SHRIMANT
- श्री संत ज्ञानोबा तुकोबा विश्वभ्रमण दिंडी सोहळा दुबई २०२२
- श्री विश्वशांती जगद्गुरू सेवा संस्था
- सूत्रसंचालन
- "भाषण कला शिका "
- ऑनलाईन बँक खाते
- भाषणासाठी विषय निवडताना
- वक्तृत्व कला
- सर्वांगीण दृष्टी
- संवाद तंत्र
- करीअर
- होमी मिनिस्टर LIVE
- विदेश दौरे
- मी श्रीमंत आहे live show
- सूत्रसंचालनासाठी उपयुक्त चारोळ्या
- पुस्तके का वाचावीत
- सूत्रसंचालन
- मीडिया
- कामगार पुरस्कार सोहळा
- LIVE मुलाखत
- तिरुपती बालाजी दर्शन
- मराठी देशा
- विवेकानंदांची अतिशय महत्त्वाचे वाक्ये
- चांगले विचार
- ई- Paper वर्तमानपत्रे
- उपयोगी छोट्या कथा
- निवडक बोधकथांचा एक संग्रह
- फक्त विनोद - Only Jokes
- वक्तृत्व
- योगासने
- वाढदिवसाच्या शुभेच्छा
- Youtube
- News Blog
Tuesday, March 4, 2025
संस्कृति संवर्धन प्रतिष्ठान व पतंजली योग समिती, पिंपरी-चिंचवड
पुणे डिजिटल मिडिया
नैतिक शिक्षण योजना परीक्षा २०२५ पारितोषिक पारितोषिक वितरण समारंभ शनिवार दिनांक १ मार्च २०२५ ला सकाळी १० ते १२ या वेळेत मनोहर सभागृह, ज्ञानप्रबोधिनी, निगडी येथे संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय गोपती दास ( इस्कॉन मंदिर ), श्री महेश्वरजी मराठे व श्री नरेंद्र पेंडसे ( राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ), हभप किसन महाराज चौधरी, मुंबईहून सौ. अलकाताई गोडबोले हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने व शंखध्वनीने झाली. साप्ताहिक आनंद वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या एकात्मता मंत्राने कार्यक्रमाची सुरुवात केली. आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानचे जिल्हा अध्यक्ष ॲड. शांताराम दामगुडे, उपाध्यक्ष श्री रविंद्र बराटे, सहसंयोजक सुधाकर शिंदे, वामन कुडे, सहसंयोजिका सौ मृणालिनी कुलकर्णी यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ अलकाताई गोडबोले यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमात ज्ञानप्रबोधिनी, ज्ञानदीप विद्यामंदिर, राजा शिवछत्रपती विद्यालय व खिंवसरा पाटील विद्यालय या शाळांच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले. मान्यवरांच्या हस्ते नैतिक शिक्षण योजना परीक्षा २०२५ या परीक्षेत विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आले. ॲड, शांताराम दामगुडे यांचे आभार प्रदर्शन झाल्यानंतर शांतीमंत्र आणि उद्घोष डॉ अजित जगताप यांनी घेतला. समारोपानंतर उपस्थित सर्वांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला एकूण ३५० उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मृणालिनी कुलकर्णी यांनी तर पाहुण्यांचा परिचय सौ. ज्योतीताई किनगे यांनी केले. दिपप्रज्वलन व्यवस्था सौ. प्रियाताई देशपांडे व पदक वाटत व्यवस्था सौ. जयश्रीताई पाटील यांनी पाहिली तर प्रसाद वाटप व्यवस्था रमेश पाटोळे, आण्णा कातोरे, अनंतवाड, संतोष साहू व इतर कार्यकर्त्यांनी सांभाळली. फोटोग्राफी व्यवस्था श्री जनार्दन पांडे व रविंद्र राजकुवर यांनी पाहिली.
संख्यात्मक विवरण
एकूण सहभागी शाळा :- ६१
पारितोषिक प्राप्त विद्यार्थी:- १३९
मान्यवर :- ५
कार्यक्रमाला उपस्थित इतर विद्यार्थी:- १२० (सुमारे)
उपस्थित शिक्षक:- ४०
विविध संस्थातील सामाजिक कार्यकर्ते:- ५ (सुमारे)
संस्कृति संवर्धन प्रतिष्ठान कार्यकर्ते:- ३०
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment