे. आजारमुक्त देश या ऊपक्रमा साठी विश्वकल्याण ऊपक्रमाचे संशोधक विविध देशांबरोबर कार्य करीत आहेत. या संदर्भात पुणे येथील डॉ.राजेंद्र मोरे आणि संशोधकांच्या समुहाने रिपब्लिक ऑफ फिजीला जुन महिन्यात अभ्यास दौरा केला होता. त्यांनी फिजी सरकारचे अधिकारी, पंतप्रधान, उपपंतप्रधान, डॉक्टर, एनजीओ, फिजीमधील भारतीय दूतावास यांच्याशी चर्चा आपल्या अभ्यासदौर्याबाबत चर्चा केली. पुढील कामकाजाचा भाग म्हणून डॉ राजेंद्र मोरे यांनी भारतातील फिजीच्या हाय कमिशन सोबत अधिकृत बैठक आयोजित केली होती. ही बैठक 9 जुलै 2024 रोजी नवी दिल्लीतील फिजी उच्चायुक्तालय व विश्वकल्याण ऊपक्रमाच्या संशोधकांबरोबर पार पडली. बैठकी मधे - रोगमुक्त निरोगी फिजी. रोगमुक्त आरोग्यदायी फिजी , फिजी मधील जनजीवन ऊंचविण्यासाठी विविध ऊपक्रम, शिक्षण, संशोधन , शास्रीय ध्यान ईत्यादी ऊपक्रमाबाबत चर्चा झाली. विश्वकल्याण ऊपक्रम संशोधक, शास्त्रज्ञ , हितचिंतक यांच्या सहकार्याने विश्वकल्याण आता विविध देशात सेवा देण्यासाठी सक्षम होत आहे.
डॉ. राजेंद्र मोरे, आंतरराष्ट्रीय कार्यक्रम संयोजक-विश्वकल्याण, आणि संचालक ओएसिस काँसेलर्स आणि आंतरराष्ट्रीय संस्कृत विद्वान डॉ सतीश कुमार शास्त्री व समूह १४ दिवसांच्या फिजी दौऱ्यावर होते. त्यांच्या अभ्यास दौऱ्यामुळे हि बैठक यशस्वी होण्यासाठी मदत झाली. या बैठकीत महामहिम जगन्नाथ सानी, उच्चायुक्त रिपब्लिक ऑफ फिजी , आदरणीय नीलेश रोनील कुमार, कॉन्सलोर रेपब्लिक ऑफ फिजी, इलिया सेवुतिया द्वितीय सचिव फिजी उच्चायुक्त नवी दिल्ली ,डॉ राजेंद्र मोरे आंतरराष्ट्रीय कार्यक्रम संयोजक विश्वकल्याण उपक्रम, डॉ सतीश शास्त्री आंतरराष्ट्रीय संस्कृत विद्वान, आंतरराष्ट्रीय कार्यक्रम समन्वयक विश्वकल्याण उपक्रम , श्री सुरेंद्र अरोरा दिल्ली योग संशोधक, स्वयंसेवक विश्वकल्याण उपक्रम व अनिल रामचंद्र घनवट मुख्य शास्त्रज्ञ विश्वकल्याण उपक्रम आदी उपस्थीत होते.