SHRIMANT
- श्री संत ज्ञानोबा तुकोबा विश्वभ्रमण दिंडी सोहळा दुबई २०२२
- श्री विश्वशांती जगद्गुरू सेवा संस्था
- सूत्रसंचालन
- "भाषण कला शिका "
- ऑनलाईन बँक खाते
- भाषणासाठी विषय निवडताना
- वक्तृत्व कला
- सर्वांगीण दृष्टी
- संवाद तंत्र
- करीअर
- होमी मिनिस्टर LIVE
- विदेश दौरे
- मी श्रीमंत आहे live show
- सूत्रसंचालनासाठी उपयुक्त चारोळ्या
- पुस्तके का वाचावीत
- सूत्रसंचालन
- मीडिया
- कामगार पुरस्कार सोहळा
- LIVE मुलाखत
- तिरुपती बालाजी दर्शन
- मराठी देशा
- विवेकानंदांची अतिशय महत्त्वाचे वाक्ये
- चांगले विचार
- ई- Paper वर्तमानपत्रे
- उपयोगी छोट्या कथा
- निवडक बोधकथांचा एक संग्रह
- फक्त विनोद - Only Jokes
- वक्तृत्व
- योगासने
- वाढदिवसाच्या शुभेच्छा
- Youtube
- News Blog
Tuesday, February 17, 2026
आत्मविश्वास, परिश्रम आणि यशाचा संकल्प — श्री ज्ञानेश्वर विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा
पुणे आळंदी Mee24TaasTeam
शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा जपणाऱ्या श्री ज्ञानेश्वर विद्यालय येथे इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी एस. एस. सी. बोर्ड परीक्षेनिमित्त शुभेच्छा समारंभ उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक व मा. प्रमुख विश्वस्त श्री मार्तंड (खंडोबा) देव संस्थान जेजुरीचे तुषार सहाणे, प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषद पुणे माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी विजय खराटे, उद्योजक व सिव्हिल (स्ट्रक्चरल) इंजिनीयर रवींद्र कर्नावट, संभाजीनगर महानगरपालिकेचे नगरसेवक व महाराष्ट्र राज्य संत भगवान बाबा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप, संस्थेचे सचिव अजित वडगावकर, सदस्य अनिल वडगावकर, विद्यालयाचे प्राचार्य किसन राठोड, उपप्राचार्य प्रशांत सोनवणे, पर्यवेक्षिका अनिता पडळकर, अनुजायीनी राजहंस, हेमांगी उपरे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्रेणिक क्षीरसागर, शिक्षक प्रतिनिधी प्रमोद कुलकर्णी, सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, दहावीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे फुलांच्या पाकळ्यांची उधळण करत स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये किसन राठोड यांनी शाळा हे विद्येचे मंदिर असून सर्वांनी ज्ञानाने परिपूर्ण व्हावे. या ज्ञानाच्या मंदिरातून दिलेल्या ज्ञानाचा बाहेरील विश्वात योग्य वापर करून यशस्वी व्हावे याकरिता शुभेच्छा दिल्या. यानंतर इयत्ता नववीच्या राधिका फपाळ या विद्यार्थिनीने इयत्ता नववीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने बोर्ड परीक्षेसाठी व त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शुभेच्छांना प्रत्युत्तर देताना ओम गेठे व दिव्यांग विद्यार्थिनी धनश्री जाधव या विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता, शाळा व मित्रांप्रती जिव्हाळा आणि उज्ज्वल भविष्यासाठीची स्वप्ने व्यक्त केली.
शिक्षक अल्लाबक्ष मुलाणी यांनी आत्मविश्वास, ज्ञान व प्रयत्नांची चिकाटी याच्या आधारे यशाची शिखर गाठावे यासाठी विद्यालयातील सर्व घटकांच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
तदनंतर अजित वडगावकर यांनी आपल्या भाषणात विद्यालयाच्या निकालाचा यशस्वी चढता आलेख व 100 % ची परंपरा मांडली. या ज्ञानमंदिरातून विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर संस्कार व सर्व भौतिक सुविधा देऊन समाज हितासाठी एक आदर्श विद्यार्थी घडविला जातो. या विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचा, गुरु व जेष्ठांचा आदर करून समाजात आपले व विद्यालयाचे नाव मोठे करावे यासाठी शुभेच्छा दिल्या.
रवींद्र कर्नावट यांनी विद्यालयाच्या वतीने केलेल्या स्वागताने भारावून गेलो असल्याचे सांगितले. विद्यालयात विद्यार्थ्यांना दिले जाणारे शिक्षण विद्यार्थ्यांची प्रगती ,त्यांच्यातील कला- कौशल्य व गुण पाहून संस्था पदाधिकारी व शाळेच्या सर्व घटकांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना जीवनातील पाच लक्ष्यांचा परिचय करून देत असताना मातृभूमी, मातृभाषा, माता-पिता, माझी शाळा व स्वतःबद्दल आदर व अभिमान ठेवावा याविषयी मोलाचा संदेश दिला. तसेच संस्थेच्या भौतिक विकासात गरजेनुसार सहकार्य करू अशी भावना व्यक्त केली. विजय खराटे यांनी परिश्रम, आत्मविश्वास आणि वेळेचे व्यवस्थापन यांचे महत्त्व पटवून दिले. “परीक्षा ही आयुष्याची अंतिम पायरी नसून यशाकडे नेणारा एक टप्पा आहे,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन केले. परीक्षेतील महत्त्वाच्या सूचना व अभ्यासाचे नियोजन कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. आपल्याला शाळेत मिळालेल्या ज्ञान संस्काराचा सुसंस्कारित समाज घडविण्यासाठी उपयोग करावा. माऊलींच्या पसायदानातील दृष्टांत देत ज्यांनी शालेय जीवनात विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या गुरूंना वंदन करून आपल्या कर्माने संतुष्ट करण्याची प्रेरणा दिली. तसेच टॅलेंट बरोबर स्मार्टनेस असण्याची गरज व्यक्त करून शिक्षण, जिद्द, चिकाटी व ऊर्जा या बळावर जीवनात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
बाळासाहेब सानप यांनी एवढी मोठी विद्यार्थी संख्या असलेली संस्था एवढ्या चांगल्या प्रकारे प्रगतशील आहे हे फक्त माऊलीच्या कृपाशीर्वादामुळे शक्य होऊ शकते असे सांगितले. महाराष्ट्राच्या विविध भागातून काम करण्यासाठी आलेल्या गरिबांची मुले या संस्थेत शिक्षण घेत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचे परिश्रम लक्षात घेता चांगले शिक्षण घेऊन आपले उज्वल भविष्य घडवावे यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तुषार सहाणे यांनी राहिलेल्या पुढील दिवसात अभ्यासाचे नियोजन करून आत्मविश्वासाने परीक्षेत सामोरे जावे यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या निमित्ताने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयास आपली आठवण म्हणून 14 फॅन व 14 ट्यूबलाईट भेट दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास वहिले यांनी व हेमांगी उपरे यांनी आभार मानले पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment