SHRIMANT

Tuesday, October 6, 2026

गणेशनाथ महाराज संस्थानतर्फे कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा श्री भरतशेट गोगावले यांचा भव्य नागरी सत्कार व भूमिपूजन सोहळा उत्साहात

सद्गुरूस्वामी तपोनिधी श्री गणेशनाथ म. ४२ वा समाधी सोहळा संपन्न.
नीतिमत्तेने काम करीत राहिल्यास अडचण येत नाही- भरत गोगावले. चांगले कार्य करीत असल्यास कोणाला घाबरण्याची गरज नाही.-भरत गोगावले. दिवेआगार दुर्घटनेतील कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता मदत निधीतून मदत करणार -भरत गोगावले आळंदी देवाची, दि. ६ ऑक्टोबर २०२६ : सद्गुरू स्वामी श्री गणेशनाथ महाराज समाधी सोहळा हजारो वारकऱी भक्तांच्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केली होते. श्री गणेशनाथ महाराज संस्थान यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री नैतिकतेचा वारसा जपणारे श्री. भरतशेट विठाबाई मारुती गोगावले (रोजगार हमी योजना,फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री)यांचा भव्य नागरी सत्कार तसेच भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून श्री गणेशनाथ महाराज संस्थानचे संस्थापक अध्यक्ष, सद्गुरूस्वामी श्री अरविंदनाथजी म., विश्वस्त ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी देवाची येथील कबीर परंपरेचे श्री चैतन्य महाराज लोंढे (कबीर बुवा) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी श्री अजितजी वडगावकर, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था सचिव, आळंदी देवाची, महाडचे उपसभापती श्री. सुरेश महाडिक, समाजसेवक श्री. अनिलशेट वडगावकर, यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. श्री गणेशनाथ महाराज संस्थानच्या कार्याशी जोडलेले वीस हजारांहून अधिक साधक, नामधारक, भाविक तसेच संस्थेच्या विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने सकाळी ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या निनादात झालेल्या या मिरवणुकीने कार्यक्रमाची शोभा वाढली. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्री गणेशनाथ महाराज संस्थानच्या धार्मिक, आध्यात्मिक, सामाजिक व शैक्षणिक कार्याचा गौरव केला. संस्थानच्या माध्यमातून विविध भागांमध्ये सुरू असलेल्या अध्यात्मिक व समाजोपयोगी उपक्रमांमध्ये साधक व भाविकांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह. भ. प. श्री. संजय म.घाडगे यांनी केले..

No comments: