SHRIMANT

Monday, July 21, 2025

टाळ मृदुंगाच्या व ज्ञानोबा माऊली तुकाराम नामघोषात श्री संत ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज यांच्या पालखीचे स्वागत

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी व जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या ३७५ व्या सदेह वैकुंठगमन पावन पर्वावर संत तुकाराम महाराजांची पालखी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या भेटीसाठी आळंदीत दाखल झाली. या ऐतिहासिक भेटीचे साक्षीदार होण्याचे भाग्य आम्हाला मिळाले याचा खूप आनंद झाला.
आषाढी वारीच्या निमित्ताने १९ जून रोजी माऊलींच्या पालखीचे आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान झाले होते. आज २० जुलै रोजी माऊलींच्या पालखीचे पुनः आळंदीत आगमन झाले. माऊलींच्या व संत तुकाराम महाराजांच्या पालखी पुनरागमनाने आळंदी पुन्हा एकदा ज्ञानोबा माऊली तुकाराम नामघोषाने दुमदुमली. सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या प्रशालेतील विद्यार्थी विठ्ठल - रुक्मिणी, माऊली, मुक्ताई, संत तुकाराम महाराज, वारकरी अशा वेगवेगल्या वेशभूषेत माऊलींच्या व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी स्वागतासाठी उपस्थित राहिले. यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या संतांच्या वेशभुषेतून, फुगडी, लेझीम, ढोल पथक, टाळ मृदुंगाच्या तालावर पाऊल्या खेळत आनंद घेतला. यावेळी संस्थेचे सचिव अजित वडगावकर, सदस्य अनिल वडगावकर, विद्यालयाचे उपप्राचार्य किसन राठोड, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments: