SHRIMANT
- श्री संत ज्ञानोबा तुकोबा विश्वभ्रमण दिंडी सोहळा दुबई २०२२
- श्री विश्वशांती जगद्गुरू सेवा संस्था
- सूत्रसंचालन
- "भाषण कला शिका "
- ऑनलाईन बँक खाते
- भाषणासाठी विषय निवडताना
- वक्तृत्व कला
- सर्वांगीण दृष्टी
- संवाद तंत्र
- करीअर
- होमी मिनिस्टर LIVE
- विदेश दौरे
- मी श्रीमंत आहे live show
- सूत्रसंचालनासाठी उपयुक्त चारोळ्या
- पुस्तके का वाचावीत
- सूत्रसंचालन
- मीडिया
- कामगार पुरस्कार सोहळा
- LIVE मुलाखत
- तिरुपती बालाजी दर्शन
- मराठी देशा
- विवेकानंदांची अतिशय महत्त्वाचे वाक्ये
- चांगले विचार
- ई- Paper वर्तमानपत्रे
- उपयोगी छोट्या कथा
- निवडक बोधकथांचा एक संग्रह
- फक्त विनोद - Only Jokes
- वक्तृत्व
- योगासने
- वाढदिवसाच्या शुभेच्छा
- Youtube
- News Blog
Friday, September 5, 2025
श्री ज्ञानेश्वर विद्यालयात नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून गणेशोत्सव संपन्न
आळंदी - श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आळंदी देवाची येथे गणेश उत्सवाचे औचित्य साधून चित्रकला विभागाच्या वतीने कलाशिक्षक दत्तात्रय वंजारी व सोमनाथ बेळळे यांच्या मार्गदर्शनाखाली *'व्यसन सोडा आरोग्य जोडा'* या विषयावर पोस्टर व घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला. तसेच “विद्यार्थी घडताना” या उपक्रमांतर्गत विशेष कार्यक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत इंद्रायणी नगर व कासारवाडी येथील मातृभूमी ढोल-ताशा पथकाने वादनाचा शानदार कार्यक्रम सादर करून महाराष्ट्राच्या समृद्ध वाद्य संस्कृतीला उजाळा दिला.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक गणेश वंदना वादनाने झाली. नंतर मातृभूमी पथकाने एकसुरात ढोल, ताशा आणि झांज वाजवून शाळेचा परिसर दणाणून सोडला. तालावर थिरकणारे स्वर आणि त्यात गुंफलेला उत्साह पाहून उपस्थित विद्यार्थी, पालक सर्वच प्रेक्षक भारावून गेले. ढोल-ताशा पथक हे महाराष्ट्रातील उत्सव, मिरवणुका व जत्रांचे वैशिष्ट्य आहे. या वाद्यसंस्कृतीतून एकात्मता, शिस्त, सामूहिकता आणि परंपरेचे दर्शन घडते. विद्यार्थ्यांना या वादनाचा अनुभव मिळावा, त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आत्मविश्वास, टीमवर्क व सांस्कृतिक अभिमान निर्माण व्हावा हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता.
संस्था सचिव अजित वडगांवकर यांनी या प्रसंगी मार्गदर्शन करताना सांगितले की,आपल्या पिढीपर्यंत पोहोचलेली ढोल-ताशाची परंपरा ही फक्त नादमय कलाच नाही तर महाराष्ट्राच्या अभिमानाचे प्रतीक आहे. विद्यार्थ्यांनी अशा कार्यक्रमांत सहभागी झाल्यामुळे त्यांच्यात शिस्तबद्धता, सहकार्याची भावना आणि संस्कृतीची जाण निर्माण होते. प्राचार्य सूर्यकांत मुंगसे यांनी गणेशोत्सवाचे निमित्त साधून 'सोशल मीडिया आभास की आरसा' याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या मधील कौशल्यांचा विकास करून आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा जतन केल्या पाहिजेत. या कार्यक्रमात शिक्षक, पालक व स्थानिक मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. उद्योजक दत्तात्रय मुंगसे पाटील त्यांच्या हस्ते आणि शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्रेणिक क्षीरसागर यांच्या उपस्थितीत गणरायांची आरती संपन्न झाली. उज्वला कडलासकर, सोनाली आवारी, अमीर शेख, साहेबराव वाघुले दत्तात्रय वंजारी, राजू सोनवणे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. त्याचप्रमाणे विद्यालयातील सर्व महिलांसाठी गणपती अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम घेण्यात आला. विद्यालयातील पर्यवेक्षिका अनिता पडळकर, अनुजायीनी राजहंस, मुख्यालिपीका संगीता पाटील, ज्येष्ठ अध्यापिका हेमांगी उपरे व विद्यालयाच्या माजी शिक्षिका नीता गांधी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. गुणवत्ता विभागाच्या वतीने गणपती उत्सवाचे औचित्य साधून *नशा नको...ज्ञान हवे* या विषयावर शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले. गणरायाच्या आगमनाचा आनंदोत्सव, विद्यार्थ्यांमधील विविध कलाकृती, वाद्य संस्कृतीचे जतन व संवर्धन तसेच पारंपारिक व आधुनिक उपक्रम साजरे करून या कार्यक्रमास वेगळी उंची प्राप्त झाली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment