SHRIMANT
- श्री संत ज्ञानोबा तुकोबा विश्वभ्रमण दिंडी सोहळा दुबई २०२२
- श्री विश्वशांती जगद्गुरू सेवा संस्था
- सूत्रसंचालन
- "भाषण कला शिका "
- ऑनलाईन बँक खाते
- भाषणासाठी विषय निवडताना
- वक्तृत्व कला
- सर्वांगीण दृष्टी
- संवाद तंत्र
- करीअर
- होमी मिनिस्टर LIVE
- विदेश दौरे
- मी श्रीमंत आहे live show
- सूत्रसंचालनासाठी उपयुक्त चारोळ्या
- पुस्तके का वाचावीत
- सूत्रसंचालन
- मीडिया
- कामगार पुरस्कार सोहळा
- LIVE मुलाखत
- तिरुपती बालाजी दर्शन
- मराठी देशा
- विवेकानंदांची अतिशय महत्त्वाचे वाक्ये
- चांगले विचार
- ई- Paper वर्तमानपत्रे
- उपयोगी छोट्या कथा
- निवडक बोधकथांचा एक संग्रह
- फक्त विनोद - Only Jokes
- वक्तृत्व
- योगासने
- वाढदिवसाच्या शुभेच्छा
- Youtube
- News Blog
Wednesday, August 6, 2025
नाशिक येथील चार शाळांमध्ये ओळख श्री ज्ञानेश्वरीची या उपक्रमाचा प्रारंभ
नाशिक:- संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सवाचे औचित्य साधत नाशिक येथील चार शाळांमध्ये ओळख श्री ज्ञानेश्वरीची या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.यामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय,मराठा हायस्कुल ,
वाघ गुरुजी हायस्कुल व जनता विद्यालय पवन नगर या चार शाळे मध्ये ओळख श्री ज्ञानेश्वरीची या संस्कारक्षम उपक्रमाची सविस्तर माहिती ह भ प देठे व अजित वडगांवकर यांनी दिली.
शाळेतील मुले शाळेत शिकत असताना योग्य वयात त्यांना चांगल्या संस्काराची गरज असते.ते चांगले संस्कार मुलांना लागावे . श्री ओळख ज्ञानेश्वरी हा उपक्रम शिकत असताना मुलांच्या शालेय जीवनात अभ्यासात एकाग्रता ,गुणवत्ता वाढ , व्यासपीठावर बोलण्याचा आत्मविश्वास हे सकारात्मक बदल झाल्याची उदाहरणे माहिती यावेळी देण्यात आली.शालेय जीवना नंतर जीवन जगत असताना या संत साहित्याची गरज का लागणार कसे उपयोगी पडणार याबाबत माहिती देण्यात आली.
यावेळी या चार शाळे मध्ये श्री ओळख ज्ञानेश्वरीची पुस्तक,सार्थ ज्ञानेश्वरी, पारायण ज्ञानेश्वरी व हरिपाठ इ.
मोफत संत साहित्य श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान यांच्या वतीने देण्यात आले.हा उपक्रम श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान व श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती
यांच्या विद्यमनाने आयोजित करण्यात आला होता.हा उपक्रम राबवत असताना नाशिक शहरात आंबोरे महाराज यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी शेवाळे महाराज,मुख्याध्यापक थोरात,मुख्याध्यापक पुष्पा लांडगे,
मुख्याध्यापक ठाकरे ,शाळेतील मान्यवर शिक्षकवृंद व आळंदी पत्रकार संघ बांधव उपस्थित होते.
ओळख श्री ज्ञानेश्वरीची या संस्कारक्षम या चांगल्या उपक्रमाचे स्वागत करून शाळेतील मुख्यध्यापकांनी त्या बद्दल मनोगत व्यक्त केली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment