SHRIMANT
- श्री संत ज्ञानोबा तुकोबा विश्वभ्रमण दिंडी सोहळा दुबई २०२२
- श्री विश्वशांती जगद्गुरू सेवा संस्था
- सूत्रसंचालन
- "भाषण कला शिका "
- ऑनलाईन बँक खाते
- भाषणासाठी विषय निवडताना
- वक्तृत्व कला
- सर्वांगीण दृष्टी
- संवाद तंत्र
- करीअर
- होमी मिनिस्टर LIVE
- विदेश दौरे
- मी श्रीमंत आहे live show
- सूत्रसंचालनासाठी उपयुक्त चारोळ्या
- पुस्तके का वाचावीत
- सूत्रसंचालन
- मीडिया
- कामगार पुरस्कार सोहळा
- LIVE मुलाखत
- तिरुपती बालाजी दर्शन
- मराठी देशा
- विवेकानंदांची अतिशय महत्त्वाचे वाक्ये
- चांगले विचार
- ई- Paper वर्तमानपत्रे
- उपयोगी छोट्या कथा
- निवडक बोधकथांचा एक संग्रह
- फक्त विनोद - Only Jokes
- वक्तृत्व
- योगासने
- वाढदिवसाच्या शुभेच्छा
- Youtube
- News Blog
Friday, August 15, 2025
श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत स्वातंत्र्यदिनाचा उत्सव जल्लोषात साजरा
श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आळंदी देवाची येथे १५ ऑगस्ट रोजी भव्य व उत्साह पूर्ण वातावरणात स्वातंत्र्य दिनाचा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. या तिरंगा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर
विद्यालयाचा सर्व परिसर तिरंगाच्या फुग्यांनी सजविण्यात आला.
यावेळी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मध्ये संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त लक्ष्मण घुंडरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे पूजन व आरोहण करण्यात आले. तसेच श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्या मंदिराचे संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व संस्थेचे सदस्य आणि विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन योगेंद्र कुऱ्हाडे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण संपन्न झाले. तद्नंतर भक्तिमय वातावरणात राष्ट्रगीत, राज्य गीत, ध्वजगीत व गाईड गीताच्या सुमधुर गजरात राष्ट्रध्वजास मानवंदना दिली.
याप्रसंगी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या अधिव्याख्यात्या रजनी तिटकारे, संस्थेचे सदस्य अनिल वडगावकर, भगवान लेंडकर, कोमल काळभोर, माजी विद्यार्थी लक्ष्मण उभे, दीपक वाबळे, रमेश थोरवे, विद्यालयाचे प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, उपप्राचार्य किसन राठोड, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर, अनुजायीनी राजहंस, पालक - शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्रेणिक क्षीरसागर, तेजश्री साळुंखे, सहसचिव वर्षा केंद्रे, सदस्य, सर्व विभागातील शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ, आजी - माजी विद्यार्थी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने रंगीबिरंगी वेशभूषा, देशभक्तीपर समूह गीतामधून स्वातंत्र्याच्या अमूल्यतेची जाणीव करून दिली. ढोल पथक, संचालन, लेझीम प्रात्यक्षिके, संगीत कवायत व मानवी पिरॅमिड तयार करून विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. या विद्यार्थ्यांना हेमांगी उपरे, राजश्री भुजबळ, रामदास वहिले, मनीषा कुंजीर, रवींद्र शेखरे, अतुल भांडवलकर, सुजाता गोगावले, कल्पना कलशेट्टी, अनुराधा वहिले या अध्यापकांनी मार्गदर्शन केले.
स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून १९९४ - ९५ बॅच कडून स्नेह मेळावा कार्यक्रमात संस्थेच्या सचिवांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देताना विद्यालयास पाच पोडियम व उमेश रानवडे आणि मित्रपरिवार यांच्या वतीने सहा पेग्विन डस्टबिन भेट दिले. तसेच रसिका कुऱ्हाडे घुंडरे यांच्या प्रयत्नातून टायप्रो या औद्योगिक कंपनीकडून विद्यालयासाठी तीन पेग्विन डस्टबिन भेट दिली. तसेच पाटबंधारे विभाग अहिल्यानगरचे सुनील नेहे यांनी विद्यार्थ्यांसाठी खाऊ म्हणून बिस्कीटचे १० बॉक्स भेट दिले. या निमित्ताने सचिव अजित वडगावकर यांनी आपल्या मनोगतात या सर्व दानशूर व्यक्तिमत्त्वांचे आभार व्यक्त केले. व या स्वातंत्र्य दिनाच्या उत्सव कार्यक्रमास सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून चार चांद लावल्यामुळे विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांचे कौतुक करत सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच आजचा दिवस स्वातंत्र्य दिनाबरोबरच भगवान श्रीकृष्णाचा व संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा ७५० वा जन्मदिवस म्हणून साजरा होत असताना हा दुग्ध शर्करा योग अनुभवण्याचे भाग्य आपल्याला लाभले. व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मवर्ष वर्षभर साजरे होत असताना या वर्षात घडलेल्या अनेक गोष्टींचा आढावा व्यक्त केला. अखिल जगाच्या कल्याणाकरता पसायदान मागणाऱ्या माऊलींचे पसायदान जगातील सर्व शाळातून त्या - त्या भाषांतून गायले जावे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार आणि मूल्य शिक्षण रुजण्याकरता ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीवर आधारित तयार केलेले पुस्तक "ओळख श्री ज्ञानेश्वरीची" हे सुद्धा याच पद्धतीने जगातील सर्व शाळांमध्ये वापरले जावे. म्हणजेच माऊलींची वैश्विक भावना प्रत्यक्ष उतरुन समाज उद्धार होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment