SHRIMANT

Sunday, August 3, 2025

ओळख श्री ज्ञानेश्वरीची उपक्रमात वडगाव शेरी शाळा सहभागी १०१ व्या शाळेत उपक्रमाचे हरिनाम गजरात उदघाट्न

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : लोणकर माध्यमिक विद्यालय भाग शाळा ( वडगांव शेरी ) येथे शालेय मुलांमध्ये संत साहित्याच्या माध्यमातून बुध्दी, मन व अभ्यास कौशल्य वाढीसाठी उपयुक्त ठरलेला ओळख श्रीज्ञानेश्वरीची या संत साहित्यावर आधारित बहुउद्देशीय मुलांच्या कला गुणांना वाव देणा-या १०१ व्या शाळेतील उपक्रमाचा प्रारंभ हरिनाम गजरात झाला.
ओळख श्री ज्ञानेश्वरीची एक परिवारातील मुख्य मार्गदर्शक श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश तात्या काळे यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शक सूचना प्रमाणे उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी अध्यक्षस्थानी ह. भ. प. मारुती नाना महाराज गलांडे होते. समन्वयक कैलास आव्हाळे यांनी शिक्षक, विद्यार्थी व हरिपाठ, ज्ञानेश्वरी ची ओळख या उपक्रमास लागणारे संत साहित्य वाटप करून लोणकर माध्यमिक विद्यालय भाग शाळा वडगांव शेरी येथे झाला. अध्यक्षतेखाली प्राचार्य अनिता शिंदे, उपमुख्याध्यापक सविता नाणेकर, प्राध्यापक, कर्मचारी वृंद उपस्थित होते.
यावेळी निवृत्ती महाराज गलांडे यांनी उपक्रमाची उपयुक्तता सांगत सुसंवाद साधला. खुलते महाराज यांनी गेल्या दोन वर्षाचा विद्यार्थी व शाळेत झालेला बुध्दी, विचार व स्मरण शक्तीत झालेला बदल या विषयी अनुभव सांगितले. या प्रशालेत दर शनिवारी आनंददायी शिक्षण उपक्रमात नियोजन केले असल्याचे सांगितले. या प्रसंगी मारुती नाना गलांडे महाराजांनी शरिराचे तात्पुरते टिकणार सौंदर्याकडे अधिक वेळ देण्या पेक्षा अखंड टिकणार संत साहित्य अभ्यासने बुध्दी, मन व स्मरण शक्ती पवित्र करण्यास थोडा वेळ देण्याचे आवाहन केले. या प्रसंगी भजनी मंडळ अध्यक्ष पाडाळे, वाबळे महाराज, झिरमिरे, जाधव महाराज , हरिपाठ शिक्षक महिला सिमा चौधरी, ताई भांबुरे, रिटायर भारतीय स्थानिक संघ नगररोड अध्यक्ष परशुराम शिंदे आदी उपस्थित होते. दिप प्रज्वलन, ग्रंथ, माऊली प्रतीमेच्या पुजेने सुरू झालेला उद्घाटन सोहळा सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

No comments: