SHRIMANT
- श्री संत ज्ञानोबा तुकोबा विश्वभ्रमण दिंडी सोहळा दुबई २०२२
- श्री विश्वशांती जगद्गुरू सेवा संस्था
- सूत्रसंचालन
- "भाषण कला शिका "
- ऑनलाईन बँक खाते
- भाषणासाठी विषय निवडताना
- वक्तृत्व कला
- सर्वांगीण दृष्टी
- संवाद तंत्र
- करीअर
- होमी मिनिस्टर LIVE
- विदेश दौरे
- मी श्रीमंत आहे live show
- सूत्रसंचालनासाठी उपयुक्त चारोळ्या
- पुस्तके का वाचावीत
- सूत्रसंचालन
- मीडिया
- कामगार पुरस्कार सोहळा
- LIVE मुलाखत
- तिरुपती बालाजी दर्शन
- मराठी देशा
- विवेकानंदांची अतिशय महत्त्वाचे वाक्ये
- चांगले विचार
- ई- Paper वर्तमानपत्रे
- उपयोगी छोट्या कथा
- निवडक बोधकथांचा एक संग्रह
- फक्त विनोद - Only Jokes
- वक्तृत्व
- योगासने
- वाढदिवसाच्या शुभेच्छा
- Youtube
- News Blog
Monday, December 22, 2025
श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थे मध्ये "गंध मातीचा रंग संस्कृतीचा" या त्रैवार्षिक स्नेहसंमेलनाची उत्साहात सांगता.या निमित्ताने स्पर्धा परीक्षा वाचन कक्ष उद्घाटन सोहळा संपन्न
आळंदी डिजिटल मीडिया:
श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत “गंध मातीचा रंग संस्कृतीचा” या त्रैवार्षिक स्नेहसंमेलना च्या चौथ्या दिवशी संस्थेमध्ये स्पर्धा परीक्षा वाचन कक्षाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. भविष्यात विद्यार्थ्यांना अनेक स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे लागते, त्या धरतीवर शालेय जीवनात देखील विद्यार्थी स्कॉलरशिप, नवोदय, एन.एम.एम.एस, एन.टी.एस, एम.टी.एस सारख्या स्पर्धा परीक्षा देत असतात. भविष्यात द्याव्या लागणाऱ्या बँकिंग, एमपीएससी, यूपीएससी, रेल्वे सारख्या स्पर्धा परीक्षांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी म्हणून शाळेमध्ये स्पर्धा परीक्षा वाचन कक्ष सुरू करण्यात आला. त्या निमित्ताने पन्नास हजार रुपये किमतीची स्पर्धा परीक्षेशी संबंधित पुस्तके या कक्षामध्ये ठेवण्यात आली आहेत. या पुढे गरजे नुसार पुस्तकांची संख्या वाढवण्यात येईल असे सांगण्यात आले. या पुस्तकांमुळे यशाच्या,अपयशाच्या अनेक कथा विद्यार्थ्यांना वाचता येतील. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कक्षाला भेट द्यावी अशी अपेक्षा संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत सोनवणे यांनी केले. स्पर्धा परीक्षा वाचन कक्षाचे उद्घाटन सौ. स्नेहल कदम (अध्यक्षा क्षितज फाउंडेशन) यांच्या हस्ते संपन्न झाले. यांनी आजच्या काळात *जिथे शिक्षणाचे बाजारीकरण झालेले दिसून येते* अशा काळात *विद्यार्थीच नाही तर माणूस घडवण्याचे काम श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आणि शाळा करत असल्याचे पाहून समाधान व्यक्त केले.* आणि या निमित्ताने संस्था पदाधिकारी व शिक्षक यांचे कौतूक केले. स्पर्धा परीक्षा वाचन कक्षची सुरुवात शाळा स्तरांवर होणे काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी वाचनाचे ध्येय ठरवावे व त्यानंतर जे वाचले आहे त्याचे विश्लेषण करावे. त्यासाठी विद्यार्थ्यांना या कक्षाची मदत होईल . विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे असे मत त्यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रम ह भ प महेश महाराज नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. ह भ प नाना महाराज चंदिले (जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था सचिव) यांनी सर्व विद्यार्थ्यांना आशीर्वाद पर शुभेच्छा दिल्या.
अजित वडगावकर यांनी या स्पर्धा परीक्षा वाचन कक्षामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा वाढणार असल्याचे सांगितले. पालकांनी आपल्या पाल्याला शाळेच्या वेळाव्यतिरिक्त वेळात या कक्षात येऊन ही पुस्तके वाचावीत यासाठी प्रोत्साहन देण्यास सांगितले. या स्पर्धा परीक्षा वाचन कक्षा मुळे विद्यालयातील विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धा परीक्षांची माहिती होईल यासाठी त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळाले असून याचा पुरेपूर उपयोग विद्यार्थी करतील असे मत व्यक्त केले.दीपक पाटील, सुर्यकांत मुंगसे यांनी मनोगत व्यक्त केली.
या प्रसंगी प्राचार्य विक्रम काळे (श्री जैन विद्या प्रसारक मंदिरचे श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा विद्यालय), प्रा. बाळासाहेब खोसे, पत्रकार भानुदास पर्हाड, सोमनाथ काळे, अरुण कुरे, बद्रिनाथ घुगे, राजलक्ष्मी पाटील, राजेंद्र आढारी (मॅनेजर पीडीसीसी बँक आळंदी), राहुल कोहिनकर, उद्योजक सदाशिव येळवंडे, सी.ए. संदेश पवार, श्रीकांत ईल्ले, अनुज्ञा ईल्ले, काशिनाथ गुंजाळ, रोहिणीताई लोंढे कबीरबुवा, ह. भ. प. वेद लोंढे कबीरबुवा, जनार्दन घुंडरे, श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, आळंदी पोलिस स्टेशन चे पवार साहेब, मछ्चिंद्र शेंडे, गर्जे साहेब समवेत संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, उपाध्यक्ष पांडुरंग कुर्हाडे, सचिव अजित वडगावकर, खजिनदार डॉ. ज्ञानेश्वर पाटील, विश्वस्त लक्ष्मण घुंडरे, सदस्य अनिल वडगावकर, शहाजी करपे, बाबूलाल घुंडरे, श्रीधर कुर्हाडे, विद्यालयाचे प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, उपप्राचार्य किसन राठोड, मुख्याध्यापक प्रदीप काळे, पर्यवेक्षक प्रशांत सोनवण, अनिता पडळकर, अनुजायीनी राजहंस, प्रमोद कुलकर्णी, संगीता पाटील, श्रेणिक क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.
रघुनंदन कन्स्ट्रक्शनचे भगवान साकोरे यांनी प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांना पाच हजार रुपये देणगी दिली.
नंतर "गंध मातीचा रंग संस्कृतीचा" या विविध कला गुण दर्शनाच्या कार्यक्रमांचे सादरीकरण झाले. *या सांस्कृतिक कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव,एकता,मूल्यशिक्षण, सामाजिक जनजागृती, देशप्रेम, देशाचा प्रगल्भ इतिहास इत्यादी विषयांवर शिकवण देणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.* उपस्थित सर्व प्रमुख अतिथी, विद्यार्थी, शिक्षक,पालक आणि ग्रामस्थ हे सर्व कार्यक्रमांचे सादरीकरण पाहून मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश मठपती यांनी केले.उपस्थितांचे आभार सूर्यकांत मुंगसे यांनी मानले.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment