SHRIMANT
- श्री संत ज्ञानोबा तुकोबा विश्वभ्रमण दिंडी सोहळा दुबई २०२२
- श्री विश्वशांती जगद्गुरू सेवा संस्था
- सूत्रसंचालन
- "भाषण कला शिका "
- ऑनलाईन बँक खाते
- भाषणासाठी विषय निवडताना
- वक्तृत्व कला
- सर्वांगीण दृष्टी
- संवाद तंत्र
- करीअर
- होमी मिनिस्टर LIVE
- विदेश दौरे
- मी श्रीमंत आहे live show
- सूत्रसंचालनासाठी उपयुक्त चारोळ्या
- पुस्तके का वाचावीत
- सूत्रसंचालन
- मीडिया
- कामगार पुरस्कार सोहळा
- LIVE मुलाखत
- तिरुपती बालाजी दर्शन
- मराठी देशा
- विवेकानंदांची अतिशय महत्त्वाचे वाक्ये
- चांगले विचार
- ई- Paper वर्तमानपत्रे
- उपयोगी छोट्या कथा
- निवडक बोधकथांचा एक संग्रह
- फक्त विनोद - Only Jokes
- वक्तृत्व
- योगासने
- वाढदिवसाच्या शुभेच्छा
- Youtube
- News Blog
Tuesday, January 14, 2025
मॉरिशसचे कला व सांस्कृतिक मंत्री महेंद्र गोंदिया यांची आळंदीस भेट
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरास मॉरिशसचे कला व सांस्कृतिक मंत्री महेंद्र गोंदिया यांनी सदिच्छा भेट देऊन श्रींचे संजीवन समाधी मंदिरात दर्शन घेतले.
आळंदीतील बांधकाम व्यावसायिक आणि श्रींचे सेवक चोपदार रामभाऊ रंधवे डिसेंबर २४ मध्ये मॉरिशस ट्रिप साठी गेले होते. यावेळी तेथे त्यांचा तेथील कला व सांस्कृतिक मंत्री महेंद्र गोंदिया यांचा परिचय झाला. ते जानेवारी २५ मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणा वरून भुवनेश्वर येथे ‘ विश्व प्रवासी दिना निमित्त भारतात येणार असल्याचे चवदार यांना समजले. यावेळी चवदार यांनी त्यांना आळंदी येण्यास आग्रह केला. त्यांचा दौरा अत्यंत व्यस्त असताना देखील या दरम्यान त्यांनी वेळ काढून कला व सांस्कृतिक मंत्री महेंद्र गोंदिया यांनी केलेल्या विनंतीला मान देऊन पुणे दौऱ्यात श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. त्या नंतर आळंदी येथे माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. फक्त दर्शन हा उद्देश न ठेवता त्यांनी श्रीमंत दगडूशेठ ट्रस्ट चे सामाजिक कार्य उत्सुकतेने समजावून घेतले. तसेच ट्रस्टीना एखाद्या चतुर्थी ला मॉरिशस मधील गणेश मंदिरात येण्यास देखील त्यांनी निमंत्रित केले. आळंदी दौऱ्यात त्यांच्या पत्नीने वारकरी संप्रदाय, संतांची सामाजिक जडणघडण, आषाढी वारी याबद्दलची माहिती वेदान्त कडून जाणून घेतली. आणि सर्वात महत्त्वाचे चोपदार कुटुंबाच्या आग्रहाखातर पुणे येथील ‘ विठ्ठल निवास’ येथे भेट देऊन विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. सध्या भारतीयांमध्ये परदेशवारी करण्याची हौस वाढली आहे. परंतु मॉरिशस हा असा देश जिथे भारतीय मराठी माणसे १५० ते २०० वर्षांपूर्वी स्थायीक झाली आहेत. तिथे टुरिझम च्या माध्यमातून भारतीयांचा ओघ तसा तुलनेत कमीच आहे. ४-५ पिढ्यांपूर्वी स्थलांतरित झालेली ही मंडळी तरीही आपली हिंदू संस्कृती, वारकरी संस्कृती यांनी निष्ठेने टिकवून ठेवली आहे, निदान त्यासाठी एकदा तरी मॉरिशसची सफर करायलाच हवी. बाकी हा देश जितका सुंदर तितकीच तेथील माणसेही मनमिळावू आहेत. प्रचंड महत्त्वाचे खाते, पोर्ट लुईस या मॉरिशस चे माजी महापौर, आणि अत्यंत यशस्वी उद्योजक असुनही त्यांचा काल दिवसभरातील सहवास हा मनात घर करून गेला असे रामभाऊ चोपदार यांनी सांगितले. आपण महाराष्ट्रातील आणि भारतातील राजकीय नेत्यांचा निवडणूक काळ वगळता सामान्य जनतेशी असलेली वागणुक अनुभवता मॉरिशस मधील मंत्री महेंद्र सरांचा वावर हा माझ्या दृष्टीने निश्चितच आश्चर्याचा धक्का होता असे त्यांनी सांगितले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment