SHRIMANT

Thursday, January 15, 2026

श्री ज्ञानेश्वर विद्यालय आळंदीची संस्कृती बाजीराव नवले इंटरमिजिएट परीक्षेत राज्यात १५ वी

आळंदी पुणे - कला शिक्षण मंडळ मुंबई यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा सप्टेंबर २०२५ चा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत संपुर्ण महाराष्ट्र राज्यातून ३,१४,६६६ तीन लाख चौदा हजार सहाशे सहासष्ट विद्यार्थी बसले होते. श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज या प्रशालेत परीक्षा केंद्र असून याच प्रशालेतील विद्यार्थ्यांनी कु. संस्कृती बाजीराव नवले ही राज्यात गुणवत्ता‌ यादीत १५ वी आली आहे. या विद्यार्थ्यांनीला मार्गदर्शन कलाशिक्षक वंजारी दत्तात्रय मारुती यांनी केले आहे.
या अगोदरही शासकीय रेखाकला एलिमेंटरी परीक्षेत २०१८ साली स्वप्निल हनुमंत राऊत हा विद्यार्थी राज्यात २७ वा आला होता. या विद्यालयाचे अनेक विद्यार्थी महाराष्ट्र शासनाच्या तालुका, जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. संस्कृतीच व कलाशिक्षक वंजारी यांचे अभिनंदन संस्थेचे सचिव अजित वडगावकर व प्राचार्य किसन राठोड यांनी केले .

No comments: