SHRIMANT

Wednesday, January 14, 2026

अलंकापुरीत मकर संक्रांत दिनी महिलांची माऊली मंदिरात गर्दी माऊली मंदिरात षटतिला एकादशी दिनी लाखावर भाविक श्रींचे दर्शनास इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरती उत्साहात ; महिलांचे हळदी कुंकू

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील माऊली मंदिरात षटतिला एकादशी आणि मकर संक्रांत दिनी राज्यातील लाखावर भाविकांनी गर्दी करून श्रींचे दर्शन घेतले. इंद्रायणी नदी दुतर्फ़ा आणि नदीवरील स्काय वॉल्कवर देखील महिला सह भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आळंदी माऊली मंदिरात महिला भाविकांची दर्शनास गर्दी अधिक गर्दी होती. मकर संक्रांती, षटतिला एकादशीच्या पावन पर्व साधत इंद्रायणी नदी घाटावर आळंदी देवस्थान तर्फे महिलांसाठी हळदी कुंकू आणि इंद्रायणी आरती सेवा समितीसह देबस्थानचे वतीने इंद्रायणी महाआरती मंत्र जयघोषात झाली.
मंदिरात लक्षवेधी पुष्प सजावट करण्यात आली होती. इंद्रायणी नदी घाटावर आरती प्रसंगी पदाधिकारी आणि सेवा भावी संस्था यांचा सत्कार करीत नदी प्रदूषण, नदी परिसर स्वच्छतेचा एल्गार जाहीर करण्यात आला. महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आळंदी देवस्थान महिला विश्वस्त रोहिणी पवार यांनी देवस्थान तर्फे राबविला. आळंदीतील इंद्रायणी आरती सेवा समितीचे वतीने इंद्रायणी आरती आणि आवेकर भावे रामचंद्र संस्थान तर्फे मंदिरात महिलांसाठी उत्साहात हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करीत सुमारे २०० वर महिला भाविकांना वाण वाटप करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख विश्वस्त ऍड राहुल आवेकर, पूजा आवेकर, विश्वस्त अर्जुन मेदनकर, महेश आयचीत आदी उपस्थित होते. या वेळी महिलांना वाण आणि हळदी कुंकू पूजा आवेकर यांचे हस्ते देण्यात आले. आळंदीत मकर संक्रांत दिनी हजारो महिलांनी माऊलीचे दर्शनासह महिलाना हळदी कुंकू देत आळंदी परिसरातील मंदिरांसह इंद्रायणी नदी घाटावर ओवसा वाहण्यास तसेच एकमेकींना ओवसा वाण देत मकर संक्रांत प्रथा परंपरांचे पालन करीत साजरी केली. आळंदी देवस्थानच्या पहिल्या महिला विश्वस्त ऍड रोहिणी पवार यांनी प्रथमच इंद्रायणी नदी घाटावर देवस्थान तर्फे महिलांसाठी हळदी कुंकू उपक्रम राबविला. इंद्रायणी आरती सेवा समितीच्या वतीने देखील इंद्रायणी नदीची आरती करण्यात आली. यावेळी राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा संयोजक अनिता झुजम, संयोजक नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, रोहिदास कदम, बाळासाहेब ठाकूर, महिला बचत गट महा संघ अध्यक्षा सुवर्णा काळे, अनिता शिंदे, कौशल्या देवरे, नीलम कुरधोंडकर, लता वर्तले, शैला तापकीर, केशरबाई कदम, मीरा कांबळे, सरस्वती भागवत, रंजना गिरे, सावित्री घुंडरे पाटील, सुनंदा पवार, पूजा पवार, वर्षा खिलारे, शोभा कुलकर्णी, कोमल वाळूतकर, सुनीता घोटकुले, कांचन घनवट, कमल नाणेकर, काशीबाई अडकिने, जयश्री भागवत, राधिका अडकिने, सुनीता हिळ्ळी, सृष्टी हिळ्ळी, अस्मिता गोरे, समृद्धी भागवत आदी मान्यवर उपस्थित होते. माऊली मंदिरात श्रीना तिळाचा अभिषेक, महानैवेद्य झाला. भाविकांची गर्दी लक्षांत घेता महिलांसाठी पंखा मंडपातून तसेच पुरुष भाविकांना विना मंडपा समीप श्रींचे दर्शन व्यवस्था करण्यात आली होती. मागील वेळी पुरुष भाविकांना दर्शनास मंदिरात न सोडल्याने झालेली नाराजी यावरी दूर करून श्रींचे दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. भाविक, वारकरी, नागरिकांनी श्रींचे दर्शन गर्दी करत घेतले. कमी वेळेत जास्तीत जास्त भाविक दर्शनास जातील असे नियोजन देवस्थानाने केले. मंदिरात शांतता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होतो. या साठी व्यवस्थापक माऊली वीर, उप व्यवस्थापक तुकाराम माने, बल्लालेश्वर वाघमारे, देवस्थानचे कर्मचारी, सुरक्षा रक्षक, पोलीस अधिकारी,कर्मचारी यांनी यासाठी परिश्रम पूर्वक काम पाहिले. या वेळी आळंदी देवस्थानचे पदाधिकारी प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, विश्वस्त राजेंद्र उमाप, रोहिणी पवार, पुरुषोत्तम महाराज पाटील, निलेश महाराज लोंढे, व्यवस्थापक माऊली वीर, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, नगरपरिषदेचे नूतन पदाधिकारी आदींचे उपस्थितीत इंद्रायणी आरती वेदमंत्र जय गोष्ट झाली. या वेळी इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्यासह स्वच्छतेचे काम प्रभावी होण्यासाठी पदाधिकारी यांनी ग्वाही दिली. एअकादशी आणि मकर संक्रांत एकत्र आल्याने महिला भाविकांची मोठी गर्दी दर्शनबारीसह मंदिर परिसर, इंद्रायणी नदी घाटावर तसेच आळंदीतील श्री विष्णू मंदिर, श्री राम मंदिर, श्री स्वामी महाराज मंदिर, श्री हजेरी मारुती मंदिर, श्री भैरवनाथ मंदिर येथे भाविकांची गर्दी झाली होती. दर्शनबारीसाठी पुढे इंद्रायणी नदी वरील स्काय वॉल्क पुलावर हि महिलांची मोठी गर्दी होती. मंदिराचे दर्शनबारी लगत भाविकांची दर्शनास गर्दी झाली. मात्र त्या भागातील अरुंद रस्ते तसेच मंदिर परिक्रमा पान दरवाजा मार्ग प्रशस्त नसल्याने रहदारीला गैरसोयीचे ठरले. षटतिला एकादशी दिनी आळंदी मंदिर परिसरासह इंद्रायणी नदी घाटाचे दुतर्फा, प्रदक्षिणा मार्गावर प्रदक्षिणेस भाविकांनी गर्दी केली. परंपरेने मंदिरातील धार्मिक उपक्रम विधी झाले. मात्र देवदर्शनास श्रींचा गाभारा बंद ठेवण्यात आला होता. एकादशी दिनी लाखावर भाविकांनी श्रींचे दर्शन घेत मकर संक्रांत देखील साजरी केली. आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मच्छिन्द्र नाईक यांनी शांतता सुव्यवस्थेचे काम परिश्रम पूर्वक पाहिले.

No comments: