SHRIMANT

Sunday, August 10, 2025

आळंदीत श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७५० वा जयंती उत्सव व गोकुळाष्टमी उत्सवाचा प्रारंभ

आळंदी: जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथा पूजनाने आज कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७५० वा जयंती उत्सव आणि गोकुळाष्टमी उत्सवाचा उत्साहात प्रारंभ झाला. वीणा मंडपात आज दिनांक १० ऑगस्ट ते १६ ऑगस्टपर्यंत हा उत्सव साजरा होणार आहे.
गाथा पूजनाचा मान श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त ह.भ.प. श्री. चैतन्य महाराज कबीरबुवा यांना लाभला. त्यांच्या हस्ते गाथा पूजन संपन्न झाले. या मंगलप्रसंगी श्री. आरफळकर महाराज, श्री. बाळासाहेब चोपदार, मानकरी श्री. राहुलशेठ चिताळकर पाटील, श्री. मंगेश आरू, श्री. राजाभाऊ चौधरी, श्री.योगीराज कुऱ्हाडे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते.

No comments: