SHRIMANT

Sunday, September 28, 2025

संस्थाचालक शिक्षण मंडळ, पुणे जिल्ह्याच्या कार्यकारी मंडळाची बिनविरोध निवड

पुणे आळंदी – माऊलींच्या कृपेने संस्थाचालक शिक्षण मंडळ, पुणे जिल्ह्याच्या कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीत सर्व पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाली. या कार्यकारी मंडळात संस्थेचे अध्यक्ष म्हणून मा. विजयराव कोलते यांची निवड झाली असून, त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीतून संचालक म्हणून काम करण्याची संधी लाभली आहे.
आज झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय जाहीर करण्यात आला. या प्रसंगी ग्रामोन्नती शिक्षण मंडळ, नारायणगाव चे अध्यक्ष मा. अनिल तात्या मेहेर यांच्या हस्ते नवनियुक्त मंडळाचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला गणपतराव बालवडकर, प्रदीप दादा वळसे पाटील, वि.ल. पाटील, प्रमिलाताई गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील नामवंत शिक्षण संस्थाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी नव्या कार्यकारी मंडळाचे अभिनंदन करून, संस्थेच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यास पुढील काळात अधिक बळ मिळेल असा विश्वास व्यक्त केला. ---

No comments: