SHRIMANT
- श्री संत ज्ञानोबा तुकोबा विश्वभ्रमण दिंडी सोहळा दुबई २०२२
- श्री विश्वशांती जगद्गुरू सेवा संस्था
- सूत्रसंचालन
- "भाषण कला शिका "
- ऑनलाईन बँक खाते
- भाषणासाठी विषय निवडताना
- वक्तृत्व कला
- सर्वांगीण दृष्टी
- संवाद तंत्र
- करीअर
- होमी मिनिस्टर LIVE
- विदेश दौरे
- मी श्रीमंत आहे live show
- सूत्रसंचालनासाठी उपयुक्त चारोळ्या
- पुस्तके का वाचावीत
- सूत्रसंचालन
- मीडिया
- कामगार पुरस्कार सोहळा
- LIVE मुलाखत
- तिरुपती बालाजी दर्शन
- मराठी देशा
- विवेकानंदांची अतिशय महत्त्वाचे वाक्ये
- चांगले विचार
- ई- Paper वर्तमानपत्रे
- उपयोगी छोट्या कथा
- निवडक बोधकथांचा एक संग्रह
- फक्त विनोद - Only Jokes
- वक्तृत्व
- योगासने
- वाढदिवसाच्या शुभेच्छा
- Youtube
- News Blog
Saturday, May 16, 2026
सुरेश वडगावकर ज्ञानदीप शिष्यवृत्ती" चा वितरण सोहळा संपन्न*
शिष्यवृत्ती ही बक्षीस नसून प्रेरणा आहे. शिक्षण उपसंचालक काळे
आळंदी: श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्यु. कॉलेज, श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर व श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर यांच्या वतीने संस्थेचे सचिव अजित वडगांवकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित “अभिष्टचिंतन सोहळा” तसेच “सुरेश वडगांवकर ज्ञानदीप शिष्यवृत्ती " वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष वेदांत सत्संग समितीचे अध्यापक ह. भ. प. कैलास म. येवले, प्रमुख उपस्थिती सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती खेड व जिल्हा परिषद पुणेचे सदस्य सभागृहनेते विजयसिंह शिंदे, महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण वित्त व नियोजन विभागाचे अधिक्षक कृष्णा ढाळे, शिक्षण आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य पुणे चे उपसंचालक काळे साहेब, नगरसेवक रामदास भोसले, आ.न.पा. मा. उपनगराध्यक्ष अशोक उमरगेकर, मनोहर दिवाणे, बाबूलाल घुंडरे ,गणेश दिवाणे, संगीता पाटील, विजया पाटील, बाबूलाल घुंडरे, संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, खजिनदार डॉ. दीपक पाटील, सदस्य अनिल वडगावकर, तुकाराम आण्णा गवारी, विद्यालयाचे प्राचार्य किसन राठोड, उपप्राचार्य प्रशांत सोनवणे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्रेणिक क्षीरसागर, सर्व विभागातील शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी व पालक आदी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये डॉ. दीपक पाटील यांनी तसेच अजित वडगावकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत "सुरेश वडगावकर ज्ञानदीप शिष्यवृत्ती" चा उद्देश स्पष्ट केला. व भविष्यात या गरीब गरजू, हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना यापेक्षा अधिक प्रमाणात शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली. तदनंतर संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांचा पारंपारिक पद्धतीने औक्षण व केक कापून मोठ्या थाटामाटात वाढदिवस साजरा करण्यात आला.
अभिष्टचिंतन कार्यक्रमाचे औचित्य साधून उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते विद्यालयातील बालवाडी ते बारावी पर्यंतच्या एकूण १३८ हुशार, गरीब - गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना प्रत्येकी १०००₹ प्रमाणे “सुरेश वडगांवकर ज्ञानदीप शिष्यवृत्ती” चे वितरण करण्यात आले. सदर शिष्यवृत्ती अनिल वडगावकर कुटुंबीयांकडून १०१ विद्यार्थी, नंदकुमार वडगावकर यांच्या वतीने ११ विद्यार्थी, डॉ. दीपक पाटील यांच्या वतीने ६ विद्यार्थी, मनोहर दिवाणे व गणेश दिवाणे यांच्यावतीने ५ विद्यार्थी, संगीता पाटील यांच्या वतीने ५ विद्यार्थी तर विजया पाटील (घुंडरे) यांच्यावतीने ५ विद्यार्थी, रूपाली जोंधळे यांच्यावतीने पाच विद्यार्थी अशा या दात्यांकडून एकूण १३८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली.
सुरेश वडगावकर, किसन राठोड, अशोक उमरगेकर यांनी अजित वडगावकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचे कौतुक केले. कृष्णा ढाळे व काळे साहेब यांनी शासनाच्या इतर शिष्यवृत्ती योजनांची माहिती दिली. व शिष्यवृत्ती हे बक्षीस नसून प्रेरणा आहे. या प्रेरणा व शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचा व परिवाराचा उद्धार करावा तसेच सध्याच्या दूषित वातावरणामध्ये पालकांनी आपल्या पाल्यांना योग्य ते संस्कार देऊन आदर्श नागरिक बनवण्याची गरज असल्याचे सांगितले.
विजयसिंह शिंदे यांनी शिक्षण क्षेत्रातील बदलते धोरण, विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधा त्यात येणाऱ्या अडचणी याची माहिती दिली. तसेच या शिक्षणाच्या बाजारामध्ये श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था पवित्र काम करत असल्याने सर्व संस्था पदाधिकारी, वडगावकर परिवार, शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक करत अजित वडगावकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना अजित वडगावकर यांनी दरवर्षी न विसरता आठवणीने वाढदिवस साजरा केला जातो म्हणून संस्थेतील सर्व घटकांचे आभार व्यक्त केले.
कैलास महाराज येवले यांनी अजित वडगावकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत विद्यालयातील अशा नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक करत श्री ज्ञानेश्वर विद्यालय विश्वविद्यालय होवो अशी प्रार्थना ईश्वराकडे केली.
सूत्रसंचालन योगेश मठपती यांनी व प्रदीप काळे यांनी आभार व्यक्त केले. पसायदानाने सांगता झाली.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment