SHRIMANT
- श्री संत ज्ञानोबा तुकोबा विश्वभ्रमण दिंडी सोहळा दुबई २०२२
- श्री विश्वशांती जगद्गुरू सेवा संस्था
- सूत्रसंचालन
- "भाषण कला शिका "
- ऑनलाईन बँक खाते
- भाषणासाठी विषय निवडताना
- वक्तृत्व कला
- सर्वांगीण दृष्टी
- संवाद तंत्र
- करीअर
- होमी मिनिस्टर LIVE
- विदेश दौरे
- मी श्रीमंत आहे live show
- सूत्रसंचालनासाठी उपयुक्त चारोळ्या
- पुस्तके का वाचावीत
- सूत्रसंचालन
- मीडिया
- कामगार पुरस्कार सोहळा
- LIVE मुलाखत
- तिरुपती बालाजी दर्शन
- मराठी देशा
- विवेकानंदांची अतिशय महत्त्वाचे वाक्ये
- चांगले विचार
- ई- Paper वर्तमानपत्रे
- उपयोगी छोट्या कथा
- निवडक बोधकथांचा एक संग्रह
- फक्त विनोद - Only Jokes
- वक्तृत्व
- योगासने
- वाढदिवसाच्या शुभेच्छा
- Youtube
- News Blog
Thursday, August 15, 2024
श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
श्री ज्ञानेश्वर संस्थेत देशाचा ७८ वा स्वातंत्र्य दिन आनंदोत्सव मोठ्या दिमाखदार वातावरणात संपन्न झाला.
श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या ध्वजाचे ध्वजारोहण संस्थेचे खजिनदार डॉ. दीपक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. तसेच श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर व श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर आळंदी देवाची या ध्वजाचे ध्वजारोहण संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व शालेय समितीचे सदस्य योगेंद्र कुऱ्हाडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी राष्ट्रगीत, राज्यगीत, ध्वजगीत व गाईड गीताने ध्वजास मानवंदना दिली.
यावेळी आळंदी नगरपालिका शिक्षण मंडळाचे मा. सभापती श्रीधर कुऱ्हाडे, विविध कार्यकारी सोसायटीचे सभापती बाबूलाल घुंडरे, पत्रकार महादेव पाखरे, विद्यालयाचे प्राचार्य दिपक मुंगसे, उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक किसन राठोड, प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, मंगला हुंडारे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष (प्राथ.) ह.भ.प. विवेक चव्हाण, सहसचिव (माध्य.) मनीषा केदार, कामिनी मुंडे, बंडू नाना पालवे, रवींद्र जोशी, संतोष इंगळे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कुस्ती व बुद्धिबळ स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालय यांच्या वतीने 'माॅं के नाम पेड' उपक्रमाच्या अनुषंगाने विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षाची लागवड करण्यात आली. तसेच विद्यार्थी व शिक्षक यांच्या घर व शेतात उपलब्ध जागेत वृक्षारोपण करण्यासाठी वृक्षाचे वाटप करण्यात आले. याचे सर्व नियोजन सुदाम मोहरे व सूर्यकांत खुडे यांनी केले.
बाळासाहेब भोसले, सोनाली आवारी व अनुराधा खेसे यांनी रांगोळीच्या माध्यमातून तिरंगा रंगातून भारत देशाची प्रतिकृती साकारून सर्व देशभक्ताचे लक्ष वेधून घेतले. यानिमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीरंग पवार व राहुल चव्हाण यांनी केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
chaahh
JAI
Post a Comment