SHRIMANT

Saturday, December 28, 2024

रक्तदान शिबिरास उत्साही प्रतिसाद ; 242 रक्तदात्यांचे रक्तदान

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : खेड तालुक्याचे शिवसेनेचे प्रथम आमदार स्व. सुरेशभाऊ गोरे यांच्या जयंती निमित्त स्व.आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठान, खेड तालुका यांच्या वतीने चाकण येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
कार्यक्रमा साठी तालुक्यातून स्व.सुरेश भाऊंवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या वेळी २४२ रक्तदात्यानी रक्तदान केले. एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांनी रक्तदान करीत उत्साही प्रतिसाद दिला. या प्रसंगी विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या मा.ना.डॉ.नीलमताई गोऱ्हे या उपस्थित होत्या. या वेळी स्व.सुरेशभाऊ गोरे यांना आदरांजली अर्पण केली. स्व.आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या स्मरणार्थ चाकण शहरात सांस्कृतिक भवन व वाचनालय बांधण्यासाठी २५ लाखांचा निधी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. महिलांच्या सुरक्षेतेच्या दृष्टीने विशेष भवन बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितिन गोरे यांनी आभार व्यक्त केले. यावेळी खेड तालुक्याचे आमदार बाबाजीशेठ काळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील, उपसभापती क्रंतीताई सोमवंशी, संचालक सोमनाथ मुंगसे, अनुराग जैद, सागर मुऱ्हे, माणिक गोरे, महेंद्र गोरे, जिल्हा परिषद सदस्या रुपालीताई कड, पंचायत समितीच्या सभापती ज्योतीताई आरगडे, शिवसेना जिल्हाप्रमुख भगवानशेठ पोखरकर, शिवाजीराजे वर्पे, तहसीलदार ज्योतीताई देवरे, मनीषाताई गोरे, चाकण नगरपरिषद नगराध्यक्षा मंगल गोरे, नगरसेवक निलेश गोरे, महेश शेवकरी, रोनक गोरे, चाकण नागरी सह पतसंस्थेचे चेअरमन गोरक्षनाथ कांडगे, व्हा.चेअरमन लक्ष्मण वाघ, संचालक अशोक बिरदवडे, सुनील नायकवाडी, निलेश टिळेकर, निलेश जाधव, बाबाजी राक्षे, अशोक परदेशी, अभी मुटके, जगदीश मेदनकर, बाळासाहेब पठारे, संचालक, पदाधिकारी, सदस्य, खेडतालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments: