SHRIMANT

Friday, December 5, 2025

आळंदी पंचक्रोशीत दत्तजन्मोत्सव उत्साहात साजरा मरकळला अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील मरकळ परिसरातील दत्तभक्त ताई माऊली महाराज यांच्या प्रेरणेने व सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या श्री दत्त जन्मोत्सवा निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाची हरिनाम गजरात विविध उपक्रमांनी झाली. सांगता सोहळ्यात राष्ट्रीय कीर्तनकार गोरक्षनाथ महाराज वर्पे यांनी सुस्राव्य हृदयस्पर्शी कीर्तन सेवा रुजू केली. आळंदी परिसरातील विविध दत्त मंदिरात देखील दत्त जन्मोत्सव साजरा झाला. मंदिरात विविध ठिकाणी लक्षवेधी पुष्प सजावट करण्यात आली होती.
भाविक, दत्त भक्त, ग्रामस्थ यांची श्रींचे दर्शनास कीर्तनास मोठी गर्दी झाली होती. काल्याच्या कीर्तनानंतर पुणे जिल्हा वारकरी महामंडळ अध्यक्ष विलास तात्या बालवडकर यांच्या वतीने अन्नदान महाप्रसाद वाटप करण्यात आला. मरकळ पंचक्रोशीतील ग्रामस्थ दत्तभक्त यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांगता समारंभात अखंड हरिनाम सप्ताह सहकार्य केलेल्या सर्व मान्यवरांचा यावेळी सत्कार करून सामाजिक बांधिलकीतील ऋण व्यक्त करण्यात आले. दत्तजन्मोत्सवा निमित्त अखंड हरिनाम सप्ताह, होम हवन, यज्ञ, कीर्तन, प्रवचन, संगीत भजन, प्रासादिक कार्यक्रम हृदयस्पर्शी हरिनाम गजरात धार्मिक प्रथा परंपरांचे पालन करीत झाले. यावेळी आयोजित ज्ञानेश्वरी पारायण नेतृत्व श्रद्धाताई पांचाळ, अनुजा ननवरे, गुरुप्रसाद शिवशेहे यांनी ज्ञानेश्वरी व्यासपीठ नेतृत्व केले. गोरक्षनाथ महाराज वर्पे यांनी गुरुचरित्र पारायण सोहळ्याचे व्यासपीठ नेतृत्व केले. मरकळ येथील क्षेत्रपाध्ये वामन काका मरकळे यांनी पौरोहित्य करीत दत्त यज्ञ, लघु रुद्र, दत्तयाग आदी धार्मिक कार्यक्रम प्रथा परंपरांचे पालन करीत मंगलमय वातावरणात वेदमंत्र जयघोष करीत सेवा रुजू केली. अखंड हरिनाम सप्ताहात पहाटे काकडा, नित्यार्ती, गुरुचरित्र व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण, होम हवन, गाथा भजन, हरिपाठ, रात्रीची आरती, हरिकीर्तन आणि हरीजागर श्री गुरुदत्त जन्मोत्सवा निमित्त झाले. जन्मोत्सवा निमित्त भाऊसाहेब महाराज यादव, भक्ती दीदी पांचाळ, दत्तात्रय महाराज माशेरे, गजानन महाराज गारडे, बाळासाहेब महाराज शेवाळे, एकनाथ महाराज शिंदे, दत्तात्रय महाराज सुरतकर यांच्या कीर्तनासह गोरक्ष महाराज वर्पे यांच्या काल्याच्या कीर्तनाने कीर्तन महोत्सवाची सांगता हरिनाम गजरात झाली. अखंड हरिनाम सप्ताहातील संगीत भजन सेवेत इंद्रायणी भजन मंडळ, जोगेश्वरी महिला भजन मंडळ, गडकर महिला भजन मंडळ, साई महिला भजन मंडळ, कानिफनाथ भजन मंडळ, भानोबा भजन मंडळ, वाघजाई महिला भजन मंडळ, नागेश्वर भजन मंडळ या भजनी मंडळांनी आपापल्या गावातील ग्रामस्थ भजन सेवेकेरी यांच्या उपस्थितीत संगीत भजन सेवा रुजू केली. धार्मिक सोहळ्यातील विशेष अन्नदान सेवेत अर्जुन वाकचौरे बबन पवळे, राहुल वागस्कर, मारुती आरदाळकर, पंडित बिरासदार, बाळासाहेब होले, दत्ताभाऊ थिटे, रोहिदास कदम, विजय लबडे, गोरक्ष दरेकर, रामदास साकोरे , किरण साकोरे, श्री दाते, श्री भोसले, श्री कातोरें यांचेसह काल्याचे महाप्रसाद अन्नदान सेवा विलास तात्या बालवडकर यांनी रुजू करीत महाप्रसाद वाटप केले. पालखी मिरवणूक हरिनाम गजरात झाली. दत्त जन्मोत्सवास ताई मऊली महाराज यांचे मार्गदर्शन व प्रेरणेत अखंड हरिनाम सप्ताह साजरा झाला. रोहिदास कदम, काळुराम घेणंद, प्रतीक पांचाळ, मानव महाराज पाटील, अरुणा गौंड, बबन पवळे, अर्जुन मेदनकर, कैलास होले, बजरंग सुतार, मरकळ ग्रामस्त, पदाधिकारी, मरकळ सोसायटी पदाधिकारी, ग्रामपंचायत आजी, माजी सारंच, उपसरपंच, सदस्य यांचेसह पंचलिंग श्रीगुरुदेव दत्त प्रतिष्ठाण यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments: