SHRIMANT
- श्री संत ज्ञानोबा तुकोबा विश्वभ्रमण दिंडी सोहळा दुबई २०२२
- श्री विश्वशांती जगद्गुरू सेवा संस्था
- सूत्रसंचालन
- "भाषण कला शिका "
- ऑनलाईन बँक खाते
- भाषणासाठी विषय निवडताना
- वक्तृत्व कला
- सर्वांगीण दृष्टी
- संवाद तंत्र
- करीअर
- होमी मिनिस्टर LIVE
- विदेश दौरे
- मी श्रीमंत आहे live show
- सूत्रसंचालनासाठी उपयुक्त चारोळ्या
- पुस्तके का वाचावीत
- सूत्रसंचालन
- मीडिया
- कामगार पुरस्कार सोहळा
- LIVE मुलाखत
- तिरुपती बालाजी दर्शन
- मराठी देशा
- विवेकानंदांची अतिशय महत्त्वाचे वाक्ये
- चांगले विचार
- ई- Paper वर्तमानपत्रे
- उपयोगी छोट्या कथा
- निवडक बोधकथांचा एक संग्रह
- फक्त विनोद - Only Jokes
- वक्तृत्व
- योगासने
- वाढदिवसाच्या शुभेच्छा
- Youtube
- News Blog
Tuesday, October 27, 2026
ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिरात राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त ५२९ विद्यार्थ्यांना गोळ्यांचे वाटप
मी24तास टीम आळंदी-राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त २७ ऑक्टोबर २०२६ रोजी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर व ज्ञानेश्वर बालक मंदिर आळंदी देवाची येथे जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने जंतनाशक गोळी मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. या मोहिमे अंतर्गत शाळेतील बालवाडी ते इयत्ता चौथीच्या ५२९ विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
खेड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विलास माने यांच्या मार्गदर्शनाखाली अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. मेडिकल ऑफिसर डॉ. प्रशांत खरात यांनी उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांना जंतनाशक गोळ्यांचे आरोग्याच्या दृष्टीने असणारे महत्त्व समजावून सांगत मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी, तसेच कुपोषण व अशक्तपणा टाळण्यासाठी सहा महिन्यातून एकदा जंतनाशक गोळी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद केले.
याप्रसंगी ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी आरोग्य विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक केले .आरोग्य विभाग व डॉक्टर त्यांचे सहकारी यांचे आभार मानले. मुख्याध्यापक प्रदीप काळे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत. डॉ. प्रशांत खरात, परिचारिका दैवशाला चाटे आणि शशिकांत नागरगोजे यांनी विद्यार्थ्यांना गोळ्यांचे वाटप केले. मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment