SHRIMANT
- श्री संत ज्ञानोबा तुकोबा विश्वभ्रमण दिंडी सोहळा दुबई २०२२
- श्री विश्वशांती जगद्गुरू सेवा संस्था
- सूत्रसंचालन
- "भाषण कला शिका "
- ऑनलाईन बँक खाते
- भाषणासाठी विषय निवडताना
- वक्तृत्व कला
- सर्वांगीण दृष्टी
- संवाद तंत्र
- करीअर
- होमी मिनिस्टर LIVE
- विदेश दौरे
- मी श्रीमंत आहे live show
- सूत्रसंचालनासाठी उपयुक्त चारोळ्या
- पुस्तके का वाचावीत
- सूत्रसंचालन
- मीडिया
- कामगार पुरस्कार सोहळा
- LIVE मुलाखत
- तिरुपती बालाजी दर्शन
- मराठी देशा
- विवेकानंदांची अतिशय महत्त्वाचे वाक्ये
- चांगले विचार
- ई- Paper वर्तमानपत्रे
- उपयोगी छोट्या कथा
- निवडक बोधकथांचा एक संग्रह
- फक्त विनोद - Only Jokes
- वक्तृत्व
- योगासने
- वाढदिवसाच्या शुभेच्छा
- Youtube
- News Blog
Sunday, January 25, 2026
श्री ज्ञानेश्वर विद्यालयात “ओळख श्री ज्ञानेश्वरीची” राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची उत्साहात सांगता* *"ओळख श्री ज्ञानेश्वरीची" पुस्तकाचा द्वितीय आवृत्ती प्रकाशन सोहळा संपन्न
आळंदी पुणे डिजिटल मीडिया महाराष्ट्र - श्री ज्ञानेश्वर विद्यालयात आयोजीत करण्यात आलेल्या “ओळख श्री ज्ञानेश्वरीची” या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची सांगता कार्यक्रम मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत राज्यभरातून आलेल्या स्पर्धक विद्यार्थ्यांनी ज्ञानेश्वरीतील तत्त्वज्ञान व जीवनमूल्ये यांचा त्यांच्या जीवनावर झालेला परिणाम याचा सखोल आणि प्रभावी उलगडा आपल्या वक्तृत्वातून केला व सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
याप्रसंगी विजेत्या 23 सहभागी स्पर्धकांना आकर्षक स्मृतिचिन्हे, प्रमाणपत्रे व रोख पारितोषिके देऊन उपस्थित मान्यवरांनी कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
या 'ओळख श्री ज्ञानेश्वरीची' व हरिपाठ राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत एकूण 405 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये 38 विद्यार्थी उपांत्य फेरीत पोहोचले. त्यातील श्री ज्ञानेश्वर विद्यालय आळंदी येथील राधिका परमेश्वर फपाळ या विद्यार्थिनींने प्रथम क्रमांक प्राप्त करून 9251 ₹. रोख रक्कम, प्रमाणपत्र, ट्रॉफी पारितोषिक मिळविले. ओम गोरक्षनाथ गेठे या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक प्राप्त करून 8251₹. रोख रक्कम, प्रमाणपत्र, ट्रॉफी पारितोषिक मिळविले. तर श्री व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूल वडगावशेरी येथील अक्षदा अरुण डोळस या विद्यार्थ्यांनीने 7251 ₹. रोख रक्कम, प्रमाणपत्र, ट्रॉफी पारितोषिक मिळविले. तसेच हरिपाठ पाठांतर व अर्थ विवेचन या राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत भेकराईमाता माध्यमिक विद्यालय भेखराईनगर येथील यश शिंदे या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक प्राप्त करून 5000 रुपये रोख रक्कम, प्रमाणपत्र व ट्रॉफी पारितोषिक मिळविले, श्री निकेतन गुरुकुल विद्यालय आळंदी येथील स्वरांजली झाडे या विद्यार्थिनींने द्वितीय क्रमांक प्राप्त करून 4000 रुपये रोख रक्कम, प्रमाणपत्र व ट्रॉफी पारितोषिक मिळविले तर भोसरी येथील ध्रुव सोनवणे या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक प्राप्त करून 3000 रुपये रोख रक्कम, प्रमाणपत्र व ट्रॉफी पारितोषिक मिळविले.
तसेच विलास महाराज बालवडकर यांच्या वतीने प्रथम पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1000₹ व स्वकाम सेवा संघाचे सारंग जोशी यांच्या वतीने प्रथम तीन विद्यार्थ्यांना (रोख 500₹) देण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त ह. भ. प. योगी निरंजननाथ प्रमुख उपस्थिती श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, वारकरी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष विलास बालवडकर, श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, खजिनदार डॉ. दीपक पाटील, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, विद्यालयाचे प्राचार्य किसन राठोड, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, विविध संस्थांचे, शाळांचे पदाधिकारी, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, विविध संस्थांचे सदस्य, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये प्रकाश काळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून देत कार्यक्रमाची रूपरेखा स्पष्ट केली. ज्ञानदेवांचे तत्त्वज्ञान व मूल्यशिक्षणाने आदर्श समाज व देश घडावा यासाठी सुरू झालेल्या 'ओळख श्री ज्ञानेश्वरीची' उपक्रमाचा श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती व पत्रकार संघ आळंदी देवाची, सर्व अध्यापक या परिवाराच्या सहकार्याने साऱ्या विश्वात या उपक्रमाचा प्रचार व प्रसार व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
तदनंतर 'ओळख श्री ज्ञानेश्वरीची' पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचा प्रकाशन सोहळा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदार वातावरणात संपन्न झाला.
अजित वडगावकर यांनी आपल्या मनोगतातून श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत सुरू झालेल्या 'ओळख श्री ज्ञानेश्वरीची' या रोपट्याचा केवळ माऊलींच्या कृपा आशीर्वादाने व आपल्या सर्वांच्या सहकार्याने वटवृक्ष झाला याचा आनंद व्यक्त केला. “अशा उपक्रम व स्पर्धांमुळे तरुण पिढीच्या विचार विश्वाचा विकास होतो” असे सांगितले.
सुभाष महाराज गेठे यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या वक्तृत्वा मुळे अंगावर शहारे उमटल्याचे सांगितले. या उपक्रमातील विद्यार्थी हा समाजाचा आरसा असून यांना चमकविण्याचे काम आपण सर्वांनी करावे व समाजातील धनाढ्य लोकांनी हा उपक्रम जगभर पोहचविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
डॉ. भावार्थ देखणे यांनी उपक्रमाची महती व आजच्या पिढीला उपक्रमाची असलेली आवश्यकता सांगत हा उपक्रम प्रत्येक शाळेत राबविला जावा जेणेकरून विद्यार्थ्यांमधील दोष - दुर्गुण दूर होतील. ज्ञानेश्वरीतील अभ्यासपूरक भाव, विचार विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविणाऱ्या सर्व घटकांचे कौतुक केले. आणि हे कार्य असेच अबाधित टिकविण्यासाठी संस्थान कायम बांधील राहील असे आश्वासनही दिले.
अध्यक्षीय भाषणात योगी निरंजननाथ यांनी ज्ञानेश्वरीचे विचार आजच्या समाजासाठी किती मार्गदर्शक आहेत यावर प्रकाश टाकला. आजच्या पिढीला अंधारातून बाहेर काढणारा तेजोमय सूर्य म्हणजे "ओळख श्री ज्ञानेश्वरीची" हा उपक्रम असल्याचे गौरवास्पद उद्गार काढले. विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीने वकृत्व स्पर्धेमध्ये भाष्य केले तेव्हा आज या उपक्रमासाठी कष्ट घेत असलेल्या आयोजकांचा उद्देश साध्य झाल्याचा आनंदही व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थेच्या वतीने आळंदी नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक सुरेश नाना झोंबाडे, नगरसेविका कांचन किरण येळवंडे, अर्चना तापकीर, उज्वला काळे, वैजयंता उमरगेकर यांचा शाल, श्रीफळ, मोत्याची माळ व माऊलींची मूर्ती देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान यांच्या वतीने सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन योगेश मठपती यांनी केले व तुकाराम गवारी यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले. माऊलींच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment