SHRIMANT

Saturday, December 20, 2025

स्वामी रामदेवबाबा यांचा पुणेरी पगडीने सन्मान करण्यात आला

हरिद्वार - पतंजली योगपीठाचे परम
श्रद्धेय स्वामी रामदेवजी महाराज यांचा पुणेरी पगडी घालून अत्यंत गौरवपूर्ण व सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. हा सन्मान पतंजली युवा भारतच्या सर्व जिल्हा प्रभारी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारतीय परंपरेनुसार स्वामीजींचा विधिवत सत्कार करण्यात आला. या सन्मानाने स्वामी रामदेवजी महाराजांनी विशेष आनंद व्यक्त केला. उपस्थित सर्व जिल्हा व तहसील प्रभारी यांना त्यांनी मंगलमय शुभेच्छा देत आपले आशीर्वाद प्रदान केले. योग, आरोग्य, राष्ट्रसेवा तसेच संस्कारयुक्त समाजनिर्मितीसाठी सर्वांनी समर्पित भावनेने कार्य करावे, असे प्रेरणादायी विचार स्वामीजींनी यावेळी मांडले. शुभ आशीर्वाद स्वीकारताना श्री श्रीमंत दादासाहेब करांडे, श्री उत्तरेश्वर तोडकर, श्री राजेन्द्र ओझा अॅड श्री शांताराम दामगुडे, श्री संतोष जांभुळकर, श्री संजय वाघ, श्री नंदू जाधव, श्री रामदास तांबे यांच्यासह पतंजली युवा भारतचे सर्व जिल्हा व तहसील प्रभारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम भक्तीमय, उत्साही व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. हा सत्कार सोहळा पतंजली परिवारातील कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, स्वामी रामदेवजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली समाजहिताच्या कार्याला अधिक गती व बळ मिळेल, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

No comments: