SHRIMANT

Friday, February 20, 2026

इंदापूरमध्ये पतंजली योग समितीच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

mee24taas team इंदापूर : आज पतंजली योग समिती, इंदापूर यांच्या वतीने आयोजित योगवर्गात विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडू, विद्यार्थी व समाजसेवकांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमात प्रेरणादायी वातावरणात सन्मान सोहळा संपन्न झाला.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार व समाजसेवक काकासाहेब मांढरे यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘महाराष्ट्र गौरव सन्मान’ प्रदान झाल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत ९० किलोमीटर अंतर अवघ्या १० तासांत पूर्ण करून उल्लेखनीय कामगिरी करणारे तसेच इंदापूरमध्ये प्रथमच ‘इंद्रेश्वर मॅरॅथॉन’ स्पर्धेचे यशस्वी आयोजन करून इंदापूरकरांचा अभिमान वाढविणारे श्री. संतोष वाघचौरे, श्री. संदीप जाधव आणि श्री. गोपीनाथ मोरे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कु. तनिष्का आत्माराम फलफले हिची Indian Space Research Organisation (इस्रो) मध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झाल्याबद्दल तिचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच राज घाडगे, श्रेयस बोंगाणे व अभिनव गटकुळ या विद्यार्थ्यांनी JEE परीक्षेत मिळवलेल्या उत्कृष्ट यशाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. अक्षय बाळासाहेब मोरे याची आंतरराष्ट्रीय बेसबॉल टीममध्ये निवड झाल्याबद्दल तर अथर्व सचिन मोरे याने आंतरराष्ट्रीय कुराश शालेय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. या सन्मान सोहळ्यामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, तरुण पिढीला प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. पतंजली योग समितीच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments: