SHRIMANT
- श्री संत ज्ञानोबा तुकोबा विश्वभ्रमण दिंडी सोहळा दुबई २०२२
- श्री विश्वशांती जगद्गुरू सेवा संस्था
- सूत्रसंचालन
- "भाषण कला शिका "
- ऑनलाईन बँक खाते
- भाषणासाठी विषय निवडताना
- वक्तृत्व कला
- सर्वांगीण दृष्टी
- संवाद तंत्र
- करीअर
- होमी मिनिस्टर LIVE
- विदेश दौरे
- मी श्रीमंत आहे live show
- सूत्रसंचालनासाठी उपयुक्त चारोळ्या
- पुस्तके का वाचावीत
- सूत्रसंचालन
- मीडिया
- कामगार पुरस्कार सोहळा
- LIVE मुलाखत
- तिरुपती बालाजी दर्शन
- मराठी देशा
- विवेकानंदांची अतिशय महत्त्वाचे वाक्ये
- चांगले विचार
- ई- Paper वर्तमानपत्रे
- उपयोगी छोट्या कथा
- निवडक बोधकथांचा एक संग्रह
- फक्त विनोद - Only Jokes
- वक्तृत्व
- योगासने
- वाढदिवसाच्या शुभेच्छा
- Youtube
- News Blog
Friday, December 5, 2025
आळंदीतील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत नवनिर्वाचित पदाधिकारी व विश्वस्तांचा सत्कार समारंभ संपन्न
आळंदी पुणे - श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर व श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर मधील सर्व घटकांच्या वतीने श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या पदाधिकारी व विश्वस्त यांचा सत्कार समारंभ श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणामध्ये दिमाखदार स्वरूपात संपन्न झाला.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत ढोल-ताशांच्या गजरात पुष्पवृष्टी करून करण्यात आले. दीपप्रज्वलन व माऊलींच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून प्रशालेचे प्राचार्य सूर्यकांत मुंगसे यांनी नवनिर्वाचित पदाधिकारांचे स्वागत, अभिनंदन केले आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. प्रशालेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी शाळा भरण्यापूर्वी विशेष प्रशिक्षण वर्ग राबवावेत, अशी मागणी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ह. भ. प. वासुदेव महाराज शेवाळे व ज्यांच्या शुभहस्ते आजचा कार्यक्रम संपन्न झाला त्या आळंदी नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित बिनविरोध नगरसेविका सुजाता कालिदास तापकीर व ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला ते आळंदी शहर डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष विकास पाटील यांचा माऊलींची मूर्ती, मोत्यांची माळ, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
तद्नंतर श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या नवनिर्वाचित पदाधिकारी व विश्वस्त यांचा सन्मान सोहळा मान्यवरांच्या ऊपस्थितीत व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हस्ते संपन्न झाला, या मध्ये प्रथमतः श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी सुरेशकाका वडगावकर, सचिवपदी अजित वडगांवकर, खजिनदारपदी डॉ. ज्ञानेश्वर पाटील, विश्वस्तपदी प्रकाश काळे, लक्ष्मण घुंडरे, योगेंद्र कुऱ्हाडे निवड झाल्याबद्दल शाल, श्रीफळ, मोत्यांची माळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या बांधकाम समितीच्या चेअरमनपदी विलास सोपान कुऱ्हाडे, श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिराच्या शाळा समिती सदस्यपदी अनिल वडगांवकर व राहूल घुंडरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही शाल, श्रीफळ, मोत्यांची माळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना विश्वस्त प्रकाश काळे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. 'ओळख श्री ज्ञानेश्वरीची' या कार्यक्रमामुळे प्रशालेची ओळख संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. भविष्यात देश-विदेशात पोहचावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
खजिनदार डॉ. ज्ञानेश्वर पाटील यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता व परदेशी भाषा यांचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्व विशद केले. तसेच विद्यार्थ्यांसाठी शाळेमध्ये उपलब्ध असणाऱ्या भौतिक सुविधांचा आलेख चढता असल्याचे नमूद केले.
आपल्या मनोगतात सचिव अजित वडगावकर म्हणाले की गेली सलग 25 वर्षे पुन्हा-पुन्हा हेच विश्र्वस्तङ व पदाधिकारी बिनविरोधपणे नव्याने निवडले जातात, हे सर्व या पदाधिकाऱ्यांच्या चांगल्या कामाची पावती आहे. हे सर्व पदाधिकारी एक विचाराने राहून प्रशालांच्या प्रगतीसाठी नेहमीच प्रयत्न करतात. संस्थेची स्थापना खेड तालुक्याचे मा. आमदार स्व.पंढरीनाथ कबीरबुवा यांनी केली व पुढेमा.आमदार स्व. ताराचंद वडगांवकर यांनी अध्यक्ष म्हणून काम केले. संस्थेच्या स्थापनेपासून तर आतापर्यंत संस्थेच्या प्रगतीचा प्रवास थोडक्यात सांगितला. संस्थेच्या प्रगतीमध्ये संस्थेचे मा. उपाध्यक्ष विलास गोपाळराव कुऱ्हाडे यांचेही योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. गत 25 वर्षातील कामगिरी आणि भविष्यातील वाटचाल यामध्ये बदल करावा लागेल. तसेच शाळेमध्ये विविध उपक्रम राबविण्यासाठी संस्था नेहमीच अनुकूल असल्याचे सांगीतले. या संस्थेवर माऊलींची कृपा कायम राहो आणि श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज हे भविष्यामध्ये विश्वविद्यालय होवो ही डॉ. नारायण महाराज जाधव यांची भावना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू असे नमूद केले. शैक्षणिक क्षेत्रातील संस्थेची आजपर्यंतची वाटचाल यशस्वीपणे होणे ही माऊलींचीच कृपा असल्याचे संस्थेचे सचिव अजित वडगांवकर यांनी सांगितले तसेच ज्या सदस्यांनी त्यांची निवड केली त्या सर्वांचे आभार आपल्या मनोगतातून व्यक्त केले व प्रशालेच्या प्रगतीसाठी सतत कार्यरत राहू, असे आश्वासन दिले.
गेले 48 वर्ष संस्थेचे अध्यक्ष म्हणून संस्थेची धुरा यशस्वीपणे सांभाळली हे सर्व माऊलींच्या कृपेमुळेच शक्य झाले असल्याचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर यांनी सांगितले. सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व विश्वस्त यांच्या निवडीबद्दल अध्यक्ष सुरेश वडगांवकर यांनी अभिनंदन केले. प्रशालेच्या-संस्थेच्या प्रगतीसाठी सतत कार्यरत राहू असे सांगितले.
डॉ. विकास पाटील यांनी प्रशालेचा नावलौकिक समाजामध्ये वाढत जाणार आहे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी या प्रशालेतून अनेक गुणवंत विद्यार्थी बाहेर पडले त्यांना विविध निमित्ताने बोलवावे असे मत व्यक्त केले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. नगरसेविका सुजाता तापकीर यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या तसेच कार्यक्रमासाठी निमंत्रित करून सन्मानित केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना ह.भ.प. वासुदेव म. शेवाळे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना ओळख श्री ज्ञानेश्वरीची या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमामुळे महाराष्ट्रामध्ये प्रशालेचा नावलौकिक वाढलेला आहे. तसेच शाळेच्या अनेक भविष्यात शाखा वाढाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते कालिदास तापकीर, माध्यमिक पालक-शिक्षक संघ उपाध्यक्ष श्रेणिक क्षिरसागर, प्राथमिक पालक-शिक्षक संघ उपाध्यक्ष तेजश्री साळुंके, ललित फिरके, विश्वंभर पाटील, धनाजी काळे, माऊली जाधव, हनुमंत तापकीर, ज्योती श्रीखंडे, प्राचार्य सुर्यकांत मुंगसे, मुख्याध्यापक प्रदीप काळे, उपप्राचार्य किसन राठोड, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर, अनुजायिनी राजहंस माध्यमिक शिक्षक प्रतिनिधी प्रमोद कुलकर्णी, शिक्षकेतर प्रतिनिधी संगीता पाटील, प्राथमिक शिक्षक प्रतिनिधी वैशाली शेळके आदींची प्रमुख उपस्थिती होते. कार्यक्रमाचे प्रक्षेपण ऑनलाईन करण्यात आले होते.सूत्रसंचालन योगेश मठपती यांनी तर आभार प्रदीप काळे यांनी मानले. माऊलींच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment