SHRIMANT
- श्री संत ज्ञानोबा तुकोबा विश्वभ्रमण दिंडी सोहळा दुबई २०२२
- श्री विश्वशांती जगद्गुरू सेवा संस्था
- सूत्रसंचालन
- "भाषण कला शिका "
- ऑनलाईन बँक खाते
- भाषणासाठी विषय निवडताना
- वक्तृत्व कला
- सर्वांगीण दृष्टी
- संवाद तंत्र
- करीअर
- होमी मिनिस्टर LIVE
- विदेश दौरे
- मी श्रीमंत आहे live show
- सूत्रसंचालनासाठी उपयुक्त चारोळ्या
- पुस्तके का वाचावीत
- सूत्रसंचालन
- मीडिया
- कामगार पुरस्कार सोहळा
- LIVE मुलाखत
- तिरुपती बालाजी दर्शन
- मराठी देशा
- विवेकानंदांची अतिशय महत्त्वाचे वाक्ये
- चांगले विचार
- ई- Paper वर्तमानपत्रे
- उपयोगी छोट्या कथा
- निवडक बोधकथांचा एक संग्रह
- फक्त विनोद - Only Jokes
- वक्तृत्व
- योगासने
- वाढदिवसाच्या शुभेच्छा
- Youtube
- News Blog
Wednesday, October 21, 2026
अलंकापुरीत माऊलींचे पालखीचे हरिनाम गजरात सीमोल्लंघन
श्रीरामाची पालखी, श्री स्वामींची पालखी,श्री भैरवनाथ महाराज पालखीचे स्वागत उत्साहात
श्री खंडोबाचे माळरान भाविकांचे गर्दीने फुलले
आळंदी / प्रतिनिधी : येथील खंडोबाचे माळरानावर माउलीचे पालखीसह श्री रामाची पालखी, श्री नरसिव्ह सरस्वती स्वामी महाराज पालखी, श्री भैरवनाथ महाराज ग्रामदैवत पालखी हरीनाम गजरात विजया दशमी दिनी सीमोल्लंघन उत्साहात झाले. श्रींचे सीमोल्लंघन प्रसंगी भाविक, नागरिकांनी पालखीतील श्रींचे दर्शनासह श्री खंडोबा देवदर्शनास गर्दी केली.
परंपरेने खंडोबा मंदिर माळरानावर या प्रसंगी आळंदी देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, योगी निरंजनाथ यांनी मंदिरात पहाटे पूजा विधी आदींसह व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, आळंदी खंडोबा मंदिरात आळंदी ग्रामस्थ, नगारखाना प्रमुख सचिन रानवडे, श्रींचे सेवक चोपदार राजाभाऊ रंधवे, बाळासाहेब रणदिवे, स्वामींचे पुजारी मुकुंदकाका गांधी, माऊलींचे मानकरी बाळासाहेब कुऱ्हाडे, संतोष मोझे, योगेश आरू, मंगेश आरु, माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, नंदकुमार कुऱ्हाडे, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील यांचे सह आळंदीतील विविध मंदिर देवस्थानचे प्रमुख पदाधिकारी, ग्रामस्थ,भाविक तसेच वारकरी उपस्थित होते.
श्री खंडोबा मंदिर माळरानावर परंपरेने शहरातून नागरिक, भाविक श्रीचे पालखीचे दर्शनास गर्दी केली. टाळ, मृदंग,वीणेच्या त्रिनादात दिड्यातील भाविक श्रींचे पालखीसह नामजयघोष करीत श्री खंडोबाचे दर्शनासह श्रींचे पालखी दर्शन आणि सीमोल्लंघनास उपस्थित होते.
श्री खंडोबा मंदिर प्रांगणात सर्व श्रींचे पालख्यांचे दर्शनास भाविकांनी मोठी गर्दी केली. नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, नगरसेवक सोमनाथ कुऱ्हाडे, गोविंद कुऱ्हाडे, ज्येष्ठ नागरिक बबनराव कुऱ्हाडे पाटील, सतीश कुऱ्हाडे, महेश कुऱ्हाडे, कुऱ्हाडे पाटील ग्रामस्थ यांनी सोहळ्यासह मान्यवर पदाधिकारी, संस्थांनचे विश्वस्त, व्यवस्थापक, सेवक यांचे स्वागत केले.
विजया दशमी निमित्त माउली मंदिरात पहाटे घंटानाद, काकडा आरती, पवमान अभिषेक पूजा, भाविकांच्या महीम्न पुजा, अभिषेक, भाविकांचे श्रीचे संजीवन समाधी दर्शन,श्रीना महानैवेध्य, माउलीचे बागेत शमी पूजन, विना मंडपात प्रवचन सेवा उत्साहात झाली.
श्रीचे पालखीचे शाही लवाजम्यासह सीमोल्लंघनास हरिनाम गजरात विविध मंदिरातून प्रस्थान झाले. आळंदी देवस्थानतर्फे श्रींची पालखी मंदिरात परत आल्यानंतर धुपारती त्यानंतर श्रीची नित्य नैमितिक पूजा आरती, विजया दशमी निमित्त आळंदीतील श्री रामाची, श्री स्वामी महाराज यांचे पालखीची मंदिर प्रदक्षिणा आणि मंदिरात आगमना उत्साहात झाले.
विजयादशमी दसरा आणि नवरात्रीतील प्रथा परंपरांचे पालन करीत आळंदीत संस्कृती जोपासण्यास प्राधान्य देण्यात आले. सोन्याचे प्रतिक असलेली आपट्याची पाने भाविक, नागरिकांनी एकमेकांना देत चांगले विचार जोपासण्याचा संदेश दिला. आळंदीतील मंदिरात भाविकांनी दर्शनास तसेच प्रागंणात नव्या गाड्यांचे पूजनास गर्दी केली. श्रींचे सीमोल्लंघन प्रसंगी श्रींचे पालख्यान समोर भजन, अभंग, आरतीत भाविक तल्लीन झाले. नागरिकांनी यावेळी उत्स्फूर्त दाद दिली.
श्रींचे पालखी मार्गावर दुतर्फा नागरिकांनी श्रींचे दर्शन घेतले. येथील भाईचारा फाउंडेशन कार्याध्यक्ष सुलतान शेख, राजेंद्र धोका परिवार, आळंदीकर ग्रामस्थ श्री खंडोबा मंदिर आदी यांनी पालख्याचे स्वागत केले. या वेळी क्रांती पार्क मधील नागरिक उपस्थित होते. आळंदीत विविध ठिकाणी विजया दशमी दसरा निमित्त नवोपक्रमांची सुरुवात झाली. विविध व्यापारी आस्थापनां मध्ये गृहोपयोगी वस्तूंचे खरेदीस ग्राहकांनी मोठी गर्दी केली. आळंदी तीर्थक्षेत्रात परंपरेचे पालन करीत विजया दशमी साजरी करण्यात आली. सीमोल्लंघन प्रसंगी भाविकांनी सोन्याचे प्रतीक असलेली आपट्याची पाने भेट देत एकमेकांना आलिंगन देत गळा भेट घेत उत्साहात शुभेच्छा दिल्या. आळंदी येथील पद्मावतीदेवी मंदिरात प्रथा परंपरांचे पालन करीत नवरात्रोत्सव उत्साहात पार पडला. यावेळी आळंदी देवस्थान यांनी भाविकांचे स्वागत करीत सेवासुविधा देत कमी वेळेत भाविक, महिला, पुरुषांना देवदर्शनची व्यवस्था करण्यास दहा दिवस परिश्रम घेतले. आळंदीतील सीमोल्लंघनात श्रींचे पालखी दर्शनास भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
श्री आवेकर भावे रामचंद्र संस्थान ट्रस्ट श्री राम मंदिर येथून श्री रामाची पालखी हरिनाम गजरात काढण्यात आली. या वेळी माजी ज्येष्ठ विश्वस्त बिपीन चौबे, प्रमुख विश्वस्त ॲड राहुल आवेकर, विश्वस्त अर्जुन मेदनकर, अविनाश गुळुंजकर, चिन्मय चौबे, रमेश मसुडगे, लक्ष्मीकांत दंडनाईक, महेश आयचित,सेवक लक्ष्मण मेदनकर, राजेंद्र जाधव, सचिन तापकीर, डी डी घुंडरे पाटील, योगेश आरू, गोविंद ठाकूर पाटील, विश्वकर्मा महाराज पांचाळ, स्वकाम सेवा मंडळ सेवक, शिवतेज मित्र मंडळ कार्यकर्ते, श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेचे साधक, विविध वारकरी शिक्षण संस्थांतील साधक मान्यवर आदी उपस्थित होते. विविध धार्मिक उपक्रमांचे माध्यमातून विजया दशमी दसरा सण उत्साहात साजरा झाला.
श्री भैरवनाथ महाराज पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी भैय्या वाघमारे, उत्सव कमिटी अध्यक्ष शंकरराव कुऱ्हाडे, सौरभ गव्हाणे, सतीश कुऱ्हाडे, उमेश कुऱ्हाडे, समीर कुऱ्हाडे, योगीराज कुऱ्हाडे, पुरुषोत्तम महाराज पाटील, प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, थोरल्या पादुका देवस्थान अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर, नरहरी महाराज चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
आळंदीतील सर्व पालखी मिरवणुकीचे वेगवेगळे मार्ग आणि निघण्याची ठिकाणे वेगवेगळी असल्याने आळंदी पोलिस स्टेशनचे वतीने वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके, पोलिस नाईक मच्छिंद्र शेंडे यांनी विशेष बैठक घेऊन मिरवणुकीचे मार्गावर पालखी मिरवणूक प्रसंगी पोलिस बंदोबस्त देऊन सुरळीत मिरवणूक व्हावी यासाठी विशेष परिश्रम घेतले. यामुळे मिरवणुकीचे मार्गावर रहदारीला, मिरवणुकीला वाहतूक कोंडीचा त्रास झाला नाही. सुरळीत, सुरक्षित श्रींचे पालखींची मिरवणूक हरिनाम गजरात पार पडली.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment