SHRIMANT

Thursday, December 5, 2024

मराठा महासंघाचा शतकोत्तर रौप्य वर्षा निमित्त आयोजित संत पूजन सोहळा समाजाला दिशा दर्शक ठरेल

श्री क्षेत्र आळंदी येथे 26/12/2024 रोजी मराठा महासंघाचा शतकोत्तर रौप्य वर्षा निमित्त आयोजित संत पूजन सोहळा समाजाला दिशा दर्शक ठरेल *दिलीप दादा जगताप* _________________________
अखिल भारतीय मराठा महासंघ ही सामाजिक संघटना राजश्री शाहू महाराज यांच्या आशीर्वादाने इ.स. 1900 साली तत्कालीन समाजव्यवस्थेच्या विरुद्ध बहुजन समाजाला एकत्र करून ज्ञानी बनवणे अज्ञान दूर करून सशक्त समाज निर्माण करणे भारताच्या स्वातंत्र्यासाठी जनजागृती करणे या साठी स्थापन झाली. या संस्थेचे जुने नाव क्षत्रिय मराठा ज्ञाती समाज या नावाने तत्कालीन समाज पुढारी देशभर सभा संमेलने घेऊन शिक्षणाचा पुरस्कार करीत असत बहुजन समाजाने शिकावे सुसंस्कृत व्हावे हीच भावना तत्कालीन नेत्या मध्ये होती. स्वतंत्र लढ्यात भाग घेण्यापासून ते संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मिती पर्यंत अनेक आंदोलनात क्षत्रिय मराठा ज्ञाती समाजाची नेते कार्यकर्ते अग्रभागी असतं. 1978 साली क्षत्रिय मराठा ज्ञाती समाजाची भव्य अधिवेशन मुंबई येथे पार पडले या अधिवेशनाला देश विदेशातून समाज बंधू हजार होते, याच अधिवेशनात आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या सर्व समाजाला सवलती द्या अशी मागणी करण्यात आली 1981 मध्ये क्षत्रिय मराठा ज्ञाती समाजाचे नाव बदलून अखिल भारतीय मराठा महासंघ करण्यात आले आणि माथाडी कामगार नेते कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वा खाली आरक्षणाच्या मागणीने पुन्हा रान पेटले स्व. अण्णासाहेब यांच्या अचानक जाण्याने समाज पोरका झाला. अशा बीकट प्रसंगी अँड. शशिकांत(अप्पासाहेब) पवार यांनी महासंघाची धुरा सांभाळली सतत 50 वर्ष आरक्षणाची लढाई लढता लढता दि. 07/02/2023 रोजी अखेरचा श्वास घेतला, दि. 24 व 25 डिसेंबर 2000 या साली मराठा महासंघाचा शतक महोत्सव कार्यक्रम शिवाजी पार्क मुंबई येथे गगनगिरी महाराजांच्या नेतृत्व खाली घेण्यात आला या प्रसंगी अनेक संत मंडळी उपस्थित होती पुढील 2025 पर्यंत महासंघाने अनेक चढउतार पाहिले अनेक संघर्षातून जावे लागले परंतु साधू संत महात्मे यांच्या आशीर्वादाने 125 वे वर्ष साजरे करण्याचे भाग्य आम्हास मिळाले.
मराठा महासंघ पुढील 100 वर्ष समाज सेवेत रहावा यासाठी दि. 26/12/2024 श्री क्षेत्र आळंदी देवाची येथे वै. गोविंद महाराज केंद्रे संस्थापित श्री ज्ञानेश्वरी मंदिर गोपाळपूरा येथे दुपारी 2-6 या वेळेत अखिल भारतीय मराठा महासंघ व जगद्गुरु तुकाराम महाराज सामाजिक अध्यात्मिक प्रतिष्ठान आयोजित संत पूजन तथा गुणगौरव समारंभ समाजाला दिशा दर्शक ठरेल असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. दिलीप दादा जगताप यांनी महाराष्ट्रातील झंझावाती दौऱ्यात केले दि. 25/11/2024 रोजी मराठा महासंघाचे मध्यवर्ती कार्यालय शिवाजी मंदिर दादर येथे या कार्यक्रमाच्या पूर्व तयारीचा आढावा घेतला .आयोजित बैठकीला महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानवटे,राष्ट्रीय सरचिटणीस संभाजी राजे दहातोंडे,राष्ट्रीय चिटणीस दशरथ पिसाळ,मराठा महासंघाचे ज्येष्ठ नेते दास शेळके,महासंघाचे पदाधिकारी दीपक धंद्रे,मुंबई शहर अध्यक्ष धोंडू जाधव, जगद्गुरु तुकाराम महाराज सामाजिक अध्यात्मिक प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष बब्रुवान शेंडगे पाटील इ. उपस्थित होते. आळंदी येथे संपन्न होत असलेल्या समारंभात अँड. स्वर्गीय शशिकांत पवार यांच्या स्मरणार्थ समाजात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना मराठा भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मा. दिलिप दादा जगताप यांनी दिली, या समारंभाचे स्वागत अध्यक्ष म्हणून ह.भ. प चैतन्य महाराज कबीर यांची निवड करण्यात आली आहे, या धार्मिक सांस्कृतिक सोहळ्याचे मंगलमय वातावरणात माजी. केंद्रीय मंत्री जयसिंग राव गायकवाड पाटील यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे यावेळी व्यासपीठावर आशीर्वाद देण्यासाठी शांती ब्रम्ह गुरुवर्य मारुती महाराज कुरेकर ,संत साहित्याचे अभ्यासक डॉ. नारायण जाधव,ज्ञानेश्वर माऊली संस्थांचे विश्वस्त मा. निरंजन शास्त्री डॉ. भावार्थ देखणे, जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज बापूसाहेब महाराज देहुकर यांची उपस्थिती लाभणार आहे. मराठा महासंघाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त 125 संत महंत यांचे संत पूजन व श्री क्षेत्र आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेला सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून या सोहळ्यासाठी सर्व फडकरी राज्यातील वारकरी शिक्षण संस्था यांना निमंत्रित करण्यात आले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आळंदी ग्रामस्थ मा. श्री संजय घुंडरे पाटील प्रदेश अध्यक्ष अध्यात्मिक आघाडी मा. श्री डी.डी. भोसले नगरसेवक आळंदी माजी नगर उपाध्यक्ष आनंद कुराडे पाटील अजित वडगावकर संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर विद्यालय आळंदी, ह.भ.प राम महाराज शेळके ,दिनू भाऊ शेंडगे पाटील, डॉ. संजय मस्के,विजयकुमार अंडील पारगावकर,नारायण शेळके, उत्तम अंडिल. बीड जिल्हा मराठा महासंघाचे अध्यक्ष श्री गणेश नाईकवाडे, वडवणी तालुका मराठा आरक्षण संघर्ष योद्धा संतोष दादा दावकर, महादेव शेळके पाटील, अँड. राज पाटील , पत्रकार अशोक निपटे इ. अथक परिश्रम घेत आहेत. प्रति - मा. संपादक.............जिल्हा प्रतिनिधी...........दैनिक..........यांना देऊन विनंती करण्यात येते की वरील वृत्त आपल्या लोक प्रिय दैनिकात प्रसिध्दी देऊन सहकार्य करावे संतचरणरज बब्रुवान जगन्नाथ शेंडगे पाटील,संस्थापक अध्यक्ष जगद्गुरु तुकाराम महाराज सामाजिक अध्यात्मिक प्रतिष्ठान

No comments: