SHRIMANT

Sunday, December 8, 2024

भारतातील चमत्कारिक ठिकाण: वाराणसीचा मणिकर्णिका घाट

मागच्या वेळी जेव्हा मी दॅट्स स्ट्रेंज श्रृंखलेकरिता ब्लॉग लिहिला होता तेव्हा माझ्या एका मित्राने सहजच विचारले होते, “चमत्कारिक ठिकाणे फक्त विदेशातच असतात का?” आणि त्यावर मी उत्तर दिले होते, “अर्थातच नाही! भारतातही बरीच चमत्कारिक ठिकाणे आहे. मी चांद बावडी, करणी माता... विषयी लिहले आहे ते लक्षात आहे...”
... आणि या संभाषणाने मला विचारात पाडले. कुणालाही निःशब्द करतील अशा भारतातील बऱ्याचशा चमत्कारिक ठिकाणांना मी विसरले याचे मलाच आश्चर्य वाटायला लागले. याच कारणामुळे दॅट्स स्ट्रेंज श्रृंखलेमधील (याहू! श्रृंखलेल्या दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद) माझा दहावा ब्लॉग भारताच्या विचित्र ठिकाणांना समर्पित आहे. तसे बघता फक्त धार्मिक श्रद्धा, चमत्कार, दंतकथा, निसर्गाची अद्भूत आश्चर्ये आणि इतिहास ज्यांनी कधीही विसरता न येणारे असे गूढ अनुभव दिलेले आहेत, हे सर्व एकाच ब्लॉगमध्ये सामावणे अशक्य आहे. वाराणसीची दुसरी बाजू शोधणे धर्माविषयी बोलताना, भारत असे ठिकाण आहे जेथे हे बरेच वेगवेगळे विश्वास आणि प्रथा एकत्र नांदतात. इथल्या बऱ्याचशा समाधी व धार्मिक स्थळांमध्ये विश्वास अशाप्रकारे सामावलेला आहे की त्यामुळे नास्तिक व्यक्तीचीही भंबेरी उडते. तर आपण थेट वाराणसीच्या पवित्र भूमीकडे वाटचाल करूयात आणि मणिकर्णिका घाटावरील मरणासन्न स्थिरतेचा अनुभव घेऊया.
प्रवासाशी जवळचा संबंध आल्याने मला सर्व प्रकारच्या पर्यटनाचा अनुभव आहे – साहसी, पर्यावरणस्नेही, सांस्कृतिक आणि आभासी सुद्धा. मात्र काहीही इतके विचित्र आणि भयानक नाही जितके मृत्यूचे पर्यटन आहे! वाराणसीमधील गूढ मणिकर्णिका घाटाचा फक्त यावरच उदरनिर्वाह चालतो. असा एकही दिवस जात नाही जेव्हा येथे मृत शरीरांवर अंत्यसंस्कार केले जात नाही, त्यांची संख्या प्रत्येक दिवशी दोनशे ते तीनशे पर्यंत वाढते. येथे उघड्यावर ठेवलेल्या मृतदेहांना जळताना पाहण्यासाठी पर्यटक येतात हे जाणून घेणे विलक्षण असण्यापेक्षा विचित्रच जास्त आहे. अंतिम विधी तेव्हा सुरू होतात जेव्हा मृत शरीरे (कपड्यामध्ये गुंडाळलेले) येथे हवेत गुंजणाऱ्या ‘राम नाम सत्य है’ च्या घोषणेसोबत बांबूच्या तिरडीवर आणले जातात. त्यानंतर, वजन व वापरल्या जाणाऱ्या लाकडाच्या प्रकारानुसार अंत्यसंस्काराची किंमत ठरवली जाते. उपलब्ध असलेल्या लाकडाच्या प्रकारांमध्ये चंदनाचे लाकूड सर्वात महाग आहे. त्यानंतर प्रेत गंगा नदीच्या पाण्यात डुबवले जाते आणि चिता रचण्याकरिता लाकडे एकावर एक ठेवले जातात. जरी येथे फोटो काढण्याची परवानगी नसली तरीसुद्धा बरेच पर्यटक विशेषत: विदेशी पर्यटक घाटाचा व्हिडिओ घेतात आणि बोटीवर शहरभ्रमण करीत असताना इथले फोटो काढतात. असे ठिकाण जेथे मृत्यू संपतो भगवान शिवने मणिकर्णिका घाटाला चिरंतन शांतीचे वरदान दिले असल्याची दंतकथा आहे. अशी ख्याती आहे की भगवान विष्णूने काशीला ज्यास पूर्वी वाराणसी म्हणून ओळखले जात होते तिला जगाचा नाश करताना नष्ट न करण्यासाठी हजारो वर्षे भगवान शिवची प्रार्थना केली होती. भगवान विष्णूंनी मनापासून केलेल्या प्रार्थनेमुळे प्रसन्न होऊन भगवान शिव आपल्या पत्नीसोबत म्हणजेच पार्वतीसोबत काशीला आले आणि त्यांची इच्छा पूर्ण केली. याचा परिणाम म्हणून वाराणसीमध्ये कुठल्याही शरीराचा अंत्यसंस्कार झाल्यास त्याच्या आत्म्याला मोक्षप्राप्ती (जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून संपूर्ण मुक्ती) मिळते. त्यामुळे यात काहीच आश्चर्य नाही की, या भूमीला हिंदूंद्वारे अंतिम संस्कार करण्याकरिता सर्वात पवित्र भूमी समजले जाते. महा स्मशानाला हे नाव का पडले याच्या आणखी काही दंतकथा आहेत. यापैकी एक आहे की शिव व पार्वतीच्या आंघोळीकरिता विष्णूंनी एक विहीर खोदली (ज्याला आता मणिकर्णिका कुंड म्हटले जाते). जेव्हा शिव त्यामध्ये आंघोळ करीत होते तेव्हा त्यांच्या कानातील एक डुल विहिरीत पडला आणि तेव्हापासून या ठिकाणाला मणिकर्णिका म्हटले जाते (मणी म्हणजे डुलमधील दागिना आणि कर्णम म्हणजे कान). मणिकर्णिका घाटावर मृत्यूचा उत्सव साजरा केला जातो. दिवसातील प्रत्येक तासाला पश्चात्तापदग्ध मंत्रोच्चार उच्चारले जातात आणि मृत शरीरे अनंतात विलीन होत असताना रात्रं-दिवस या भागामध्ये धूर भरून राहतो. या घाटाला बरेच भाविक स्वर्गाचे द्वार असेही म्हणतात. आपल्याला स्वर्गात घेऊन जाणाऱ्या जागेला भेट दिल्यानंतर आता अशा जागेला भेट देऊया जी आपल्याला.... थांबा, ते माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये!

No comments: