SHRIMANT

Saturday, January 18, 2025

बालचमुंनी लुटला सहलीचा आनंद आळंदी देवाची

शनिवार दिनांक 18/1/2025 श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर, आळंदी देवाची (बालवाडी) व श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर, आळंदी देवाची (इयत्ता पहिली, दुसरी) प्रशालेची शैक्षणिक सहल भोसरी सहल केंद्र, भोसरी या ठिकाणी आज सकाळी तीन बसेस द्वारे पोहोचल्या. सहलीस शुभेच्छा देण्यासाठी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, ह.भ.प.किसन सोपान डोंबाळे लासुर्ने, ता.इंदापूर ,मा. नगरसेवक श्रीधरजी कुऱ्हाडे व बहुसंख्य पालक उपस्थित होते. संस्था अध्यक्ष सुरेश वडगावकर यांनी प्रशालेची सहल यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
भोसरी येथील सहल केंद्रामध्ये विद्यार्थ्यांनी घसरगुंडी, झोके, क्लाइंबिंग रोपवे, रोलर गंमत गिरकी, सिसॉ, किल्ल्यामधील क्लाइंबिंग राऊंड यांसारखे अनेक गमतीशीर खेळ खेळत आनंद लुटला.
विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण म्हणजेच व्हेज बिर्याणी व पायनॅपल शिरा, बिस्किट देण्यात आले. विद्यार्थ्यांनी भोसरी येथील सहल केंद्रामध्ये गायन,नृत्य व अभिनय करत आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले. सहलीचे नियोजन प्रशालेचे मुख्याध्यापक प्रदीप काळे यांनी केले, प्रशालेच्या उपशिक्षिका निशा कांबळे व सर्व सहकारी शिक्षकांच्या मोलाच्या सहकार्याने सहल यशस्वी पार पडली.

No comments: