SHRIMANT

Sunday, December 1, 2024

एम पी एस सी ची संयुक्त पूर्व परीक्षा यशस्वी रित्या संपन्न

एम पी एस सी ची संयुक्त पूर्व परीक्षा यशस्वी रित्या संपन्
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेली महाराष्ट्र राज्यपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ रविवारी १ डिसेंबर रोजी राज्यभरातील परीक्षा केंद्रावर संपन्न झाल्या. यापैकी केंद्र क्रमांक ०८७ आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, आळंदी मध्ये प्रसन्न वातावरणात संपन्न झाली. सदर केंद्रावर एकूण ४८० उमेदवारांची परीक्षा व्यवस्था करण्यात आली होती. उमेदवारांचे स्वागत रांगोळी व स्वागत फलकाच्या माध्यमातून करण्यात आले. याकरिता श्री ज्ञानेश्वर संस्था सचिव अजित वडगावकर यांनी आवश्यक अशा सर्व सुविधा परीक्षा केंद्रास उपलब्ध करून देण्याची व्यवस्था चोख पार पाडली. महाराष्ट्र राज्याच्या विकासामध्ये व जडणघडणीमध्ये योगदान देणाऱ्या भावी अधिकाऱ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच पर्यवेक्षक व कर्मचारी यांना नाश्ता व चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली. केंद्रावरील वातावरण व व्यवस्थेबद्दल उमेदवार, नातेवाईक व अधिकारी यांनी समाधान व्यक्त केले. प्रशालेचे मुख्याध्यापक सूर्यकांत मुंगसे यांनी केंद्र संचालक म्हणून कार्य पार पाडले. या परीक्षाकरिता पर्यवेक्षक व कर्मचारी म्हणून श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उत्तम सहकार्य केल

No comments: