SHRIMANT

Tuesday, March 4, 2025

परिचय भागवत धर्माचा ओळख श्री ज्ञानेश्वरीची" पुस्तकाचे प्रकाशन

पुणे आळंदी डिजीटल मिडिया - गेल्या ४ वर्षापासून शालेय विद्यार्थ्यांच्या मूल्यसंवर्धनासाठी ओळख श्री ज्ञानेश्वरीची या उपक्रमात श्री भागवत जी साळुंके व मी सक्रिय सहभागी होऊन एका चांगल्या उपक्रमाची संरचना करता आली श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरी मधील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदन करणाऱ्या विविध विषयावर बाल गोपाळांशी मैत्री पूर्ण संवाद साधत असताना ,श्री ज्ञानेश्वरी वरील शालेय अभ्यासक्रम
देशातील ज्येष्ठ अर्थतज्ञ व संत साहित्याचे अभ्यासक गु.श्री. अभय जी टिळक सर यांच्या सोबत "परिचय भागवत धर्माचा ओळख श्री ज्ञानेश्वरीची" या पुस्तका द्वारे करण्याचे भाग्य लाभले. महाराष्ट्र राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा मंत्री श्री उदयजी सामंत यांचे हस्ते या पुस्तके चे प्रकाशन श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर आळंदी देवाची येथे संपन्न झाले श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान ने या उपक्रमाची जबाबदारी घेऊन उपक्रमाची व्यापकता वाढवली आहे तत्कालीन विश्वस्त श्री योगेश जी देसाई , ॲड विकास ढगे पाटील यांनी या उपक्रमा बद्दल सकारात्मक विचार करून मोलाचे पाठबळ दिले व विद्यमान विश्वस्त मंडळ श्री योगी निरंजन नाथ, डॉ भावार्थ देखणे, ॲड राजेंद्र उमाप यांच्या द्वारा ओळख श्री ज्ञानेश्वरीची या उपक्रमाच्या अभ्यासक्रम पुस्तकाचे संस्थानच्या वतीने प्रकाशित करून भव्य प्रकाशन सोहळ्याचे आयोजन केले.

No comments: