SHRIMANT
- श्री संत ज्ञानोबा तुकोबा विश्वभ्रमण दिंडी सोहळा दुबई २०२२
- श्री विश्वशांती जगद्गुरू सेवा संस्था
- सूत्रसंचालन
- "भाषण कला शिका "
- ऑनलाईन बँक खाते
- भाषणासाठी विषय निवडताना
- वक्तृत्व कला
- सर्वांगीण दृष्टी
- संवाद तंत्र
- करीअर
- होमी मिनिस्टर LIVE
- विदेश दौरे
- मी श्रीमंत आहे live show
- सूत्रसंचालनासाठी उपयुक्त चारोळ्या
- पुस्तके का वाचावीत
- सूत्रसंचालन
- मीडिया
- कामगार पुरस्कार सोहळा
- LIVE मुलाखत
- तिरुपती बालाजी दर्शन
- मराठी देशा
- विवेकानंदांची अतिशय महत्त्वाचे वाक्ये
- चांगले विचार
- ई- Paper वर्तमानपत्रे
- उपयोगी छोट्या कथा
- निवडक बोधकथांचा एक संग्रह
- फक्त विनोद - Only Jokes
- वक्तृत्व
- योगासने
- वाढदिवसाच्या शुभेच्छा
- Youtube
- News Blog
Monday, August 11, 2025
श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिराच्या सुवर्ण कलशरोहणासाठी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत "एक हात सेवेचा" सुपूर्द
श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराच्या 11 किलो सुवर्ण कलशासाठी ११,२३,६२६ रुपयांची सेवा सुपूर्द / अर्पण समारंभ संपन्न
२०२५ हे वर्ष माऊलींचे (७५० वे) सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीवर्ष आहे. या अनुषंगाने संत श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरावर ११ किलो सुवर्ण कलश उभारण्याचा संकल्प केला. या आव्हानाला प्रतिसाद देत श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या वतीने "एक हात सेवेचा" या उपक्रमाच्या माध्यमातून श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या सर्व घटकांच्या वतीने 8,26, 393 रु, श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन संघ 1,11,121 रु, जलाराम सत्संग मंडळ 1,11,111 रु, इंद्रायणी इंडस्ट्रियल असोसिएशन 75001 रु, अशी एकूण 11, 23, 626 रुपयांची सेवा (मदत) माऊलींच्या चरणी सुपूर्द करण्यात आली.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. नारायण महाराज जाधव, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे(कबीरबुवा), ॲड. राजेंद्र उमाप, पुरुषोत्तम दादा पाटील, प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर, सचिव अजित वडगांवकर, विश्वस्त लक्ष्मण घुंडरे, खेड तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य शहाजीराव करपे, मोई विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन भगवानराव साकोरे, इंद्रायणी इंडस्ट्रियल असोसिएशनचे चेअरमन महेंद्र फणसे खजिनदार शंकर साळुंखे व सभासद ग्रोवेल कंपनीचे राजेंद्र कांबळे, उद्योजिका ज्योती बेदमुथा आणि त्यांच्या मातोश्री, आळंदी नगरपरिषदेचे मा. नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, मा. नगराध्यक्षा शारदाताई वडगांवकर, मा. सभापती नंदकुमार कुऱ्हाडे, भाजपा पश्चिम महाराष्ट्र अध्यात्मिक आघाडीचे संजय घुंडरे, माजी उपनगराध्यक्ष आदित्यराजे घुंडरे, संस्थेचे सदस्य अनिल वडगांवकर सदस्य विलास सोपाना कुऱ्हाडे, आळंदी वि.का.से.सो. चेअरमन बाबुलाल घुंडरे, सतीश चोरडिया, राजेंद्र धोका, पोपट वडगांवकर, जितेंद्र चोरडिया, नंदकुमार वडगांवकर, सागर बागमार, रमेश नौलाखा, शाम कोलन, राजू लोढा, सचिन बोरुंदिया, मोहन चोपडा, गौतम धोका, परेश चोरडिया, किरण लोढा, शिरीष कारेकर, विश्वंभर पाटील, धनाजी काळे,पत्रकार एम. डी. पाखरे, दिनेश कुऱ्हाडे, श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचे प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, माध्य. विभागाच्या पालक-शिक्षक संघांचे उपाध्यक्ष श्रेणिक क्षिरसागर, तेजश्री साळुंखे, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी माऊलींचे पूजन करण्यात आले. तद्नंतर श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ गुरु शांतिनाथ आणि विश्वस्त चैतन्य म. लोंढे (कबीरबुवा) यांना शाल, नारळ, मोत्यांची माळ व माऊलींची मुर्ती देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये अजित वडगांवकर यांनी माऊलींच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी (750 वे) जयंती वर्षांमध्ये ग्रामस्थांची अनेक वर्षापासूनची मागणी म्हणजे स्थानिक ग्रामस्थांमधून संस्थांनच्या विश्वस्तपदी निवड व्हावी, ती मागणी पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त केला. तसेच या नवीन विश्वस्तांची निवड झाल्यानंतर अनेक चांगल्या व सकारात्मक गोष्टी घडत आहेत. त्यामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथाचे एकूण 57 भाषांमध्ये रूपांतर, भव्य - दिव्य स्वरूपात हरिनाम सप्ताह, नेत्रदीपक पालखी सोहळा, आळंदीमध्ये 450 एकरातील अभिनव असे साकारत असलेले ज्ञानपीठ, भव्य भक्त निवास, आळंदीमध्ये संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आगमन तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार 15 ऑगस्ट रोजी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये सर्व वाड्या-वस्त्या ते सर्व महानगरापर्यंत संत श्री ज्ञानेश्वर महाराज व त्यांच्या ग्रंथाची पूजा आणि नंतर मिरवणूक काढावी तसेच 14 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये सामुदायिक पसायदान म्हणण्याबाबत काढलेला आदेश, ओळख श्री ज्ञानेश्वरीची या पुस्तकाची निर्मिती व प्रकाशन सोहळा आणि आता या सर्व गोष्टींचा कळस म्हणजेच "संजीवन समाधी मंदिरावरील 11 किलो सुवर्णा चा कलशारोहण." त्याचा सर्वत्र आनंद व्यक्त केला जात असल्याचे सांगितले. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या कार्यामध्ये, योजनामध्ये, उपक्रमामध्ये श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था नेहमीच तन मन धनाने सहभागी असते. यापुढेही सहभागी राहील असे आश्वासन दिले. या सेवेमध्ये सहभागी सर्व घटकांचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने सुवर्णकलश उभारणीत सेवानिधी सुपूर्द / अर्पण केलेल्या संस्था प्रमुखांचा व सहकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर आणि त्यांचे सर्व सहकारी (6,04,171 रु.), श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन संघाचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर, उपाध्यक्ष सतीश चोरडिया आणि त्यांचे सर्व सहकारी (1,11,121 रु.), शहाजी करपे (1,11,111 रु.), भगवान साकोरे (1,11,111 रु.) इंद्रायणी इंडस्ट्रिअल असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र फणसे आणि त्यांचे सर्व सहकारी (75001 रु.) आदींचा श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे यांनी मनोगत व्यक्त करताना "श्री ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षातील आषाढीवारीच्या वाटेवर घेतलेला संकल्प म्हणजे दारात सोन्याचा पिंपळ तसा संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मंदिराच्या शिखरावरही सोन्याचा कलश असावा. त्या अनुषंगाने श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरावर ११ किलो वजनाचा सुवर्ण कलश उभारणी संकल्प पूर्णत्वास जात असल्याचा आनंद व्यक्त केला. तसेच समाजातील व्यक्तींची ज्ञानेश्वरांप्रति असलेली भक्ती व श्रद्धा, अशा भक्तांच्या सहकार्यातून हा संकल्प पूर्ण व्हावा व या पवित्र कार्याचे साक्षीदार बनण्याचे भाग्य मिळाले, याचा आनंद व्यक्त केला. या कलश उभारण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश मठपती यांनी केले व माऊलींच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment