SHRIMANT

Thursday, August 7, 2025

नाशिक शहरातील चार शाळांत अलंकापुरीतील ओळख श्री ज्ञानेश्वरीची उपक्रमाचा प्रारंभ

नाशिक ( अर्जुन मेदनकर ) : ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवारा तर्फे राज्यात माऊलींचा हरिपाठ, ओळख श्री ज्ञानेश्वरीची हा उपक्रम सर्व दूरवर पोहचविण्याचे संकल्पा निमित्त नाशिक शहरातील चार शाळांत हरिनाम गजरात शालेय मुलांसाठी मूल्यशिक्षण - संस्कारक्षम ज्ञानदानाचा उपक्रम उत्साहात प्रारंभ करण्यात आला. यास नाशिक शहरातील शाळांनी उत्साही प्रतिसाद देत उपक्रम स्वीकारला. यावेळी शालेय मुलांना हरिपाठाचे, शाळांना संत साहित्याचे वाटप हरिनाम जयघोषात करण्यात आले.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सवी वर्षा निमित्त ओळख श्री ज्ञानेश्वरी परिवाराचे वतीने सर्व शाळांना संत साहित्य आणि माऊलींची लक्षवेधी प्रतिमा भेट देत प्रतिमा पूजन, ग्रंथ पूजन करण्यात आले. श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांचे मार्गदर्शक सूचना प्रमाणे ओळख श्री ज्ञानेश्वरीची या मार्गदर्शक पुस्तिकेचे लेखक, प्रा. कीर्तनकार, डॉ. ह.भ.प. सुभाष महाराज गेठे आणि वासुदेव महाराज शेवाळे यांचे नेतृत्वात उपक्रमाचा नाशिक शहरात प्रारंभ करण्यात आला. या साठी संस्कृत भारतीचे मार्गदर्शक, श्री संत तुकाराम महाराज अध्यासनाचे प्रमुख डॉ. गजानन आंभोरे यांनी नियोजन केले. या प्रसंगी ओळख श्री ज्ञानेश्वरी परिवाराचे सदस्य अर्जुन मेदनकर, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, जेष्ठ नागरिक विश्वम्भर पाटील, रोहिदास कदम, माऊली घुंडरे, माऊली कुऱ्हाडे, भानुदास पऱ्हाड, श्रीमंत दादासाहेब करांडे, विठ्ठल शिंदे, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विध्यार्थी आदी उपस्थित होते. पुणे शिक्षणाचे माहेरघर अर्थात पुणे जिल्ह्यातून नाशिक जिल्ह्यात उपक्रम सुरु करण्याचे भाग्य माऊलींनी सेवा कार्य करुवून घेतले. श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी पवित्र दिनी नाशिक शहरातील मराठा हायस्कूल, पवना नगर हायस्कूल, वाघ गुरूजी हायस्कूल, सारडा विद्यालय, छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय या नाशिक शहरातील शाळांत शालेय मुलांच्या साठी मूल्य शिक्षणावर आधारित संस्कारक्षम उपक्रम सुरु करण्यात आला. तत्पूर्वी आदिशक्ती मुक्ताईचे पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या मुक्ताई नगर जळगाव जिल्ह्यात देखील उपक्रम झाला. यास देखील मोठा प्रतिसाद मिळाला. आता पर्यंत १०६ शाळांत हा उपक्रम सुरु झाला असून अधिकाधिक शाळांतून हा उपक्रम सुरु करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमात श्री संत तुकाराम महाराज अध्यासनाचे प्रमुख डॉ. गजानन आंभोरे यांनी नाशिक शहरातील शाळांत उपक्रम सुरु करण्यास परिश्रम पूर्वक नियोजन केले. श्री ओळख ज्ञानेश्वरीची पुस्तिका, सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण प्रत, सार्थ हरिपाठ, शालेय मुलांना हरिपाठ आदी संत साहित्य श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान यांच्या वतीने श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती, आळंदी यांच्या तर्फे देण्यात आले. या प्रसंगी मुख्याध्यापक थोरात सर , मुख्याध्यापिका पुष्पा लांडगे, मुख्याध्यापक ठाकरे सर, शिक्षक यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमाचे स्वागत करीत उपक्रम यशस्वीपणे राबविला जाईल अशी ग्वाही सहभागी शाळांतील मुख्याध्यापकांनी दिली. या प्रसंगी डॉ. सुभाष महाराज गेठे यांनी मुलांशी संवाद साधला. ते म्हणाले, शालेय मुलांना शालेय वयातच सुसंस्कार घडावेत. यासाठी ओळख श्री ज्ञानेश्वरी हा उपक्रम प्रभावी आहे. मुले शाळेत शिकत असताना चांगल्या संस्काराची गरज असते. योग्य वयात योग्य शिक्षण आणि उपाय योजना राबविल्या, तर भावी पिढी संस्कारक्षम घडेल. चांगले संस्कार सर्व दूर पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या ओळख श्री ज्ञानेश्वरीची यातुन होत आहे. मुलांना शालेय जीवनात एकाग्रता मिळणे आवश्यक आहे. त्यांची गुणवत्ता वाढ, बोलले कसे, एकावे कसे, गुरुजनांचा आदर, सांगत कशी असावी आयडी वर मार्गदर्शन केले. या उपक्रमातून मुलांची चंचलता दूर होऊन एकाग्रहता वाढीला मदत होत असल्याने यशस्वी इतर शाळांचा अनुभव सांगत मार्गदर्शन केले. संत साहित्यातील दाखले देत श्री ज्ञानेश्वरी हा धर्म ग्रंथ नसून जीवन ग्रंथ असल्याचे सांगत संवाद साधला. सर्व प्रश्नांची उत्तरे या ज्ञानेश्वरीत असल्याचे सांगत श्री ज्ञानेश्वरी मॅन्युअल ऑफ लाईफ जीवन ग्रंथ असल्याचे गेठे महाराज यांनी सांगितले. या वेळी गेठे महाराज म्हणाले, ओळख श्री ज्ञानेश्वरीची हा उपक्रम आपल्या नाशिक येथील शाळांत सुरु झाला. हा प्रभावी उपक्रम आहे. मुलांना शिक्षणा बरोबर संस्कार घडावेत. या साठी मूल्य संवर्धन, संस्कारक्षम उपक्रम असून श्री ज्ञानेश्वरांनी वयाचे १६ व्या वर्षी श्री संत ज्ञानेश्वरी साहित्य ग्रंथ लिहिला. तो मुलांना त्यांचेच वयातील मुलांना देण्यास प्राधान्य दिले आहे. आपण सर्व मोबाईल, सी. डी. टीव्ही घेतल्यावर त्या सोबत ते यंत्र कसे वापरायचे, यासाठी मॅन्युल बुक मिळते. श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ हा धार्मिक ग्रंथ नाही. तो जीवन ग्रंथ आहे. ओळख श्री ज्ञानेश्वरीची हा उपक्रम सर्वांचा आहे. मन, बुद्धी, शरीराचा उपयोग कसा करायचा. बोलावे कसे, कसे बोलू नये, नेतृत्व कसे असावे, योद्धा कसा आहे. या बाबतचे पाठ आहेत. हा उपक्रमशील कार्यक्रम असल्याने तो सर्वांचा असल्याचे डॉ. सुभाष महाराज गेठे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी अजित वडगावकर, डॉ. गजानन आंभोरे यांनी मार्गदर्शन केले. ओळख श्री ज्ञानेश्वरीची या शालेय मुलांसाठी मूल्य शिक्षण आणि संस्कारक्षम घडविण्याचे उपक्रमाची माहिती संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सुभाष महाराज गेठे, सचिव अजित वडगांवकर, डॉ. गजानन आंभोरे, छत्रपती शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक थोरात सर, मराठा हायस्कूल, पवना नगर हायस्कूल, वाघ गुरूजी हायस्कूल मधील मुख्याध्यापक, शिक्षक आदींनी मार्गदर्शन केले. तत्पूर्वी शाळांत प्रतिमा पूजन, संत साहित्य भेट, नाशिक शहरातील सुमारे पाच हजारावर मुलांना हरिपाठाचे वाटप करण्यास साहित्य भेट सुपूर्द करण्यात आले. पसायदानाने उपक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments: