SHRIMANT
- श्री संत ज्ञानोबा तुकोबा विश्वभ्रमण दिंडी सोहळा दुबई २०२२
- श्री विश्वशांती जगद्गुरू सेवा संस्था
- सूत्रसंचालन
- "भाषण कला शिका "
- ऑनलाईन बँक खाते
- भाषणासाठी विषय निवडताना
- वक्तृत्व कला
- सर्वांगीण दृष्टी
- संवाद तंत्र
- करीअर
- होमी मिनिस्टर LIVE
- विदेश दौरे
- मी श्रीमंत आहे live show
- सूत्रसंचालनासाठी उपयुक्त चारोळ्या
- पुस्तके का वाचावीत
- सूत्रसंचालन
- मीडिया
- कामगार पुरस्कार सोहळा
- LIVE मुलाखत
- तिरुपती बालाजी दर्शन
- मराठी देशा
- विवेकानंदांची अतिशय महत्त्वाचे वाक्ये
- चांगले विचार
- ई- Paper वर्तमानपत्रे
- उपयोगी छोट्या कथा
- निवडक बोधकथांचा एक संग्रह
- फक्त विनोद - Only Jokes
- वक्तृत्व
- योगासने
- वाढदिवसाच्या शुभेच्छा
- Youtube
- News Blog
Monday, February 23, 2026
आळंदी येथे सहस्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या नियोजन बैठकीत उत्स्फूर्त सहभाग
आळंदी नगरीत माजी नगराध्यक्ष मा.श्री सुरेश काका वडगावकर यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित सहस्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नुकतीच नियोजन बैठक उत्साहात पार पडली. भक्ती, परंपरा आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या सोहळ्याची तयारी जोरात सुरू असून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बैठकीस उपस्थित राहून आपला सक्रिय सहभाग नोंदविला.
या बैठकीस श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, विश्वस्त योगेंद्र कुऱ्हाडे, श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन संघाचे उपाध्यक्ष राजूशेठ धोका उपस्थित होते. तसेच वारकरी संप्रदायातील कीर्तनकार व कथाकार संतोषानंद शास्त्रीजी, संदीप महाराज लोहार, बाळासाहेब शेळके महाराज यांनीही मार्गदर्शन केले.
याशिवाय “ओळख ज्ञानेश्वरी” परिवाराचे संकेत वाघमारे, इंद्रायणी सेवा फाउंडेशन विठ्ठल शिंदे तसेच सर्व पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत कार्यक्रमाचे स्वरूप, धार्मिक विधी, अभंगवाणी, प्रवचन, कीर्तन, गायन सोहळा, काही मान्यवरांचे स्वागत सत्कार, या विषयाला घेऊन विविध शालेयस्पर्धा , रक्तदान आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, अन्नदान ,ग्रंथतुला , हुशार गरजू विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी शिष्यवृत्ती, संत पूजन तसेच नागरिकांच्या सहभागाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्वांनी हा सोहळा भव्य, शिस्तबद्ध आणि संस्मरणीय करण्याचा निर्धार व्यक्त केला.
आळंदी नगरीत होणारा हा सहस्रचंद्र दर्शन सोहळा भक्ती, कृतज्ञता आणि सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी उत्सव ठरणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment