SHRIMANT

Friday, July 26, 2024

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मी सेवेकरी सोशल फाऊंडेशन ची तहसीलदारांकडे मागणी

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मी सेवेकरी सोशल फाऊंडेशन ची तहसीलदारांकडे मागणी
*#अतिवृष्टीमुळे खेड तालुक्यातील नुकसान झालेल्या पिकांचा व घरांचा अहवाल सादर करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा मा. तहसीलदार यांनी दिले आदेश*# गेले काही दिवस खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहेत. ह्या भागातील भात, भुईमूग, सोयाबीन सारखी पिके वाहून गेली आहेत. घरांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. मोठ्या आर्थिक नुकसानीमुळे हताश झालेल्या शेतकरी वर्गाच्या पाठीशी मी सेवेकरी सोशल फाउंडेशन खंबीरपणे उभे आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी आज मा. तहसीलदार खेड यांना निवेदन देऊन त्वरित पाऊले उचलण्याची विनंती करण्यात आली. मा. तहसीलदार ज्योती देवरे मॅडम यांनी देखील ह्या रास्त मागणीचा गांभीर्याने विचार करून सदर नुकसान भरपाईचा तत्काळ अहवालlतयारलकरण्यासाठी समिती नेमली असून लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी पाऊले उचली आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यावी. आपलाच सुधीर विठ्ठल मुंगसे संस्थापक अध्यक्ष, मी सेवेकरी सोशल फाऊंडेशन

No comments: