SHRIMANT

Sunday, January 25, 2026

नर्मदा जयंती इंद्रायणी नदी घाटावर उत्साहात साजरी.

अर्जुन मेदनकर आळंदी - इंद्रायणी नदी घाटावर नर्मदा जयंती निमित्त नर्मदा आरती तसेच इंद्रायणी माता,नर्मदा माता नाम
जयघोष, वारकरी सांप्रदायिक भजन सेवा, पंचपदी धार्मिक प्रथा परंपरांचे पालन करीत इंद्रायणी नदी घाटावर नर्मदा जयंती साजरी करण्यात आलीं. या वेळी दिनकर तांबे यांचे हस्ते नर्मदा प्रतिमा पूजन, कन्या पूजन ,आले. या प्रसंगी रविंद्र महाराज कुमकर, दिलीप महाराज ठाकरे, इंद्रायणी आरती सेवा समितीचे संयोजक अर्जुन मेदनकर, दिनकर तांबे, अशोक महाराज सालपे यांचे सह श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था अध्यक्ष श्री मोहन महाराज शिंदे यांचे संस्थेतील साधक वारकरी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, वारकरी, भाविक उपस्थित होते. या वेळी हरिनाम जय घोष उत्साहात करण्यात आला. गेल्या तीन वर्षां पासून इंद्रायणी नदी घाटावर नर्मदा जयंती, रथ सप्तमी साजरी करण्यात येत असल्याचे संयोजक अर्जुन मेदनकर यांनी सांगितले.

No comments: