SHRIMANT
- श्री संत ज्ञानोबा तुकोबा विश्वभ्रमण दिंडी सोहळा दुबई २०२२
- श्री विश्वशांती जगद्गुरू सेवा संस्था
- सूत्रसंचालन
- "भाषण कला शिका "
- ऑनलाईन बँक खाते
- भाषणासाठी विषय निवडताना
- वक्तृत्व कला
- सर्वांगीण दृष्टी
- संवाद तंत्र
- करीअर
- होमी मिनिस्टर LIVE
- विदेश दौरे
- मी श्रीमंत आहे live show
- सूत्रसंचालनासाठी उपयुक्त चारोळ्या
- पुस्तके का वाचावीत
- सूत्रसंचालन
- मीडिया
- कामगार पुरस्कार सोहळा
- LIVE मुलाखत
- तिरुपती बालाजी दर्शन
- मराठी देशा
- विवेकानंदांची अतिशय महत्त्वाचे वाक्ये
- चांगले विचार
- ई- Paper वर्तमानपत्रे
- उपयोगी छोट्या कथा
- निवडक बोधकथांचा एक संग्रह
- फक्त विनोद - Only Jokes
- वक्तृत्व
- योगासने
- वाढदिवसाच्या शुभेच्छा
- Youtube
- News Blog
Friday, September 12, 2025
मराठा भूषण पुरस्काराने" अजित वडगांवकर व संजय घुंडरे यांना सन्मानित
आळंदी - अखिल भारतीय मराठा महासंघ व जगद्गुरु तुकाराम महाराज सामाजिक अध्यात्मिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय जगन्नाथ सिताराम शेंडगे पाटील यांच्या पाचव्या पुण्यस्मरणार्थ व महासंघाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सामाजिक, शैक्षणिक व आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाचे राज्य कार्यकारिणी सदस्य व श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित सुरेश वडगांवकर आणि भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक आघाडी पश्चिम विभागाचे संजयजी घुंडरे पाटील यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन "मराठा भूषण पुरस्कार" श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त ह.भ.प. निलेश महाराज लोंढे कबीरबुवा, संत तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. बापूसाहेब मोरे, बंकट स्वामी संस्थानचे ह.भ.प. लक्ष्मण महाराज मेंगडे यांचे शुभहस्ते व मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप दादा जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला. संजय घुंडरे यांचा पुरस्कार त्यांच्या वतीने बाबूलाल घुंडरे यांनी स्वीकारला.
याप्रसंगी दिल्ली येथील विश्वभुषण राजे शिवछत्रपती फौंडेशनचे जनार्दन पाटील, ह.भ.प. पंडित क्षीरसागर, ह.भ.प. आत्माराम शास्त्री जाधव, ह.भ.प. भगवान कराड, ह.भ.प. बाळासाहेब शेवाळे, ह.भ.प. संदीप लोहार तसेच मराठा महासंघाचे पदाधिकारी दशरथ पिसाळ, दिलीप धंदे, धाराजी भुसारे, प्राध्यापक शिवराम सोंडगे, गणेश नाईकवाडे, संतोष नानावटे, अविनाश घिघे, आळंदी नगरपालिकेचे मा. नगराध्यक्ष सुरेश वडगांवकर, उपनगराध्यक्ष नंदकुमार कुऱ्हाडे, उपनगराध्यक्ष विलासराव घुंडरे, आळंदी विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष बाबूलाल घुंडरे, नितीन घुंडरे, दिनेश कुऱ्हाडे, विश्वंभर पाटील, मराठा महासंघाचे भारतातून आलेले पदाधिकारी व कार्यकर्ते, आळंदीकर ग्रामस्थ व वारकरी संप्रदायातील भाविकभक्त, विद्यार्थी, मराठा महासंघाचे पुणे विभागाचे अध्यक्ष बब्रुवान शेंडगे व शेंडगे परिवारातील सदस्य उपस्थित होते.
याप्रसंगी प्रास्ताविकात भगवान शेंडगे यांनी पिताश्री स्व. जगन्नाथ सि. शेंडगे पा. यांच्या पाचव्या पुण्यस्मरण सोहळा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या 750 व्या जन्म महोत्सवी वर्षानिमित्त श्री क्षेत्र आळंदीत करीत असल्याचे सांगितले व त्यानिमित्ताने ह.भ. प. पंडित क्षीरसागर यांचे कीर्तन झाले व अजित वडगांवकर समाजात विविध क्षेत्रात विशेषतः शिक्षण क्षेत्रात गेली 25 वर्ष आपल्या कार्यकर्तुत्वाने उल्लेखनीय कार्य करीत आहेत. त्यांनी शिस्त, परिश्रम, ध्यास गुणवत्ता आणि सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून शैक्षणिक कला व क्रीडा या क्षेत्रात मारलेली गरुड झेप मराठा समाजाला भूषणावह वाटते आणि म्हणूनच त्यांच्या या अतुलनीय सेवेबद्दल त्यांना "मराठा भूषण पुरस्कार" देऊन गौरविण्यात अभिमान वाटतो असे सांगितले. तसेच भारतीय जनता पार्टीच्या अध्यात्मिक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून संजय घुंडरे हे सुद्धा धार्मिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. त्यांचाही सन्मान मान्यवरांच्या हस्ते करीत असल्याचे सांगितले.
आपल्या मनोगतामध्ये बापूसाहेब मोरे म्हणाले की, आजचा हा पुरस्कार जैन - मारवाडी समाजातील व्यक्तीला दिला जात आहे कारण मराठा समाज हा जातीपातीच्या पलीकडे आहे. त्याकरिता त्यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली व जगतगुरु तुकाराम महाराज यांच्या साहित्याचे दाखले देत हा मुद्दा स्पष्ट केला. अजित वडगांवकर हे गेली 25 वर्षे तुकाराम बीजेला माझ्या कीर्तनाला आपल्या बंधूसह येत असतात. त्यावेळी तुकाराम महाराज मराठा समाजाचे आणि मी जैन समाजाचा हा भेद त्यांनी मानला असता तर हा पुरस्कार त्यांना मिळालाच नसता. तसेच त्यांची व संजय घुंडरे या योग्य व्यक्तींची पुरस्कारा करीता निवड केल्याबद्दल शेंडगे यांना धन्यवाद दिले.
याप्रसंगी श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त ह.भ.प. निलेश महाराज लोंढे कबीरबुवा यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, मराठा महासंघ संस्था ही जातीयवादी नाही. महाराष्ट्रात राहणारी माणसं ही सर्व माय मराठीची लेकरं आहेत ही सर्व मराठा आहेत असे समजून आपण महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्व अठरापगड जातींना बरोबर घेऊन आपला संघ काम करतोय व त्यांना मराठा भूषण पुरस्काराने सन्मानित करतो हे आजच्या जातीपातीच्या राजकारणाचा विचार करता संघाचं काम व भूमिका दीपस्तंभाप्रमाणे आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये संघाच्या वतीने असे पुरस्कार दिले गेले पाहिजेत हीच वारकरी संप्रदायाची समतेची भूमिका आहे व याची सुरुवात महाराष्ट्रामध्ये आठशे वर्षांपूर्वी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी केली. त्यावेळी ज्या व्यवस्थेने समाजात विघातकपणा आणला ती व्यवस्था ज्ञानदेवांनी उलथवून टाकली. हीच भूमिका पुढे छत्रपती शिवाजीराजांनी घेतली आणि हे विचार याच भूमीत रुजले. ज्याला इतिहास आणि भूगोल समजला त्याला पुढील उज्वल भविष्य घडवता येते त्याकरिता इतिहास आणि भूगोल समजला पाहिजे. समाजापुढे असणारे ज्वलंत प्रश्न सोडविण्याकरीता आपल्या संघाबरोबर आम्ही सर्वजण राहू. गोरगरिबांच्या विशेषता वारकरी संप्रदायातील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करणाऱ्या श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत अजित वडगावकर चांगल्या पद्धतीने काम करतायेत. त्यांना व संजय घुंडरे यांना पुरस्कार दिल्याबद्दल महासंघाचे आभार मानले.
माझ्या आजोबांपासून आम्ही बहुजन समाजात काम करत असताना जाती धर्माचा विचार न करता माऊलींची सेवा म्हणून काम करतो व समाज सुद्धा आम्हाला सामावून घेतो. आज हा पुरस्कार स्वीकारताना जबाबदारी अजून वाढली. आळंदीत येऊन वेगवेगळ्या माध्यमातून माऊलींची सेवा करणाऱ्यांना मदत करणे हे आमचं कर्तव्यच असल्या कारणाने आम्ही ते करत असतो व करत राहू. आज आम्हाला हा पुरस्कार संघाने दिला त्याबद्दल संघाचा आभारी असल्याचं सन्मानास उत्तर देताना अजित वडगांवकर यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात दिलीपदादा जगताप म्हणाले महासंघ जाती व धर्माच्या पलीकडे काम करतो हाच विचार आजच्या राजकारणातील लोकांनी करावा आणि म्हणूनच आज अजित वडगांवकर यांना हा पुरस्कार देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प. प्रमोद महाराज काळे यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment