SHRIMANT
- श्री संत ज्ञानोबा तुकोबा विश्वभ्रमण दिंडी सोहळा दुबई २०२२
- श्री विश्वशांती जगद्गुरू सेवा संस्था
- सूत्रसंचालन
- "भाषण कला शिका "
- ऑनलाईन बँक खाते
- भाषणासाठी विषय निवडताना
- वक्तृत्व कला
- सर्वांगीण दृष्टी
- संवाद तंत्र
- करीअर
- होमी मिनिस्टर LIVE
- विदेश दौरे
- मी श्रीमंत आहे live show
- सूत्रसंचालनासाठी उपयुक्त चारोळ्या
- पुस्तके का वाचावीत
- सूत्रसंचालन
- मीडिया
- कामगार पुरस्कार सोहळा
- LIVE मुलाखत
- तिरुपती बालाजी दर्शन
- मराठी देशा
- विवेकानंदांची अतिशय महत्त्वाचे वाक्ये
- चांगले विचार
- ई- Paper वर्तमानपत्रे
- उपयोगी छोट्या कथा
- निवडक बोधकथांचा एक संग्रह
- फक्त विनोद - Only Jokes
- वक्तृत्व
- योगासने
- वाढदिवसाच्या शुभेच्छा
- Youtube
- News Blog
Friday, November 15, 2024
आळंदी पंचक्रोशीत काकडा आरतीची हरिनाम गजरात सांगता मंदिरांत पुष्प सजावट लक्षवेधी
आळंदी पंचक्रोशीत काकडा आरतीची हरिनाम गजरात सांगता
मंदिरांत पुष्प सजावट लक्षवेधी
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील पुणे आळंदी रस्त्यावरील श्री काशी विश्वेश्वर महाराज मंदिरात १९७३ पासून सुरु झालेली काकडा आरतीची परंपरा गेल्या ५१ वर्षांपासून अखंड काकडा आरती सुरु आहे. यात उत्तरोत्तर वाढ झाली असून आता युवक तरुण देखील यात सहभागी झाले आहेत. नागरिक भाविकांची पहाटे पासून काकडा आरतीला गर्दी वाढत आहे. माऊली मंदिरासह श्री ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर तसेच विविध मठ, मंदिरे, धर्मशाळा परिसरात विविध गावांमध्ये ही काकडा आरतीची परंपरा जतन केली जात आहे. या काकडा आरतीची सांगता त्रिपुरारी पौर्णिमा दिनी पुष्प सजावटीसह धार्मिक परंपरांचे पालन करण्यात आले. आळंदीतील काळेवाडी येथील श्री काशी विश्वेश्वर विठ्ठल मंदिरात कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमे पर्यंत काकड आरती चे आयोजन करण्यात आले होते. श्री काशी विश्वेश्वर मंदिरात पहाटे पाच ते सात या वेळेत धार्मिक कार्यक्रम कार्तिक स्नान, काकड आरतीची सुमधुर अभंग ,भजन ,गवळणी, गायन असे कार्यक्रम झाले आहेत. त्रिपुरारी पौर्णिमेला काकडा आरती समाप्ती शुक्रवारी ( दि. १५ ) काल्याचे किर्तन ह. भ. प. नंदकुमार बंदीष्टे महाराज यांचे कीर्तनाने सांगता झाली. काळेवाडी येथे काशी विश्वेश्वर मंदिरात कार्तिक स्नान निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले. ज्ञानाई भजनी मंडळ, काळेवाडी यांचे भजन, वाघजाई भजनी मंडळ यांचे संगीत भजन, शुक्रवारी पहाटे काकडा आरती व महापूजा, महाप्रसाद वाटप उत्साहात झाले. कार्यक्रमाचे संयोजन बंडू उर्फ नाना काळे, समस्त काळेवाडी ग्रामस्थ यांचे वतीने करण्यात आले होते. काल्याचे किर्तन झाल्यानंतर सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. विश्वस्त प्रकाश काळे, बाबूराव काळे, शाबाजी काळे गुरुजी, सुरेश झोंबाडे, रामदास निकस, हनुमंत तापकीर, किरण काळे, गणेश पवार, स्वप्निल काळे, शंकर वाजे, धनाजी काळे, अशोक तापकीर आदींनी विशेष परिश्रम घेतले.
श्री काशी विश्वेश्वर महाराज मंदिरात काकडा आरतीचा उपक्रम ५१ वर्षांपासून सुरु असल्याचे बंडूनाना काळे यांनी सांगितले. यात विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. काळेवाडी मधिल नागरिकांच्या माध्यमातून हा उपक्रम अखंड सुरु आहे. यात दैनंदिन काकड आरती, भजन व महापूजा आदींचा समावेश आहे. या वर्षीची सांगता काकडा आरती महापूजा, ग्राम दिंडी प्रदक्षिणा, काल्याचे हरिकीर्तन आणि महाप्रसाद वाटपाने होणार आहे. आळंदी काळेवाडी ग्रामस्थांच्या वतीने या काकडा आरतीचे परंपरेने आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षां पासून काळेवाडीतील श्री काशीविश्वेश्वर महाराज मंदिरात काकडा आरती उत्सवात विविध अभंग आणि किर्तन, गायनाने भल्या पहाटे पासून भक्ति मंगलमय वातावरणात काकडा आरती व प्रसाद वाटप सुरु झाले आहे. या मंदिराचा नुकताच जीर्णोद्धार करण्यात आल्याने मंदिरही प्रशस्त झाले आहे. यामुळे मंदिरात परिसरातून भाविकांची उपस्थिती वाढली आहे. आळंदीत वारकरी संप्रदाय आणि संत परंपरेची विचारधारा काकडा आरतीने ही समाजात रुजली आहे. तीर्थक्षेत्र आळंदीतील माऊली मंदिरासह विविध मठ, मंदिरे, धर्मशाळासह आळंदीतील पंचक्रोशीतील विविध गावांमध्ये ही काकडा आरतीची परंपरा जतन केली जात आहे. यात युवक तरुणांचा सहभाग देखील लक्षणीय आहे.
अडबंगनाथ मंदिरात काकड आरती उत्साहात
डुडुळगाव ( ता. हवेली ) येथील अडबंगनाथ मंदिरात देखील काकड आरतीचा धार्मिक कार्यक्रम हरिनाम गजरात झाला. या ठिकाणी नियमित पहाटे चार ते साडेसात पर्यंत धार्मिक कार्यक्रम, काकडा, आरती सह भजन कीर्तन, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रम पहाटे मंगलमय वातावरणात झाले. यासाठी डुडूळगाव ग्रामस्थांसह परिसरातील भाविक भक्त यांची उपस्थिती मोठी राहिली. डुडूळगाव येथील धार्मिक पंथातील ज्येष्ठ नागरिक तसेच तरूण वर्ग, महिला व भाविक या ठिकाणी पहाटे काकड आरतीचा अनुभव घेत आहेत. माउली मंदिरात ही मंदिरातील प्रथांचे पालन करीत धार्मिक कार्यक्रमांनी काकडा उपक्रम राबविण्यात आला.
निघोजेत भैरवनाथ मंदिरात महीनाभर काकड आरती ; हरिनाम गजरात
निघोजे येथील भैरवनाथ मंदिरामध्ये महीनाभर चालणारी काकड आरती आजच्या दिवशी सांगता हरिनाम गजरात विविध कार्यक्रमांनी झाली. महीला मंडळ व निघोजे ग्रामस्थ यांच्या हासते महापुजा आयोजित करुन सकाळी ९ ते १० यावेळी गावातुन दिंडी मिरवणूक काढण्यात आली, मंदिरामध्ये आज ,टाळ, मृदंग ,वीणा, पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन पालखी व विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबा माऊली भजन करीत, गावातील ग्रामस्थ व महिला यांनी दिंडीचा आनंद घेतला, गवळण फुगडी खेळताना भावीक उत्साहीत वाटत होते,व गावातील ग्रामस्थ व महिला यांनी काल्याचा माहाप्रसाद घेण्यात आला व काकड आरतीच्या काल्याची समाप्ती करण्यात आली,
तीर्थक्षेत्र आळंदीतील श्री ग्रामदैवत भैरवनाथ महाराज मंदिरात काकड आरती ची सांगता हरिनाम गजरात झाली यावेळी रामचंद्र बोरुडे महाराज यांचे काल्याचे किर्तन झाले तत्पूर्वी हरिपाठ त्यानंतर तुलसी विवाह रात्री दीपोत्सव काकडा महाप्रसाद वाटप मोठ्या उत्साहात करण्यात आले भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी करून दर्शन घेतले. यावेळी श्री ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यांचे पालखीची ग्राम प्रदक्षिणा उत्साहात झाली.
आळंदी भैरवनाथ मंदिरात दीपोत्सव त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्त उत्साहात झाला. यावेळी श्रीजीत कुऱ्हाडे यांचे तर्फे काकडा महाप्रसाद झाला. यावेळी आळंदी ग्रामस्त, श्रीक्षेत्रोपाध्ये श्रींचे पुजारी भैय्या उर्फ ज्ञानेश्वर वाघमारे, सुरेश वाघमारे , मंगल वाघमारे, पंडित रानवडे, वसंत घुंडरे, दत्तात्रय कुऱ्हाडे, विशाल रानवडे, बाळासाहेब घुंडरे, दळवी मामा, उत्सव समिती अध्यक्ष शंकरराव कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर घुंडरे पाटील, आळंदी ग्रामस्त, पदाधिकारी, गावकरी भजनी मंडळ आदी उपस्थित होते. गेला महिनाभर काकडा निमित्त पूजा, आरती, महा प्रसाद, भजन, कीर्तन आदींसह धार्मिक कार्यक्रम परंपरांचे पकडणं करीत हरिनाम गजरात झाले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment