SHRIMANT

Thursday, February 12, 2026

इंद्रायणी स्वच्छता मोहीमेत श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचा सहभाग

आळंदी पुणे डिजिटल Mee24Taas आळंदी नगर परिषदेच्या वतीने राबविण्यात आलेल्या इंद्रायणी स्वच्छता मोहिमेत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या ६०० विद्यार्थी, शिक्षक व मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
आळंदी परिसरात स्वच्छतेचा संदेश देत चाकण रस्ता नवीन पूल ते साधकाश्रम दरम्यान इंद्रायणी च्या तीरावर भव्य स्वच्छता मोहीम उत्साहात पार पडली. या मोहिमेत या सर्वांनी दीड तास श्रमदान करत इंद्रायणी तीर व परिसर स्वच्छ केला. “माऊली सेवा” या भावनेतून आयोजित या उपक्रमाला सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मुख्याध्यापक राठोड , प्रदीप काळे तसेच संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी स्वतः विद्यार्थ्यांसोबत झाडू व स्वच्छता साहित्य हातात घेत श्रमदान केले. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने परिसर स्वच्छ करत समाजापुढे आदर्श निर्माण केला. तसेच नगराध्यक्ष प्रशांत दादा कु-हाडे व नगरसेवक गिलबिले यांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले व स्वच्छता हीच खरी सेवा असल्याचे प्रतिपादन केले. स्वच्छ, सुंदर आणि निरोगी समाज घडविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि जबाबदारीची भावना निर्माण करणारी ही मोहीम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली.

No comments: