SHRIMANT

Thursday, February 20, 2025

प्रा.विजय गुळवे यांचा शिवजयंती दिनी सन्मान सोहळाशिवविचाराचे बाळकडू घराघरात उपक्रमाचे कौतुक अजिंक्य डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील शिवस्वराज्य प्रतिष्ठानचे वतीने ज्ञानगंगा इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे अध्यक्ष प्रा.विजय गुळवे यांचा शाळेतील विद्यार्थी शिवस्वराज प्रतिष्ठान सोबत सार्वजनिक शिवजयंती उत्सवात सहभागी करीत शिवविचाराचे बाळकडू घराघरात पोहोचवल्याबद्दल सन्मानपत्र आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांचे हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
शिवजयंती निमित्त आळंदी नगरपरिषद विकसित शिवस्मारक येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांचे हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक प्रशांतदादा कुऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते. अनेक वर्षां पासून शिवजयंती उत्सवात ज्ञानगंगा इंग्लीश मिडीयम स्कूलचा उत्स्फूर्त सहभाग राहिला आहे. ज्ञानगंगा विद्यालयात सर्व विद्यार्थी व शिक्षक यांच्या उपस्थितीत संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष विजय गुळवे, प्राचार्य वैष्णवी गुळवे आदींचे हस्ते दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन झाले. विद्यार्थी, शिक्षक यांनी ज्ञानगंगा इंग्लीश मिडीयम स्कूल ते आळंदी नगरपरिषद चौक पर्यंत शोभायात्रेत सहभाग घेत मुलांनी हातात भगवे झेंडे घेत छत्रपती शिवाजी महाराज की जय ! तुमच आमच नात काय जय जिजाऊ जय शिवराय अशा प्रेरणादायी घोषणा दिल्या. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, शहाजी राजे, वीरमाता जिजाऊ, स्वराज्यातील मावळे अशा ऐतिहासिक वेशभूषा लक्षवेधी केल्या होत्या.
नगरपरिषद चौक येथे छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विद्यालयाच्या वतीने संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष विजय गुळवे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर ज्ञानगंगा विद्यालयातील इयत्ता पहिली ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम lसादर केले. सर्व प्रथम ज्ञानेश्वरी तौर व आद्या घोलप या आठवितील विद्यार्थीनींनी शिव जन्माचा पाळणा सादर केला. त्यानंतर आकांशा भुतेकर (इयत्ता नववी) साक्षी कदम (आठवी) या विद्यार्थिनींनी शिवाजी महाराजांवर पोवाडा सादर केला. प्रथमेश सोमवंशी (नववी), दर्शन घुंडरे (सहावी) प्रतीक सूर्यवंशी (सहावी) यश वाघमारे व सार्थक पाटील (सहावी) वीर पाटील व सोहम तौर (सहावी) नागेश शिंदे, प्रज्वल वरकड, विवेक खर्चे व श्लोक ढोबळे (आठवी) या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर विविध गीते सादर केली. प्रणाली सूर्यवंशी (सहावी) शर्वरी शिंदे (सहावी) वेदांत कुलकर्णी(आठवी) अनन्या थोरवे (चौथी) शर्वरी घुगे (सहावी) अथर्व ठेंगल (सहावी) ज्ञानेश्वरी जाधव (चौथी) रितेश बांदल (सहावी) या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त रोमहर्षक भाषणे सादर केली. कार्यक्रमाच्या शेवटी इयत्ता चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांनी लेझिम या खेळाचे प्रदर्शन केले. इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी लाठी काठीचे प्रात्यक्षिक सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. मुख्याधिकारी कैलास केंद्रे, माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील आदींचे हस्ते मुलांना पारितोषिके देण्यात आली. विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले. अजिंक्य डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात येथील अजिंक्य डी वाय पाटील समूह संचलित अजिंक्य डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या संचालिका डॉ कमलजीत कौर, प्राचार्य डॉ एफ बी सय्यद यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. शिवजयंती निमित्ताने विद्यार्थ्यांनी पारंपारिक लेझीम नृत्य व वाद्यांच्या गजरात पालखी मिरवणूकीचे आयोजन जल्लोषात केले. संचालिका डॉ कमलजीत कौर, प्राचार्य डॉ एफ बी सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा दिलीप घुले व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यांनी शिवजयंती उपक्रमाचे संयोजन केले. या प्रसंगी श्रेया हीने शिवकालीन शस्त्र कला प्रदर्शन, उज्मा मुल्ला हिने शिवचरित्र वर आधारित व्याख्यान, साहिल तौर यांनी शिव पराक्रम पोवाडा, दिनेश नगरे याने शिवगर्जना, हिमांगी रत्नाकर व तिच्या ग्रुप तर्फे सांस्कृतिक कार्यक्रम, अक्षता व ग्रुप तर्फे स्वागत गीत, सिमरन व ग्रुप तर्फे शिवजन्मोत्सव पाळणा गीत, भावेश याने समाज प्रबोधन पर कविता स्वयंसेवकांनी आदी उपक्रम आयोजित करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी पॉलिटेक्निक समन्वयक डॉ नागेश शेळके, ए आय डी एस विभाग प्रमुख डॉ भाग्यश्री ढाकुलकर, प्रा अमोल साठे, अमोल सावंत, अमोल पाटील, निकेश पाटोळे, गायत्री पाटील, दिनेश नगरे, साहिल डोके, ओमकार काळे, समर्थ, सुयोग, रोहन माने आदींचे विशेष सहकार्य झाले. स्वयंसेविका तन्वी कोल्हे व मृणाल शिरसाट यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा दिलीप घुले व राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकांनी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यास परिश्रम घेतले.

No comments: