SHRIMANT

Wednesday, August 6, 2025

वैदिक सनातन धर्मात ३३कोटी देवाची संख्या आहे का ?

आळंदी दिनकर शास्त्री भुकेले ॥अथ धर्ममीमांसा ॥
वैदिक सनातन धर्मात ३३कोटी देवाची संख्या वर्णित आहे. या विषयावरील चर्चासत्रात मी ह्रषीकेशक्षेत्री विद्यार्थ्यीदशेत चर्चा ऐकलेली आहे. तीचा सारांश येथे सादर करीत आहे. पुराणमित्ये न साधुसर्वम् ॥ वेदोक्त वैदिकधर्मात देवांची संख्या तेहतीस कोटी वर्णित असली तरी. एव्हढे देव मात्र सनातन धर्माच्या कुठल्याच धर्मग्रंथात नावानिशी चरित्रासहित लिहिलेले नाहीत. अशी वस्तुस्थिती आहे म्हणून ३३कोटी ही देवाची संख्या एक पौराणिक काल्पना मात्र आहे. सर्व पुराणातील कथा म्हणजे प्रमाणित इतिहास नाही. परंपरागत चालत आलेले पौराणिक धर्म निरूपणः- कृतयुग,त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग या चार युगांपैकी प्रथम सत्ययुगात अर्थात कृतयुगात अहिंसा, सत्य, शौच व तप या चार पायावर उभा वृषभ रूपधारी धर्म होता. या शिवाय पोथी नव्हती, त्या मुळे पंथ नव्हता. पंथ नसल्यामुळे प्रतिमा (मूर्ती) नव्हती. प्रतिमा नसल्यामुळे मूर्तिपूजा नव्हती. सर्व मानव मात्र स्वयं आत्मानुशासित कृतकृत्य होते. वेद नव्हता. ओंकार स्वरच वेद होता आणि सर्वाच्या हृदयात विद्यमान असणारा आत्माच देव होता. प्रत्येक जण आपले कर्तव्य जाणून असल्यामुळे सर्व कृतकृत्य होते म्हणूनच या सत्ययुगास कृतयुग असेही म्हटलेले आहे. तत् कर्तृः पुरुषाभावाद् वेदाःअपौरुषेयाः॥ पुढे त्रेतायुगाच्या प्रारंभी वेद उत्पन्न झाला.सनातन वैदिक धर्मशास्त्रानुसार वेद उत्पन्न झालेले आहेत. ते कोणीही उत्पन्न केलेले नसल्यामुळे निर्माणकर्त्या पुरुषाच्या अभावी वेद अपौरुषेय मानले जातात. त्रेतायुगाच्या प्रारंभी एकच ऋग्वेद होता त्याचे महर्षी वेदव्यासांनी ऋग्वेद यजुर्वेद सामवेद असे तीन भाग केले.(त्यामुळे मनुस्मृतीत तीनच वेदाचे वर्णन आहे) नंतर त्याला चौथा अथर्ववेद जोडला गेला. हेच वेदमंत्र सनातन धर्म कर्माचे मूळ अधिष्ठान आधार आहेत. वैदिक नित्यनैमित्तिक कर्मकांडाचे मूळ आधार आहेत. सनातन धर्माचे कुठलेच कर्म वेदमंत्रांशिवाय संपन्न होत नाही. वेदाचे मंत्र अथवा अथवा संहिता पाठ - ब्राह्मणात्मक असे दोन भाग आहेत. वेद श्रुतपरंपरेने कानाने श्रवण करून अस्तित्वात ठेवले जात असल्यामुळे वेदांना श्रुती असे ही म्हटले जात आहे. "त्रिकांडविषयोवेदः॥ वेद तीन कांडात विभागलेला आहे. प्रथम कर्मकांड. द्वितीय उपासना कांड आणि तृतीय ज्ञान कांड. यात प्रथम कर्म कांडात यज्ञ-याग कर्माचा अमल त्रेता युगात सुरू झाला. या त्रेतायुगातील सकाम कर्मकांडाचा प्रमुख विषय यज्ञ आहे. या वेदाच्या पूर्व भागास पूर्वमीमांसा म्हणतात. वेदाचा ८०% भाग यज्ञाकरिता लागणाऱ्या मंत्रानेच व्यापलेला आहे. पूर्व मीमांसकांच्या मतानुसार यज्ञ हेच स्वर्ग प्राप्तीचे एकमात्र साधन आहे. म्हणून "स्वर्ग कामो यजेत" स्वर्गप्राप्ती करिता यज्ञ करा. असे वेदाचे बोधवाक्य प्रसिद्ध आहे. यज्ञो वै वेदः॥ वेदाचा उद्देश केवळ यज्ञच आहे. असे वेदाचा केवळ पूर्व पूर्वभाग मानणा-या पूर्व मीमांसकाचे मत आहे. यज्ञाचे आधारः- १)वेद. २ ) वेदमंत्र उच्चारण जाणणारा क्षोत्रिय वेदपाठी विद्वान ब्राह्मण. ३) होमातील अग्नी ज्याच्यात हविष द्रव्याचे( तुपाचे तिळांचे तांदूळांचे) हवन केले जाते तो होमकुंडातील अग्नी. ४) चौथा आधार गाय कारण गाईच्या पंचगव्याशिवाय यज्ञ आरंभ होत नाही आणि संपन्न ही होत नाही. इथे गोमूत्र, शेण, दूध, दही व तूप हे पाच पदार्थ यज्ञात लागतातच म्हणून गाय ही सनातन धर्मात यज्ञ माता मानली गेली आहे. या त्रेतायुगातील वेदोत्पत्ती बरोबरच वर्णाश्रमाची उत्पत्ती झाली. द्वापर युगात यज्ञयाग गौण होऊन, यज्ञयागादि वैदिक कर्मकांड पूजापाठ उपासनेच्या ऐवजी वैदिक पंचदेवता पूजन. नवग्रह पूजन. सोडष मात्रिका पूजन. सोळा संस्काराचे विधी. मृत्यूनंतरच्या १० क्रिया. भूमिशुद्धीसाठी भूमिपूजन. घर लाभावे यासाठी वास्तुशांती. गृह प्रवेश त्या साठी पूजापाठ होमहवन. हे ब्राह्मण पुरोहिताच्या अधीन असलेल्या कर्मकांडाने धर्माचे मुख्य रूप धारण केले. हे वैदिक कर्मकांड ब्राह्मण क्षत्रिय वैश्य द्विजा करिता वैदिक मंत्र विधीने करावेत व इतर शूद्रातिशूद्र बहुजनासाठी वैदिक मंत्र विधीने न करता पौराणिक श्लोक व लौकिक गाथा म्हणजेच कविता सुभाषितं उच्चारून करावे असा सनातन वैदिक धर्मशास्त्राचा आदेश असल्यामुळे ब्राह्मणेतर बहुजनांचे कर्मकांड अवैदिक पौराणिक विधीनेच पुरोहित लोक संपन्न करतात, कारण वेदमंत्र श्रवणाचा अधिकार स्त्रीशूद्रातिशूद्र बहुजनांना नाही म्हणून. अनेक देवतांचे सकाम पूजन आणि वर्ण व्यवस्थेचा प्रभाव संपूर्ण सनातन धर्मामध्ये वाढल्यानंतर वर्णयाती भेदामुळे स्त्रीशूद्रातिशूद्र धर्माधिकार वंचित झाले. "धर्मेन हीनःपशुभिः समानः॥ शूद्रातिशूद्र बहुजन धर्महीन झाल्यामुळे पशुंपेक्षा ही तुच्छ अस्पृश्य झाले. "तया व्यासाचा उपकारू॥ ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या तीन वर्णांकरिता असलेल्या एका ऋगवेदाचे तीन वेदात विस्तार करणा-या कृष्णद्वैपावन असमाधानी अशांतचित्त कृष्णद्वैपायन अर्थात महर्षी व्यासांनी चित्ताच्या शांततेसाठी श्रीमद्भागवत महापुराणाची रचना करून भागवत धर्म सांगितला. भागवत शब्दाचा अर्थ "भगवतः इदं भागवतम्॥ विश्विविश्वंभर.जनिजनार्दन,भूतिभगवद्भाव मानणारा धर्म म्हणजेच भागवतधर्म होय. स्त्रीशूद्रद्विजबंधूनां न श्रुतिगोचराः॥ स्त्रीशूद्र व द्विजबंधूंना वैदिक धर्माच्या कुठल्याच वैदिक कर्मकांडाचा अधिकार नव्हता अर्थात धर्माचा ही अधिकार नव्हता. याचा विचार करून व्यासांनी सर्वांसाठी भागवत धर्म स्थापन केला. भागवतधर्म म्हणजे सर्व जगत भगवत स्वरूप आहे. विष्णुमय आहे. असा मानणारा धर्म.भागवत धर्मात वर्ण आश्रम जाती आणि स्त्री-पुरुष असा अमंगळ भेदभाव मान्य नाही. "संत शिरोमणी नामदेव महाराज म्हणतात. सर्वत्र समदृष्टी। हिच भक्ति गोमटी॥ सर्वत्र समदृष्टी हीच उच्च कोटीची भगवद्भक्ती मानली गेली आहे. कृष्णात्परमत्त्वं किंमप्यमहम् न जाने॥ ज्या सनातन वैदिक धर्माचे आराध्यदैवत ब्राह्मण पुरुष होता, त्या ऐवजी भागवत धर्माने ब्राह्मणाचे जन्मजात भूदेवत्व नाकारून आपले आराध्य दैवत भगवान श्रीकृष्णास मानले आहे. वैष्णव श्रेष्ठताः- आहो! बत श्वपचोऽतो गरीयान् यज्जिव्हाग्रे वर्तते नाम तुभ्यम्। अर्थः अभक्त ब्राह्मणापेक्षां ही श्वपच चांडाळ कुळातील नामधारक वैष्णव श्रेष्ठ आहे. ज्याच्या जिव्हाग्रे तुझे नित्य नाम आहे.भागवत धर्मात अखंड हरिनामाचे स्मरण करणारा वैष्णव चांडाळ कुळातील असला तरी. तो सर्व अभक्त ब्राह्मणा पेक्षा पूज्य मानला आहे आणि वर्ण व जातीवर आधारित असलेली जन्मजात नीचता व्यासानी नाकारली आहे. हाच भागवत धर्म पुढे वारकरी संत ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेत हरिपाठाच्या रूपाने प्रतिपादित केला आहे. हरिपाठ हा भागवत धर्माचे स्तवन अर्थात स्तोत्र आहे. हरिपाठ समजला की. भागवत धर्म समजला असे समजावे. भागवत धर्मीय वारकरी वैष्णव संप्रदायात विठोबा रखुमाई पुंडलीक चंद्रभागा पंढरी वारी इत्यादी शब्द न आल्यामुळे बऱ्याच लोकांना अशी शंका येते की. वारकरी संप्रदायाचे जे आराध्य आहेत.ते हरिपाठात वर्णित नसल्यामुळ हा हरिपाठ वारकऱ्यांचा आहे की नाही, तर. परंपरागत चालत आलेले उत्तर असे आहे. संस्कृत भाषेतील पौराणिक भागवत धर्म लौकिक वारकरी संप्रदायाच्या रूपाने संस्थापित होण्याच्या अगोदर संत ज्ञानेश्वर महाराजांनी भागवत धर्मीय वैष्णव म्हणून हरिपाठ लिहिलेला असल्यामुळे त्यात विठोबा विठ्ठल रखुमाई पुंडलीक चंद्रभागा वारी वारकरी इत्यादी शब्द आलेले नाहीत परंतु या भागवत धर्माचा मूळ स्वरूप तसेच ठेवून आणखी त्यामध्ये सुधारणा करून जो संत शिरोमणी नामदेव महाराजांनी संस्कृत भाषेतील पौराणिक भागवतधर्म लौकिक वारकरी संप्रदायाच्या स्वरूपात उभा केला आणि संस्कृत भाषेतील भागवत धर्माचा अधिष्ठान ग्रंथ श्रीमद् भगवद्गीता मराठीभाषेत आणून ज्ञानेश्वरीच्या रूपात वारकरी संप्रदायाला सांप्रदायिक अधिष्ठान प्राप्त करून दिल्यामुळे बहिणाबाई ॥ज्ञानदेवे रचिला पाया॥ असे म्हणाल्या आहेत. पुरोहित प्रधान सनातन वैदिक धर्मात वर्ण जाती व्यवस्थेनुसार सामाजिक उच्चनीचता दिसून येत होती आणि वर्णजाती अनुसारच बहुजन समाज सकाम कर्मकांड करत होता म्हणजे संकल्प घेऊनच होम-हवन पूजा-पाठ भूमिपूजन वास्तुशांती जन्म-मरणाशी संबंधित दशक्रिया विधी पर्यंतचे सर्व धार्मिक कर्म पुरोहिता मार्फत करून घेत होता. या वेदोक्त नित्यनैमित्तिक सकाम कर्मकांड कलियुगात कालबाह्य निष्फल निषिध्द मानून वारकरी संतांनी त्याचे खंडण केले आणि एक ईश्वरवाद आणि नामस्मरण या दोन्हीवरच हा परमार्थ आणून स्थिर केला. सर्वभूतेषु यः पश्येद् भगवद् भावात्मनः। भूतानि भगवत्याऽऽ त्मन्येव भगवतोत्तमः॥ विठ्ठल जळीस्थळी भरला। रीता ठाव नाही उरला। वारकरी संप्रदाय भगवान श्री विठ्ठलाला सर्वत्र जळी,स्थळी,काष्टी, पाषाणी पाहतो आणि सर्व जगत भगवान विठ्ठलात पाहतो. आणि भगवान विठ्ठलाला सर्वात पाहतो. राम कृष्ण हरी दिनकर शास्त्री भुकेले.

No comments: