SHRIMANT
- श्री संत ज्ञानोबा तुकोबा विश्वभ्रमण दिंडी सोहळा दुबई २०२२
- श्री विश्वशांती जगद्गुरू सेवा संस्था
- सूत्रसंचालन
- "भाषण कला शिका "
- ऑनलाईन बँक खाते
- भाषणासाठी विषय निवडताना
- वक्तृत्व कला
- सर्वांगीण दृष्टी
- संवाद तंत्र
- करीअर
- होमी मिनिस्टर LIVE
- विदेश दौरे
- मी श्रीमंत आहे live show
- सूत्रसंचालनासाठी उपयुक्त चारोळ्या
- पुस्तके का वाचावीत
- सूत्रसंचालन
- मीडिया
- कामगार पुरस्कार सोहळा
- LIVE मुलाखत
- तिरुपती बालाजी दर्शन
- मराठी देशा
- विवेकानंदांची अतिशय महत्त्वाचे वाक्ये
- चांगले विचार
- ई- Paper वर्तमानपत्रे
- उपयोगी छोट्या कथा
- निवडक बोधकथांचा एक संग्रह
- फक्त विनोद - Only Jokes
- वक्तृत्व
- योगासने
- वाढदिवसाच्या शुभेच्छा
- Youtube
- News Blog
Wednesday, December 17, 2025
आनंद, कला व संस्काराचा संगम' श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत वार्षिक स्नेहसंमेलनाचा भव्य उद्घाटन समारंभ संपन्न
आळंदी पुणे-श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्या मंदिर आणि श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *“गंध मातीचा : रंग संस्कृतीचा”* वार्षिक स्नेहसंमेलन २०२५ चा भव्य उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेचं पूजन व दीपप्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून चार दिवस चालणाऱ्या त्रैवार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर वर्षाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनि माऊलींच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग विविध वेषभूषत ,पारंपरिक वाद्यसंगीत, शास्त्रीय धार्मिक वातावरण आणि संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या सजीव दृशामुळे संपूर्ण परिसर भारावून गेला.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष धर्मवीर अध्यात्मिक सेना महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष ह. भ. प. अक्षय महाराज भोसले समवेत कार्यक्रमाचे विशेष आकर्षण सुप्रसिद्ध मराठी बिग बॉस विजेते, सिनेअभिनेता सुरज चव्हाण व त्यांच्या सुविद्य पत्नी संजना सुरज चव्हाण यांची उपस्थिती लाभली. तसेच श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज पाटील, संस्थेचे अध्यक्ष सुरेशकाका वडगावकर, सचिव अजित वडगावकर, खजिनदार डॉ. दीपक पाटील, ज्येष्ठ विश्वस्त लक्ष्मण घुंडरे, ,राजाभाऊ चोपदार, "आजीचा लाडका नातू "फेम महेश जगदाळे, श्रीधर कुऱ्हाडे, संस्थेचे सदस्य अनिल वडगावकर, इंद्रायणी इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष फणसे व सचिव साळुंखे, बेबीताई सांडभोर, उमेश म. बागडे, एम. डी. पाखरे, प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, प्राथमिक मुख्याध्यापक प्रदीप काळे, उपप्राचार्य किसन राठोड, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर, अनुजायीनी राजहंस, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्रेणिक क्षीरसागर, सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी प्रथम पाहुण्यांचा परिचय करून देत सर्वांचे स्वागत केले व या कार्यक्रमाचा हेतू विद्यार्थ्यांच्या सर्वांनी विकासाकरिता कसा महत्त्वाचा आहे हे सांगितल. संतांचे आशीर्वाद, समाजातील ज्ञानी महात्म्यांच्या आशीर्वादाने व दानशूर व्यक्ती व संस्था यांच्या सहकार्याने , पालक ,ग्रामस्थ संस्थेतील निवृत्त व विद्यमान शिक्षक शिक्ष इतर कर्मचारी यांच्या यांच्या सहकार्यातून संस्था प्रगती करत आहे व अशीच प्रगती पुढे व्हावी या करता या सर्व घटकांनी पुढे अशीच मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली व चार दिवस चालणाऱ्या स्नेहसंमेलनाची माहिती देत सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले .
व " ओळख श्री ज्ञानेश्वरी ची" हा अभ्यासक्रम पसायदान प्रमाणे राज्यातील सर्व शाळांमध्ये सुरू व्हावा अशी अपेक्षा कार्यक्रमाचे अध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांच्याकडे व्यक्त केली.
तसेच सुरेश वडगावकर, डॉ. दीपक पाटील, सूर्यकांत मुंगसे यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
नंतर सूरज चव्हाण यांनी विद्यार्थ्यांशी नृत्यद्वारे संवाद साधत आपल्या यशाचा प्रवास, मेहनतीचे महत्त्व आणि कलागुणांना वाव देण्याची गरज यावर मार्गदर्शन केले.
शेवटी अध्यक्षीय मनोगतातून अक्षय भोसले यांनी संस्कारक्षम मूलं घडवणारे संस्कारक्षम विद्यालय, समाजाला दिशा देणारे कीर्तनकार प्रवचनकार व संस्कारक्षम विद्यार्थी ची खाण निर्माण करणारी शाळा म्हणून शाळे चे कौतुक केले
यावेळी
विविध कला गुणदर्शन” या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, संगीत व लोककलेचे सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली.
भारतीय संस्कृतीची मुळे, मातीचा गंध आणि परंपरेचे रंग विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून प्रभावीपणे उलगडताना दिसून आले. अशा प्रकारे “गंध मातीचा : रंग संस्कृतीचा” या संकल्पनेतून आयोजित ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन हे शैक्षणिक व सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करणारे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे ठरत आहे
सूत्रसंचालन योगेश मठपती व आभारप्रदीप काळे मानले. इंद्रायणी मातेच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment