SHRIMANT

Friday, August 1, 2025

श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्या मंदिरात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर प्रशालेमध्ये सहशालेय उपक्रमांतर्गत लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
त्यानिमित्ताने प्रशालेमध्ये बालसभेचे आयोजन करण्यात आले होते . याप्रसंगी ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगांवकर, मुख्याध्यापक प्रदीप काळे,शरीफजी शेख ,सागर कुंभार,शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते. बालसभेचे अध्यक्ष इ.४थी च्या विद्यार्थ्यांमधून समर्थ सुंदर शिंदे, प्रमुख पाहुणे विराज रविंद्र रानवडे यांची निवड करण्यात आली. त्यास राधिका वाशिंबे हिने अनुमोदन दिले. विद्यार्थ्यांनी स्वागतगीत गाऊन पाहुण्यांचे स्वागत केले . लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ साठे व माऊलींच्या प्रतिमेचे प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . गार्गी पाटील हिने कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. इ. १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांचे बालपण, शिक्षण ,कार्य व जीवनप्रवास यावर आधारित भाषणे केली. वर्षा काळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याविषयी सविस्तर माहिती सांगितली. राहुल चव्हाण यांनी लोकमान्य टिळक यांच्या ग्रंथ संपदेची ओळख करून दिली. श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजितभाऊ वडगावकर यांनी बालसभेचे कौतुक करत लोकमान्य टिळक यांच्या कार्याची माहिती सांगत संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे योगदान सांगून त्यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. अण्णाभाऊ साठे यांच्याबरोबर खेड तालुक्याचे माजी आमदार स्व.ताराचंदजी वडगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदान अधोरेखित केले. तसेच विश्वगुरू म्हणून प्रसिद्ध असणारे नालंदा व तक्षशिला विद्यापीठ परकीय आक्रमण यांनी नष्ट करून गेलेले भारताचे वैभव माऊलींच्या ४०० एकरामध्ये ज्ञानपीठ साकार करून येणार असल्याचे नमूद केले. संत ज्ञानेश्वर माऊली संस्थानच्या वतीने सुरू असलेल्या अनेक उपक्रमांची माहिती दिली. उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक प्रदीप काळे यांनी मानले. बालसभेचे सूत्रसंचालन आकांक्षा घाडगे व जाधव रुद्र यांनी केले. श्रुती शिंदे हिने पसायदानाचे गायन करत कार्यक्रमाची सांगता झाली. बालसभेचे नियोजन प्रतिभा भालेराव यांनी केले. वर्षा काळे,निशा कांबळे, वैशाली शेळके, राहुल चव्हाण, गजानन राठोड या शिक्षकांचे कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले.

No comments: